Positive Marathi Poems On Life

जीवनातील घडामोडी आणि आयुष्याच्या वाटेवर | 2 best Positive Marathi Poems On Life

मुकेश मुकिंद वानखेडे आणि सौ. पुष्पा सदाकाळ यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Positive Marathi Poems On Life विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Positive Marathi Poems On Life

स्पर्धे करिता
काव्यबंध समूह आयोजित
साप्ताहिक स्पर्धा
विषय :–आयुष्य

जीवनातील घडामोडी | Positive Marathi Poems On Life

जीवनातील घडामोडी आणि आयुष्याच्या वाटेवर | 2 best Positive Marathi Poems On Life

मानवी जन्म घेतला असता
जीवनात घडामोडी घडतात
तोची सर्वावर मात करून
मानव आयुष्य पूर्ण जगतात…..१

बालपण जगत असताना
शिक्षणाला असे महत्व
परीक्षा उत्तीर्ण होताच
कळतात अभ्यासाचे तत्व….२

आई बाबा रागावतात
म्हणे करीत का नाही अभ्यास
शिकून सवरून मोठा हो
लागेल स्वकमाविन्याचा ध्यास..३

तरुणपणात प्रवेश करताच
परीश्रम करावे रोजी रोटी साठी
ठोकर लागूनी प्रत्येक ठिकाणी
पडत असे अनुभवाच्या गाठी……४

पडलेल्या गाठी शिकवितात
संघर्ष तोची जीवनाचा
चाकरी व्यापार करता ना
चालवीता लागे गाडा संसाराचा….५

वृद्धपणात जगत असताना
संसारात ज्या गोष्टी घडतात
त्या सर्व घडामोडीचे वर्णन
शेवटच्या क्षणी आठवतात…..६

अंतिम क्षणी या आयुष्याचा
आधार कुणाचाही नसतो
पैसा अडका घर दार सर्व सोडूनी
एकटाच तो वैकुंठ प्रवासा निघतो…७

मुकेश मुकिंद स. वानखेडे नागपूर
@@@०१/१०/२०२३

Positive Marathi Poems On Life

काव्यबंध समूह आयोजित काव्यलतिका साप्ताहिक स्पर्धा…

दिनांक.. 1/ 10 / 2023.
विषय… आयुष्य..

आयुष्याच्या वाटेवर | Positive Marathi Poems On Life

आयुष्याच्या वाटेवर | 2 best Positive Marathi Poems On Life

अडीअडचणींना घेऊन कवेत
आशा स्वप्नांची गगन भरारी,
कष्टा सोबत  आत्मविश्वास
उभी आयुष्याच्या वाटेवरी

येवोत किती ही वादळवारे
संय्यमाला नित हात मिळवणी,
विषण्ण मनाला नाही थारा
आस ध्येयपूर्ती ची ठेवूनी

जबाबदारीच्या चढते शिड्या
अनुभवाची शिदोरी घेवुनी,
स्वीकारीले पैजेच्या विड्या
संसार रथी नाती जपुनी

कधी न्हाऊन सुख-दुःखी
राघूमैना एकच विचारांनी,
सजविते आशेचे मयूरपंख
घरात हसरे तारे पाहुनी

आयुष्याच्या या वाटेवर
 भेटले लबाडलुच्चे दुष्कर्मी,
मोडून  काढली  पाळेमुळे
धन्यता मानली  दानधर्मी

आयुष्याच्या वाटेवर मी
सत्संगात चाखला  गोडवा,
जगण्या मरण्यावर  प्रीती
अर्थबोध जाणला नवा

 लुटावा आयुष्याचा आनंद
मनःशांतीचे दैवत पूजुन
जाळावा लोभ मोह मत्सर
दीप माणुसकीचा लावुन…
  …
    सौ.पुष्पा सदाकाळ भोसरी पुणे…✍️

best Positive Marathi Poems On Life

Positive Marathi Poems On Life

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *