Raksha Bandhan Marathi Calligraphy

बंध रेशमाचे आणि नाते हळवे राखीचे | 2 Best Raksha Bandhan Marathi Calligraphy Kavita

भारती कुलकर्णी आणि सौ कविता किरण वालावलकर यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Raksha Bandhan Marathi Calligraphy विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

2 Best Raksha Bandhan Marathi Calligraphy Kavita

बंध रेशमाचे | Raksha Bandhan Marathi Calligraphy Kavita

बंध रेशमाचे | Raksha Bandhan Marathi Calligraphy Kavita

श्रावण हासरा आला
रक्षाबंधन सण आला
भावा बहिणीच्या नात्याला
हर्ष मनात, आनंद झाला..[१]

श्रावण हासरा आला
बहिण भावाच्या नात्यातला
गोडवा अधिक वाढला
रक्षाबंधन राखी बांधू चला…[२]

श्रावण हासरा आला
पौर्णिमेचा चंद्र झळकला
गोरा गोरा पान रुपेरी
मला राखी बांध म्हणाला…[३]

श्रावण हासरा आला
औक्षण ते करू भावाला
शशिकर म्हणतो मजला
औक्षण कर या चंद्राला…[४]

श्रावण हासरा आला
बहिणीचे रक्षण करू चला
जागुया या वचनबद्धतेला
अतुट बहिणीच्या प्रेमाला…[५]

श्रावण हासरा आला
रेशीम धागा बांधू हाताला
राखी पौर्णिमेचा सण साजरा
सुंदर धागा प्रेमाने बांधला….[६]

श्रावण हासरा आला
गंध लावूया कपाळाला
औक्षण ते भावाला
आयुष्य सुंदर फुलविण्याला…[७]

श्रावण हासरा आला
प्रेमबंध हा भावा बहिणीचा
मनाला अधिक भावला
विडा उचलला रक्षणाचा…[८]

स्वरचित,

[C][R]

भारती कुलकर्णी
नौपाडा, ठाणे.
नं.९००४८८६०३६

2 Best Raksha Bandhan Marathi Calligraphy Kavita

नाते हळवे राखीचे | Raksha Bandhan Marathi Calligraphy Kavita

नाते हळवे राखीचे | Raksha Bandhan Marathi Calligraphy Kavita

नाते हळव्या राखीचे
मनी जपून ठेवावे
रक्षबंधनाला सदा
नयनात उजळावे १}

ओढ मनाला लावते
नाते रेशीमगाठीचे
कधी नाही तुटणाऱ्या
अशा अतूट प्रितीचे २}

राखी नसते केवळ
भाऊ बहिणीचा धागा
काळजात त्याची सदा
वसलेली अशी जागा ३}

राखी असते प्रतीक
नात्यातल्या रक्षणाचे
घट्ट बांधणाऱ्या जणू
अशा राखीच्या धाग्याचे ४}

रक्षाबंधनाचा सण
मन करतो हळवे
नाते गुंफूनी मनात
देतो चैतन्य हे नवे ५}

राखी पौर्णिमेच्या दिनी
राखी बहिण बांधते
नाते अमूल्य ह्रदयी
आजीवनी रेखाटते ६}

नाते सदैव पवित्र
असे भाऊ बहिणीचे
फुलवते प्रीत मनी
असे निस्वार्थ ओढीचे ७}

सौ कविता किरण वालावलकर
दावणगिरी , कर्नाटक

2 Best Raksha Bandhan Marathi Calligraphy Kavita

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

2 Best Raksha Bandhan Marathi Calligraphy Kavita

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
26 ⁄ 13 =