मराठी कविता राग

मराठी कविता राग रुसवा आणि गप्पा

मराठी कविता – राग रुसवा

नाकावरचा शेंडा,होतो लाल लाल
फुग्यासारखे टम्म,फुगतात दोन्ही गाल
हे सगळं होत जेव्हा येतो राग
एकमेकांत भांडण झाले,की होतो त्रास
नाही खायचे म्हणतात,अन्नाचा घास
वातावरण पेटल्यास,होतात सगळे उदास
राग आल्यावर,बसतात जाऊन दूर
घरातील माणसांना,लागते चुर चुर
लहानगींच नाही तर,मोठेही वागतात तशीच
रागातच म्हणत असतात,काय हे आमचं नशीब
राग येताच वाटत,काय करावं नि काय नाही
मोठमोठ्याने बोलण्याशिवाय,सुचतच नाही काही………………….मराठी कविता राग रुसवा आठवण कविता best friend मैत्री
विसरून जातात आपली,तहान आणि भूक
राग आहे तोवर,मान्य नसते चुक
थोडे काही झाले,की आलाच धावत
कटू बोले पर्यंत,नाही त्याला जावत
घरातील माणसात,येतो मग अबोला
चीड येण्यासारखं,वळण पडत जिभेला
गेला एकदाचा निघून,की मन होते शांत
पण चिडल्यामूळे मनात,वाटते मात्र खंत
आहे जोवर माणसं,नका करू भांडण
नाते जपून ठेवणे,यातच आहे आनंद!

मराठी कविता – गप्पा

पहाट होता सुरू होते कलकल सर्वांची
गप्पा असल्या तरच शोभा वाढते घराची
थोरामोठ्यांची गप्पा मारणे हीच असते करमणूक
विनोदही असले त्यात तर मज्जा येते खूप
गप्पा मारल्या नेच कळते आयुष्यातील सुख-दुःख
अशाच चेष्टामस्करी ने सरते पुढे आयुष्य
असला आपल्या आयुष्यात कोणावर ही अबोला
पण कायमचा कलंक लागतो त्यांच्यातील नात्याला
आपले जीवन आहे थोडे नका घालू वाया
प्रेमाने दोन शब्द बोला पहा किती मिळते माया…………………मराठी कविता राग रुसवा आठवण कविता best friend मैत्री

मराठी कविता राग

संपलेलं नातं

दुरावलेली ती नाती सगळी हरवले ते क्षण,
मिटून गेली आठवण सगळी हरपले ते मन,
विखुरलेल्या नात्यांना पंख कसे फुटले,
का कुणास ठाऊक नातेच तुटले,
जीवन रुपी संसारात इतके कसे गुंतले,
का वाटतंय मनात आपले नातेच संपले

कवियत्री कु. स्नेहल डहाळे

आपण वाचत होतात “मराठी कविता राग रुसवा आणि गप्पा”. तुमचे अभिप्राय आम्हाला नक्की कळवा आणि आमची हि कथा कृपया तुमच्या मित्रांशी शेअर करा.

स्वप्नील खैरनार यांचे आणखी लिखाण वाचा – Marathi Poem On Love

Made In India Smartphone Review वाचण्या साठी क्लिक करा

विविध लज्जतदार पाककृती मराठी मध्ये वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Please Share and Subscribe to get latest posts by us.

Connect with us.
If you can write in marathi and searching for good platform.
…………………मराठी कविता राग रुसवा

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

As you found this post useful...

Follow us on social media!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
13 × 6 =