Pune to Mumbai cycling:-थ्रिलिंग सायकल प्रवास
पुणे ते मुंबई सायकल प्रवास म्हणलं की जाम एक्साईटमेंट असते, कारण ज्यां सायकलिस्टसनी कधीच तो प्रवास अनुभवला नाही त्यांना तो फार थ्रिलिंग वाटतो, तर ज्यांनी हा प्रवास एकदा जरी केला, तर त्यांना त्यातली मजा काय हे माहीत असतं, म्हणतातना की “समटाईम्स जर्नी इज ब्युटीफुल देन डेस्टिनेशन” तसाच काही प्रकार आहे तो. फन एंड फ्रोलिक राईड. आणि वेरिएशन् म्हणाल तर जाज्वल्य आभीमान किंवा माज करावं अश्या पुण्यातून, पुण्यातल्या सायकलिस्टस ची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळा इथे पहिली विश्रांती, उत्तरेतल्या डोंगराळ प्रदेशातल्या रस्त्यांना लाजवतील असे खंडाळ्याच्या जुन्या हायवे चे नागमोडी वळणं आणि चित्तथरारक उतार, देहू रोड ते लोणावळा आणि खोपोली ते पनवेल इथला जास्त अतिक्रमण न झालेला निसर्गाच्या सानिध्यातला रोमहर्षक प्रवास, आणि शेवटी जवळ जवळ शेवटचा टप्पा असून ही, नवी मुंबई आणि बृहन्मुंबई परिसरातील आव्हानं देणारे लांबलचक फ्लाईओव्हर, आजुबाजूस असणारे भव्य टॉवर्स ने सज्ज परिसर जो मुंबईची भव्यता दर्शवतो.
गेटवेच्या जवळ आलो की तिथले ब्रिटिशकालीन इमारती वं मोनुमेंट्स जे आजही इतिहासाची साक्ष देतात आणि बेट असल्याकारणाने व्यापारिक दृष्ट्या मुंबई आजच नाही तर ऐतिहासिक काळा पासून व्यावसायिक केंद्रबिंदू का आहे ह्याची जाणीव करून देतात. वाटेत माझं लहानपणीचं मुंबईतलं घर आणि आताही तिथे असणारे मित्रवर्ग किंवा वर्गमित्र (😃😃) त्यामुळे जाता जाता पुन्हा लहानपण जगता आल्यामुळें इतरांपेक्षा मलातर ही राईड विशेष आवडते. पण हो, जर मुंबईच्या क्लायमेटशी ॲक्क्लाईमेटाईज झाले नसाल तर मात्र सावधान, ठराविक ऋतू मध्येच ही राईड करावी, साधारण पावसाळा किंव्हा मस्त थंडी असताना.
तर १५ ऑगस्ट आणि १२ सप्टेंबरच्या पुणे-मुंबई राईड नंतर पुन्हा एकदा मुंबई सायकलिंगचा योग आला तो नो-वरीज ग्रुपच्या आनंद दादांनी ७३व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्लॅन केलेल्या पुणे-मुंबई सल्यूट राईड निमित्त.
Pune to Mumbai cycling:-थ्रिलिंग सायकल प्रवास….Pune Cycling Events

आनंद दादाची सायकलिंग राईड म्हणलं की नियोजनबद्ध कारभार, कोनतीही चिंता केल्या बगैर बिनधास्त सहभागी होण्याचे ठिकाण. त्यांच्या ह्या कामाला हातभार लागावा म्हणून यंदा सायकलिंग बिब, पार्टीसीपेंट्स डिटेल्स सारखी काम मी आणि तनुज भाईने वाटून घेतली. व्हॉट्सॲप ग्रुप तय्यार झाला, व्हायरल आणि कोरोनाच्या लाटे मुळे पार्टीसिपेंट्स ॲड डिलीट होत होते, जुन्या राईड मध्ये एकत्र असलेलं कुणी ॲड झालं की वेगळाच आनंद वाटायचा, पण राईड मध्ये एक गोष्ट नक्की होते, आता अनोळखी असले तरीही राईडच्या शेवट पर्यंत अगदी मित्र होऊन जातात, तसही म्हणतात ना “बर्ड्स ऑफ सेम फेदर, फ्लॉक टूगेदर” कुछ हटके तो सभी होते है, इसीलिए जुड़ जाते है.. ह्यावेळेस मंदार, सनुप, योगेश, आर्यन आणि समीर-शौनक असे पिता-पुत्राची जोडी हे असे हटके सायकल साथीदार.
तर शेवटच्या दिवसापर्यंत ग्रुप मध्ये सूचना, प्रश्न, डाऊटस असा सिलसिला चालू होता, आणि तो दिवस उजाडला.. अभिमान असलेल्या पुण्याहून, “आमची मुंबई” असं हक्काची आणि आपुलकी ने स्वागत करणाऱ्या मुंबई कडे जायचा. चांदणी चौक पर्यंत, तनुज भाई, विनायक दादा, आणि पहिल्यांदा एवढ्या लांबचा पल्ला गाठायच धाडस करणाऱ्या, नुकत्याच सायकलिंग सुरू केलेल्या चेतन दादा असे वाटेत भेटलेल्या सर्वांना सोबत घेऊन आम्ही चांदणी चौका पर्यंत पोहोचलो. तिथे संजय पुराणिक काका फ्लॅग ऑफ साठी वाट पाहत होते. ते खास सी-ऑफ करण्यासाठी एवढ्या पहाटे तिथे पोहोचले होते… थिस इज् सायकलिंग फ्रेटरनिटी..🙏🏻
प्रवास सुरू झाला, देहूरोड Y जंक्शन ला चहा, लोणावळ्याला मनशक्ती येथे आवडीनुसार अल्पोपहार, लोणावळा झीरो माईल आणि आमृतांजन ब्रीज इथे फोटोग्राफी, असं करत आम्ही खंडाळा उतरलो.
Pune to Mumbai cycling:-थ्रिलिंग सायकल प्रवास ….Pune Cycling Events

