Raksha Bandhan Marathi Caption

स्नेहभावना आणि मायेचं रक्षाबंधन | 2 Best Raksha Bandhan Marathi Caption

गोविंद कुलकर्णी आणि अंकुश कुपले यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Raksha Bandhan Marathi Caption विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Raksha Bandhan Marathi Caption

स्नेहभावना | Raksha Bandhan Marathi Caption

स्पर्धेसाठी
काव्य बंध समुह
मराठी साहित्याचे शिल्पकार
दिनांक: १७/८/२०२३
विषय रक्षाबंधन:

स्नेहभावना | Raksha Bandhan Marathi Caption

घन निळा बरसे श्रावणात
भिजवूनी लाजतो अंगणात
बहिण भाऊ भेट पावित्र्यात
पुनवेचा चंद्रमा आकाशात….१

फुले गुलाब काट्या समवेत
प्रेम भावना बहीण भावात
रक्षाबंधन करती जोशात
रक्षती सदा स्नेह भावनात …२

करोडपती सुरंगीचा गंध
बहिण असे सुगंधात दंग
भाऊ दिसता हास्याचा रंग
बहिण भाऊ प्रेमामध्ये गुंग…३

बंध रेशमाचे, बंध नात्याचे
अतूट बंधन, श्रद्धा, प्रेमाचे
रक्षाबंधन बहिण भावाचे
अजोड अशा प्रेम भावनांचे…४

प्राजक्ताचा सडा पडे अंगणी
बहिण भावाची असे साजनी
प्राजक्ताचा गंध दरवळे मनी
बहिण भाऊ असती इमानी…५

गोविंद कुलकर्णी
नौपाडा ठाणे


मायेच रक्षाबंधन | Raksha Bandhan Marathi Caption

काव्यबंध समुह
काव्यलतिका स्पर्धा
विषय – : रक्षाबंधन
दिनांक – :१७-८-२०२३

मायेच रक्षाबंधन | Raksha Bandhan Marathi Caption

आली होती नारळी पौर्णीमा रक्षा बंधनाची नांती जपायला ॥१॥
बहीन भावाची नांती अतुट प्रेमाची बहिनीने भावाच्या हातात बांधली रेषीम बंधनाच्या गांठी ॥ २॥
श्रावणात आला रक्षाबंधनाचा सण बहिन भावाचं जपलं मन उंदिर मांजरा सांरख दिलधन॥३॥
बहीनीने बांधलीभावाच्या हातात आपुलकीची राखी त्यातुन मिळाली प्रेमाची नांती ॥४॥

बहीन येई माहेरी भाऊ वाट पाहतोय आपल्या घरी हिच ती भावा बहीनीची अतुट नांती ॥५॥
कुठल्यांच नात्यात अशी नसेल ओढ हि भावा बहिनी ची प्रेमा मधील गोड ॥६॥
आहे जगात भारी आपली हि भावा बहीनी ची जोडी त्यात आहे आई वडीलांची प्रेमळ नांती ॥७॥
किती झाले रुसवा फुगवा, भांडण तंटा तरी चुकणार नाही भावा बहीनी ची हि प्रेमळ माया ॥८॥


पवित्र नात्यामध्ये आहे भावा बहीनीची आमृताहुनी गोडी निच आहे भावा बहीणी च्या रक्षाबंधणाची गोडी॥९॥
भाऊ देई बहीनीला मायेचा सागर बहीण देई भावाला अतुट प्रेम हेच ते रक्षा बंधणाच जगाहूनअतुट प्रेम॥१०॥
लहान पणापासुन देत आलीस तु आई सारखी माया ममतेच खर रूप हेच ते रक्षाबंधनाच माये च सुख ॥११|l

अंकुश कुपले कोल्हापूर

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *