prem kavita marathi charolya

प्रेम भावना आणि प्रितगंध | 2 Best prem kavita marathi charolya

अरविंद कुळकर्णी आणि सौ. भारती बागल यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत prem kavita marathi charolya विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

prem kavita marathi charolya

स्पर्धेसाठी
काव्यबंध समूह काव्य लतिका आयोजित स्पर्धा दि.५/११/२०२३

विषय – हृदयी वसंत फुलतांना

प्रेमभावना | prem kavita marathi charolya

प्रेम भावना आणि प्रितगंध | 2 Best prem kavita marathi charolya

हृदयी वसंत फुलतांना
थोडे बोलू, काढू सवड
शब्दांच्या महासागरातून
योग्य शब्दांची करू निवड…(१)

आपल्या जोडीदारा सोबत
प्रेमभावना कराव्या व्यक्त
समजत नव्हते कसे बोलावे
ज्या मनातच होत्या अव्यक्त…(२)

मनातच चढाओढ प्रश्नांची
शब्दांनीच का,मौनही भाषा
एकदाचे ठरविले मनोमन
समजून घ्या ही अभिलाषा…(३)

ह्रुदयातील वसंत बोलतो
संगे देहबोलीची भावना
निसर्गाच्या सान्निध्यात
निःशब्द प्रेम कळेल मना…(४)

नशिबाची संगत नसतांना
नियती करी जिवाशी खेळ
एकच मागणे ईश्वरा माझे
कोणावरही न यावी वेळ…(५)

दोघांतील संवेदनक्षमतेने
प्रेमभावनेत जिवंतपणा
निर्विकारपणा असतांना
कशासाठी खाणाखुणा…(६)

मनामनात उठणारे भाव
फुलतांना हृदयातील वसंत
आयुष्यात हवे चिंतन,मनन
घेऊ नये क्षणभरही उसंत…(७)

वसंतातील निसर्ग बहराने
पालवी फुटते आयुष्याला
उत्साह ओसंडून वाहतच
नवभरारी मिळे भविष्याला…(८)

अरविंद कुळकर्णी
मलकापूर
जिल्हा – बुलडाणा

prem kavita marathi charolya

काव्यबंध समूह आयोजित
काव्य लतिका स्पर्धा
दिनांक 5 नोव्हेंबर 2023
विषय हृदयी वसंत फुलताना

प्रितगंध | prem kavita marathi charolya

प्रितगंध | 2 Best prem kavita marathi charolya

तुज पाहताच क्षणी
मन कमळ उमलले
हृदयी वसंत फुलला
वादळ आनंदाचे उठले

प्रीतगंध दरवळला चहुदिशा
भान जननिंदेचे हरपले
फुलला वसंत हृदयी
विश्व तव मिठीत सामावले

त्रिभुवनाचे सुख
एका क्षणात अनुभवले
विलीन झाले तुझ्यात
वेगळे अस्तित्व ना उरले

एकरूपता एकांत
बहरला आसमंत
निर्मळ झाली प्रेमगंगा
झाला षडविकारांचा अंत

इंद्रधनुष्यापरी मोहक
झाले सुखमय आयुष्य
जन ही सुखावले
पाहुनी प्रेम दृश्य

बहर अल्लड प्रेमाचा
लाजली वसुंधरा
मिलन वेध लागला
जनू धरा अंबरा

सहा ऋतू अनुभवले
सातवा अंतरी फुलला
जसा वृंदावनी रास
कृष्णाचा रंगला

जाणीव संपावी सुखदुःखाची
मन असेच बेधुंद रहावे
तुझे माझे प्रेम गीत
फक्त पाठी उरावे

हाती देऊन हात तुझ्या
थेंब टपोरे झेलताना
विश्वविजेत्याचा आनंद मनी
पावलावर पाऊल तुझ्या टाकताना

दुःखही अवर्णनीय सुखद वाटते
सहवासात तुझ्या असताना
जगाची नसते तमा
तुझ्या बाहूपाशात मिटताना

मन मंदिरी चिंतन
फक्त तुझे चालते
श्वासा श्वासांबरोबर मन
राज राज बोलते

सौ भारती राजेंद्र बागल
वडूज सातारा

Best prem kavita marathi charolya

prem kavita marathi charolya

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *