रक्षाबंधन या नावातच या सणाचे महत्व समजते. ज्यात बहीण भावाच्या प्रेमाची व्याख्या आहे. Raksha Bandhan 2023 येणार आहे बुधवारी 30 ऑगस्टला. बहीण या दिवशी भावाला ओवाळून त्याचा हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयी प्रेम व्यक्त करते. या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम, पराक्रम, सय्यम आणि साहस. निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भावा-बहिणीचं नातं. पूर्वजांनी भारतीय संस्कृती मध्ये या नात्याच्या पवित्रतेचा महिमा गायला आहे. आपल्या भारत देशाने संस्कृतीचे उत्तम उदाहरण देऊन मानवाला योग्य दिशा प्रदान केली आहे. स्त्री सम्मान हा सुद्धा या सनामधून दिलेला उपदेश होय. फक्त स्त्री हक्क आणि स्त्रीला वरवर सम्मान देणाऱ्या आतल्या गाठीच्या लोकांना तिचे महत्व कळत नाही. स्त्री ही माते सामान असते, तिची पूजा केली पाहिजे हे समजून सांगायला हवे.
Raksha Bandhan 2023 Message रक्षाबंधन संदेश

‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:| यात्रेतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया:|’
Raksha Bandhan 2023
ज्या कुळामध्ये स्त्रीची पूजा, म्हणजेच मान- सन्मान, सत्कार होतो, तेथे सुशील, गुणी व उत्तम मुलं होतात आणि जिथे स्त्री सन्मान नसतो तिथे कुठलीही प्रगती होत नाही. स्त्रीला वाकड्या नजरेनं म्हणून न बघता आई म्हणून ओळखावे ही शिकवण भारतीय संस्कृती देते.
मानवाला योग्य दृष्टी दर्शवणारा सण म्हणजे रक्षाबंधन! भावाच्या डोक्यावर टिळा फक्त त्याची शोभा वाढवणे किंवा मान म्हणून न लावता त्याला आपली जवाबदारी समजून सांगणे आणि त्याबद्दलचे विचारची जाणीव करून देणे असते. मानवाची दृष्टी बदलण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी भारतीय संस्कृतीमध्ये दर्शवण्यात आलेल्या आहेत. फक्त टिळा लावण्या मागचा उद्देश आपली पूजा करणे एव्हडेच नसून माणसाची दृष्टी बदलणे होय. बहीण आपल्या भावाला तिसरा डोळा देत असते ज्याने करून ती त्याला त्रिलोचन बनवते म्हणजेच प्रेमळ भाव, सन्मान, भावना प्रदान करते.
Raksha Bandhan 2023 Message रक्षाबंधन संदेश
आपल्या बहिणीचे संरक्षण आणि तिची मान कायम ताट असावी याच वचन भाऊ आपल्या बहिणीला हातावर राखी बांधून घेताना देतो. पण काही लोकांमध्ये अशी भावना आहे कि स्त्री म्हणजे आपल्या पायावरची धूळ आणि तिला हवी तशी वागणूक देऊन तिची मस्करी करून तिचा मानसिक छळ केला जातो. तीला फक्त घरची भांडी धुनी काढणारी आणि सर्व काम करणारी व्यक्ती म्हणून असंख्य लोक बघतात. जर समाजाचा अर्धा भाग हा असा दबाव खाली जगत असेल तर ह्या गोष्टीवर विचार करण्याची वेळ आली आहे असे म्हणणे चुकीचे मुळीच ठरणार नाही. असे वागणे अतिशय चुकीचे असून लहानपणा पासून मुलींसोबत मुलांना सुद्धा घर कामात मदत करण्याची सवय लावली तरच खऱ्या अर्थाने समाजाचा संपूर्ण विकास होईल. तरच रक्षा बंधन हा सण खऱ्या अर्थाने साजरा होईल. जय महाराष्ट्र.
Raksha Bandhan 2023 Message रक्षाबंधन संदेश

प्रिय ताई,
सर्वात आधी तुला ” रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्या”.
या रक्षाबंधनाच्या दिवशी मी तुला वचन देतो,
जेव्हा कधी तु मागे वळून बघशील,
मी कायम तुझा साठी उभा राहील.
ताई, मला माहित नाही,
पुढील जीवनाचे वळण कसे असेल,
पण मी वचन देतो
जी माझा मनातली जागा तु घेतली आहेस
ती दुसरी कोणीही घेऊ शकणार नाही.
Raksha Bandhan 2023 Message रक्षाबंधन संदेश
जीवन खूप सुंदर आहे फक्त तुझा मुळे, माझी गोड बहीण. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्या!!!
तुझं सुख हेच माझं सुखी जीवन आहे, माझी छोटी लाडकी बहीण. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्या!!!
मी खूप खुश आहे कारण देवाने मला सुंदर सुंदर अशी भेट दिली आहे ती म्हणजे तू, माझी ताई. खूप खूप रक्षाबंधनाच्या शुभेच्या!!!
Raksha Bandhan 2023 Message रक्षाबंधन संदेश
भावासाठी रक्षाबंधनाच्या शुभेच्या: Maza Blog
प्रिय भावा,
मला माहिती आहे मी तुझ्याशी खूप भांडते, पण आज या रक्षाबंधनाच्या शुभ दिवशी मी तुला सांगू इच्छेते कि तूच माझं जग आहे आणि तुझा सारखा भाऊ असणे माझासाठी गर्व आहे.
Author: Chaitanya Thorat

Our Verified Blogs
Review of Made in India Smartphone POCO
Raksha Bandhan 2023 Message रक्षाबंधन संदेश
Nicely written ?
Thanks for your interest..?
Thanks for comment. Please share ?