Raksha Bandhan Marathi Charoli

रक्षाबंधन आनंदाचा आणि दुधावरची साय | 2 Best Raksha Bandhan Marathi Charoli

कवी .युवराज कृष्णा पाटील आणि प्रा.शरदचंद्र काकडेदेशमुख यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Jivan Gane Marathi Poem विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

रक्षाबंधन आनंदाचा | Raksha Bandhan Marathi Charoli

रक्षाबंधन आनंदाचा आणि दुधावरची साय | Best Raksha Bandhan Marathi Charoli

श्रावणाच्या मंगल्यात
वाहे सुहासचंदन
भाऊ बहिणीचा सण
आला रक्षाबंधन…
१.
दिन नारळी पौर्णिमा
येई सागरा भरती
कोळी बांधव मागती
सुखी.. समृद्धी धरती…
२.

लेकी सासुरवाशीन
लागे माहेरची ओढ
उब मायेच्या मिठीची
खाऊ घाली गोड..धोड …
३.
भाऊ बहिणीचे नाते
जशी आभाळ धरणी
जसा फुलाला सुगंध
धन्य निसर्ग करणी…
४.
रक्षाबंधन सणाला
बहिण करते औक्षण
राखी बांधून हातात
मागे भावाचे रक्षण…
५.
पाटा रांगोळी सजते
भरावीते पुरणपोळी
माय ..बापा संगतीत
भरे आनंदाने झोळी
६.
घाली साकडे देवाला
सुखी ठेव बंधुराया
इडा पिडा सारी टळो
ठेव तुझी कृपा छाया…
७.

दुजी साक्षात आईचं
माझी बहीण माऊली
माया ममतेचा झरा
छत्र कृपेची सावली….
८.
काही नाहीच मागत
स्वतःसाठी धनदान
त्यागमूर्ती माझी ताई
साऱ्या विश्वाची ही शान…
९.
ऐका संदेश बंधुनो
दृढ निश्चय करूया
करू स्त्रियांचे रक्षण
प्रण मनात धरूया…
१०.

रक्षाबंधन आनंदाचा
संस्कृतीच्या अमृतधारा
भाऊ बहिणीची माया
कल्पवृक्ष गार वारा….
११.

कवी .युवराज कृष्णा पाटील
मु. धुमडेवाडी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर

संपर्क क्रमांक.९७३०५१७६६८


Raksha Bandhan Marathi Charoli

दुधावरची साय

Best Raksha Bandhan Marathi Charoli

नव्हे फक्त एकच दिवस ,
तुझी रोजच आठवण होई,
मौल्यवान प्रेम दिलस तू .
ताई, कसा होऊ मी उतराई .।।१।।

स्पष्ट आठवतय ,बहिणाबाई,
स्थळ काळ वेळ आणि मास,
स्वःता भुकेली राहून ,
तू दिलेला ,घासातला घास ।।२।।

तापाने, फणफणलेला मी ,
ती भयानक काळी रात्र,
कपाळावर ठेवत होतीस,थंड पट्टी
तरीही थिजून गेलेले गात्र ।।३।।

होता, दूर देशी जन्मदाता ,
दूर होती आपुली माय ,
काहीच नाही तू कमी केलस
खरच तू ग, दुधावरची साय ।।३।।

झालं गेलं तू विसरुन जा
राग नाही गं माझ्या मनी ,
विनवितो तुजला मी ,
रक्षाबंधनाच्या दिनी ।।४।।

सणांपाठोपाठ सण गेले
गेला दिवाळी दसरा
एकटा पडलोय ग मी
आठवतोय चेहरा तुझा हसरा।।५।।

वाट पहातोय तुझा सहोदर
ये झडकरी राखी बांधायला
डोळे तुझ्याच वाटेकडे ,येशील ना
गैरसमजातून तुटलेलं नातं सांधायला।६।।

प्रा.शरदचंद्र काकडेदेशमुख…
पुरंदर..पुणें.९४२२३०४०५५


Raksha Bandhan Marathi Charoli

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Raksha Bandhan Marathi Charoli

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
21 × 9 =