अगदी मजेशीर सर्व चालू असताना खोपोली मध्ये रंबलर् स्ट्रिप आणि डीव्हायडर मध्ये तोल न सावरता आल्यामुळें ५५ वर्षाचे यंग सायकलिस्ट योगेश लाहोटी दादा पडले, गर्दी जमा झाली, मागे दोनच मिनिटाच्या अंतरावर आम्ही चार सायकलिस्टस होतो, लोकल बघ्यांच्या सहायातेने मी आणि एका सायकलिस्ट ने योगेश दादांना रस्त्याच्या बाजूला घेतलं, मेडिकल समोरच असल्या मुळे, त्वरित कॉटन आणि savlon ने जखम पुसून मी प्रथमोपचार केला. तेवढ्यात मंदार ही आला, त्याच्या साहाय्याने वर क्लिनिक मध्ये घेऊन जाणार तर आमची बॅकअप वेहिकल घेऊन आनंद दादा पोहोचले.. ते आल्या नंतर खरंच डबल आत्मविश्वास वाढला. आता पर्यंत घाबरवून सोडलेल्या बघ्यांनी दिलेल्या सल्ल्या पेक्षा, “योगेश तू एकदम बरा आहेस, आणि बॅकअप असली तरीही तू सायकल वर म्हणालास तरी राईड पूर्ण करू शकणार इतकं किरकोळ आहे”, असा कॉन्फिडन्स दिला.. क्लिनिक मध्ये घेतले वं पुढे डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करून त्यांना ओला ने परत पुण्याला पाठवले..

शो मस्ट गो ऑन म्हणत बाकीच्या सायकलिस्टस ने अत्यंत सावधपणे पुढचा प्रवास सुरू केला. जेवणाच्या वेळेत pre-planned हिमालया पंजाब रेस्टॉरंट मध्ये पोहोचलो व न्याहारी उरकून पुढे चालते झालो, मुंबईचा असल्यामुळे हॉटेलचे नियोजनही ह्यावेळेस मी केले होते, जेवण उत्तम होतं, त्यामुळे सगळे सुस्तावलो. पण मग जुईनगर येथे थोडा वॉटर ब्रेक घेऊन वाशी, चेंबूर, सायन दादर, मार्गे भव्य २.५ किलोमीटरचां लालबाग फ्लाईओव्हर पार केला, पण पुढे अगदी कडकं शिस्त दाखवणारे ट्रॅफिक पोलिसानंमुळे जेजे फ्लाईओव्हर नाही घेता आला, खालून मोहम्मद अली रोड ने जावं लागलं, त्याने खरंच स्पीड ची वाट लागली, तो एरीया माहीत असणाऱ्यांना लक्षात येईल, का ते… जाम गर्दी, आणि डोंगरी ते दुबई ज्यावर बरेचं बॉलिवूड चित्रपट बनतात तो डोंगरी एरिया. ते सगळं पार करून गेटवे ला पोहोचलो तेंव्हा सेन्स ऑफ अचिवमेंट एवढं टोकाचं होतं की काय सांगू! ….Pune Cycling Events

अश्या प्रकारे स्वातंत्र्य-लढ्यात आणि भारताची एकात्मता अबाधित राहण्यासाठी सर्वस्व अर्पिलेल्या शहीद हुतात्म्यांना अभिवादन श्रद्धांजली आणि आदरांजली वाहण्यासाठी व तसेच पर्यावरणाची गरज ओळखून सायकल चे महत्व प्रचार प्रसार करण्याचा हेतूने आयोजित केलेल्या ह्या सल्यूट राईड मोहिमेची सांगता करण्यात आली.
लेख आवडला असल्यास व्हिडिओ नक्की पाहा व आपला अभिप्राय कळवा. धन्यवाद 🙏🏻
Writer:- Mr. Abhijit Toradmal

Check My Youtube channel for Cycling Videos
Too Good writeup . Well described facts.
Thank you so much 💖
खुपच सुंदर प्रवास वर्णन आहे.
Thank you so much 💖
Apratim Lekh… swatha pune Mumbai pune cycling kelya sarkhe walte.. likhit raha… wat paha pudhil lekhachi….dhanywad.
Thank you so much 🥰
Very nice writeup 👏🏻👏🏻👏🏻👏🏻
Thank you so much 🥰
Too Good
Thank you
सर्वांचे अभिनंदन 💐 अप्रतिम वर्णन… आवडलं 👍
मेंबर……
सोलापूर सायकल क्लब
सोलापुर
@9890183656
Thank you so much 💖
Very good and amazing ride keep it up , will love to join
Thank you so much!
Khupch sundar varnan hot…live chalu ahe asa vatla..asech aankhi hi sundar travel blog yet raho..!!👍
Thank you so much!
Khupch sundar 👌👌👏👏💐
Thank you so much 🥰
Khupch Sundar 👌👌👏👏
Congratulations 💐
Thank you so much 🥰
Wow kay sunder lekh lihila ahe tumhi. Really thrilling ride experience. Really proud of you.
Thank you so much 🥰
खूपच सुंदर आणि छान माहिती दिली आहे. असेच छान लिहीत रहा.
Thank you so much 🥰
Very nicely written 👌👏👍
Thank you so much
Pingback: लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याची भन्नाट पद्धत - Maza Blog