prem kavita in marathi text

रूप लावण्या आणि आनंद व्हावे | 2 Best prem kavita in marathi text

सौ चंद्रकला अमृतकर आणि नागेश बोंतेवाड यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत prem kavita in marathi text विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

prem kavita in marathi text

काव्यबंद समूह आयोजित काव्य लतिका रविवारी या स्पर्धा
स्पर्धा करिता
पाच 11 20 23
विषय हृदयी वसंत फुलताना

रूप लावण्या | prem kavita in marathi text

रूप लावण्या आणि आनंद व्हावे | 2 Best prem kavita in marathi text

हृदयी वसंत फुलताना
रूप लावण्य तुझे लाजायचे
आकाशातील चमकणारे तारे
मला हळुवार खुणवायचे

पहाटेची गुलाबी थंडी बोचरी
हवा तुझा सहवास
सखे तुझी न माझी प्रीत
नकोस कुणाचा मुखवास

उष्ण ग्रीष्मात फुलणारे गुलमोहर
चैत्रातील सोनेरी कोवळी पिंपळ पाने
पहाटेची सूर्यप्रभा लाली फाकते
वसुंधरा हळूच इंद्रधनुला गोंजारते प्रेमाने

नटखट पहिल्या पावसाच्या सरी सारखं
अवनीला हरित पाझर फुटावा
मिटलेल्या कळी तरु वेलींना
सुखद आस्वाद मिळावा

नभातील खग चांदण्या तारे
तुला बघुनी लाजतील
काजव्यांचा थवा
तुला पाहुनी झुरतील

आजवर मी तुला भाळले
निस्तब्ध होऊनी भुलले
काय किमया केलीस
माझे सर्वस्व तुज अर्पण केले

कसे कधी न काही कळले
माझे मी पण भुलूनं गेले
सखी तू आलीस जीवनी
हृदय माझे भरून गेले

सौ चंद्रकला प्रमोद अमृतकर धुळे

prem kavita in marathi text

काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतिका रविवारीय स्पर्धा

दिनांक : ५/११/२०२३
विषय : हृदयी वसंत फुलताना

आनंद व्हावे | prem kavita in marathi text

आनंद व्हावे | 2 Best prem kavita in marathi text

मनास वेड लागतय सदा
हृदयी वसंत फुलतांना
सखी आनंद मनास होते
रोज रोज तुला भेटतांना

सदा फुलू दे हृदयी वसंत
भेटून होई मनास आनंद
जीवनात सदा लागू दे मला
सदा तुला भेटण्याची छंद

तुझ्या माझ्या प्रेमाचा रंग
दिवसेंदिवस खुलतांना
नातं आपलं घट्ट होतंय
प्रेमात रुसवा काढतांना

वसंतात फुलते निसर्ग
झाडांना येते पालवी नवी
निसर्गाची रंगीन हो अदा
पाहून रचतोय कविता कवी

प्रेमात येते वसंतात मजा
हृदयी फुलते प्रेमाची कळी
प्रेमी प्रेमिकाला वाटते सदा
प्रेम आपले उतरावी गळी

प्रेम यशस्वी झाल्यावरच
आनंद होतोय दोघांना
प्रेम यशस्वी होते सतत
दोघं मिळून सावरतांना

नित्य प्रेम फुलावे फुलापरी
आनंद व्हावे दोन्ही घरी
दोघे प्रेमाचे रक्षण करूनी
जग जिंकावे सांगतात खरी

स्वरचित कविता
✍️ नागेश बोंतेबाड

Best prem kavita in marathi text

prem kavita in marathi text

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *