Pohyacha Chivda recipe in marathi Maharashtrian | पातळ पोह्याचा चिवडा रेसिपी मराठी

Pohyacha Chivda recipe in marathi | पातळ पोह्याचा चिवडा रेसिपी मराठी

Pohyacha Chivda recipe in marathi Maharashtrian | पातळ पोह्याचा चिवडा रेसिपी मराठी
नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पातळ पोह्याच्या चिवड्याची रेसिपी. हा चिवडा अगदीच कुरकुरीत होतो आणि पचायला देखील हलका असतो. याला आपण हवे तसे तिखट किंवा गोड या प्रकारात बनवू शकतो. काही लोकांना चिवड्यामध्ये साखर टाकण्याची सवय असते. काही प्रमाणात पिठीसाखर टाकून केलेला असा चिवडा अतिशय रुचकर लागतो पण काही लोकांना हे आवडत नाही म्हणून साखरेची पद्धत मी वाचकांच्या मनावर ठेवलेली आहे ज्याला हवे त्याने साखर टाकावी ज्याला नको त्याने टाकू नये.

पोह्यांसाठी साहित्य

एक किलो पातळ पोहे, दोन वाट्या शेंगदाणे, एक वाटी खोबऱ्याचे काप, दोन वाटी पंढरपुरी डाळ्या, वाळलेला बटाटा कीस एक वाटी, पापडाचे लहान तुकडे अर्धी वाटी, हिरव्या मिरच्यांचे तुकडे पाऊण वाटी, बारीक चिरलेले कढीपत्तापाला एक वाटी, धने एक मूठ, तिखट मीठ चवीनुसार, अर्धा लिंबू, पिठीसाखर आणि पाव किलो तेल

Pohyacha Chivda recipe in marathi Maharashtrian | पातळ पोह्याचा चिवडा रेसिपी मराठी

Pohyacha Chivda फोडणीसाठी साहित्य

चवीनुसार मोहरी, धने, जिरे, हळद आणि हिंग

Pohyacha Chivda recipe in marathi Maharashtrian | पातळ पोह्याचा चिवडा रेसिपी मराठी

Pohyacha Chivda कृती

सर्वप्रथम पोहे घ्यावेत. ते चाळणीने चालून घ्यावेत आणि कागदावर पसरून उन्हामध्ये ठेवावेत. पोहे थोड्या वेळानंतर जमा करावेत. गॅस वरती कढई तापवायला ठेवावे आणि अर्ध अर्धे करून पोहे चुरचुरीत परतावे.

पातळ पोह्याचा चिवडा रेसिपी मराठी

Pohyacha Chivda recipe in marathi Maharashtrian | पातळ पोह्याचा चिवडा रेसिपी मराठी

त्यानंतर पुन्हा कागदावर पसरून ठेवावेत दुसरी एक लहान कढई घ्यावी. त्यात दोन वाट्या तेल घ्यावे आणि ते गरम करावे त्या तेलात गरम झाल्यावरती बटाटा किस टाकून तो तळून घ्यावा. आणि तो पोह्यांवर टाकावा त्याचबरोबर पापडाचे तुकडे कुरकुरीत तळून पोह्यांवर टाकावेत.

यानंतर थोडे तेल कढईत उरेल त्या तेलात हळद आणि शेंगदाणे टाकून ते खमंग तळून घ्यावेत. त्याच्यातच खोबऱ्याचे काप टाकावेत आणि हे व्यवस्थित मिश्रण तळून झाल्यावरती कढईतून काढून पोह्यावर टाकावे. त्यानंतर पोह्यावर थोडी पिठीसाखर मीठ तिखट आणि धने जिरेपूड टाकावी. छोट्याकडे येथील उरलेले तेल आता मोठ्या कढईत घ्यावे. त्यात हिंग मोहरी हळद घालून फोडणी तयार करावे आणि त्यात कांदा मिरच्यांचे तुकडे कढीपत्ता आणि लिंबू पिळून ती धने टाकावे.

Pohyacha Chivda recipe in marathi Maharashtrian | पातळ पोह्याचा चिवडा रेसिपी मराठी

कागदावर पसरलेला चिवडा मोठ्या कढईत टाकून सर्व मिश्रण एकत्र करावे. सर्व मिश्रण काळजीपूर्वक एकत्र करून त्याला पिवळा रंग येईपर्यंत आणि ते चुरचुरीत होईपर्यंत गॅसवर परतत राहावे. सगळीकडे तिखट मीठ चांगले लागले जाईल याची खात्री होईपर्यंत चिवडा हलवत राहावा. जेव्हा चांगली खात्री होईल तेव्हा गॅस बंद करावा. आणि चिवडा गार होण्यासाठी ठेवावा गार झाल्यानंतर चिवडा छान पैकी डब्यात भरून ठेवा. अशा प्रकारे मस्त चमचमीत कुरकुरीत चिवडा तयार झालेला आहे.

Pohyacha Chivda recipe in marathi Maharashtrian | पातळ पोह्याचा चिवडा रेसिपी मराठी

तुम्हाला वरील रेसिपी आवडली असेल तर आम्हाला नक्की कळवा आणि जर आवडली नसेल तर काय सुधारणा करता येईल हे आम्हाला जरूर सांगा. च्या आणखी रेसिपी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

स्वादिष्ट बासुंदी घरी बनवायची आहे ? रेसिपी वाचण्यासाठी क्लिक करा.

पुरणपोळीचा बेत अस्सल महाराष्ट्रीयन रेसिपी शिवाय पूर्ण होणारच नाही. क्लिक करा.

बाळगुटी म्हणजे काय ? आणि त्याचा वापर कसा करावा ?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *