सौ. समिक्षा बाळासाहेब जामखेडकर आणि सौ.स्वाती रामचंद्र कोरे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Raksha Bandhan Marathi Message Kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
Raksha Bandhan Marathi Message Kavita
राखी पौर्णिमा | Raksha Bandhan Marathi Message Kavita

सासरी असते बहीण
भावाची वाट बघते
राखी पौर्णिमा आली
कामे सगळी आवरते
रक्षाबंधनसाठी आवडीची
राखी घेते ती भावाला
कधी जाईल माहेरी म्हणे,
आठवणीच्या त्या गावाला
रक्षा करण्यासाठी बहिणीची
वचनबध्द तो असे
बहिणीला मूळ जाऊन
मनी आनंदाचे तरंग दिसे
धागा नसतोच मुळी तो
असतो मायेचा ओलावा
बांधत असते सुख समृद्धिसाठी
वेड्या बहिणीची वेडी माया
लहानपणी चिडवणारा भाऊ
जबादरिने वागत असतो
बहिणीचे मन तो आता,
कधीच दुखवत नसतो
काय पाहिजे ताई माघ
मन त्याचं आभाळ होतं
किती पवित्र सुंदर असतं
बहीण भावाच अनमोल नातं
दरवर्षी असेच रक्षाबंधन नेहमी
सर्व बहिणीचे सुरक्षा कवच बनावे
आपल्या बहिणीसारखे प्रत्येकाने
इतरांच्या बहिणीला जपावे
सौ. समिक्षा बाळासाहेब जामखेडकर संभाजीनगर
Raksha Bandhan Marathi Message Kavita
धागा सौख्याचा | Raksha Bandhan Marathi Message Kavita

इतिहास साक्षी आहे
बंधू भगिनी नात्याला
राणी कर्मावती धाडी
राखी राजा हुमायूला ।।१।।
द्रौपदीने केली राखी
चिंधी बांधे श्रीकृष्णाला
नसे कोणी भाऊ तर
सखी ओवाळी चंद्राला ।।२।।
छान सुरेख धाग्यात
नाते पवित्र गुंफले
ममतेचा मांगल्याचा
साज लेवून सजले ।।३।|
सभोवती रंगावली
मधोमध ठेवू पाट
टिळा शोभे कुंकूवाचा
माझ्या बंधूचा गं थाट. ||४||
राखी नसे फक्त धागा
त्यात वसतो विश्वास
राहो सुखी भाऊ माझा
हाच बहिणीचा ध्यास ।।५।।।
दूर असून ही जवळ
असल्याचा भास आहे
देशासाठी लढणारा
हर भाऊ खास आहे ।। ६।।
मायेच्या या धाग्यासवे
सजलेत किती क्षण
भाऊ लाभे तुझ्यासम
तृप्त झाले माझे मन।।७।।
असे अखंडित राहो
नाते बंधू बहिणीचे
सौख्य लाभावे तुजला
बस्स मागणे मनीचे ||८||
सौ.स्वाती रामचंद्र कोरे
तालुका कवठे महांकाळ
जिल्हा सांगली
मो.9096818972
Raksha Bandhan Marathi Message Kavita
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
Raksha Bandhan Marathi Message Kavita