वीणा पाटील आणि सौ. अनिता डोंगरवार यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Jivan Gane Marathi Poem विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
Raksha Bandhan Marathi Messages For Brother
आनंदी क्षण | Raksha Bandhan Marathi Messages For Brother
काव्य बंध समुह, काव्य लतिका….
17/8/2023
विषय….. रक्षाबंधन

आला ग श्रावण महिना
माहेराची येई आठवण
मनी लागली हुरहुर
कशातच लागेना मन…..
आज ग रक्षाबंधन
दादा येईल का न्यायला
दारी जाते तिनतिनदा
आला काय मी पहायला..
सासुबाईंची बारीक नजर
मला सारख्या न्याहळीत
पतीदेव चेष्टेने ग मजला
आली गाडी म्हणून चिडवीत..
कावळा काव काव करित
जाई उडत घरावरून
जीव माझा भांड्यात पडे
दादा आता येणार म्हणून..
घेतली ग राखी मी त्यास
लाल मुलायम रेशीमगाठीची
दादा बघून होईल खुश
घेईल बांधून लाडक्या बहिणीची..
बालपणीची येई ग सय
किती भांडाभांडी करत
माझ्या लग्नात दादा माझा
किती हमसून होता रडत..
बहीण भावाचे हे प्रेम
किती असे अतुट निर्मळ
जीव तरसतो भेटण्यास
नाही कसं कुणा बाई कळं….
कधीची मी दारी उभी
आठवांच्या डोहात बुडून
बंधुच्या प्रेमळ स्पर्शाने
क्षणातच गेले बिलगून..
बांधली राखी ओवाळून
किती झाले सांगू आनंदी मन
सुखी निरोगी दीर्घायुष्य लाभो
हेची देवापुढे मनापासून मागणं..
वीणा पाटील कोल्हापूर
Raksha Bandhan Marathi Messages For Brother
रक्षाकवच | Raksha Bandhan Marathi Messages For Brother
काव्य बंध समूह, काव्यलतिका
दि.17/8/2023
विषय- रक्षाबंधन

आला श्रावण घेवुनी हिरवळीला
सोबत आनंदाच्या पर्वाला ,
बहिण भावाच्या पवित्र नात्याच्या
रक्षाबंधनाच्या पवित्र सणाला…
रक्षाबंधनाच्या पोर्णिमेला
जातो भाऊ बहिणीच्या घराला ,
राखी शिवाय मान नाही
भावाच्या कलाईला ….
दृढ बंध हा रेशीमी धाग्याचा
गौरव अतुट नात्याचा ,
नाजुक अक्षय प्रेमाचा
नात्यांच्या गोड बंधनांचा….
बालपणीच्या रूसव्या फुगव्या
आठवणींचा होतो हास्यकल्लोळ
तुझ लाभो यश किर्ती,
हेच मागणे मागते
आजच्या शुभदिनी ,
सुखसौंख्य लाभो नमते देवाचरणी….
वाट वळणाची माझ्या घराला
राखी बांधुन सांगते भावाला,
अंतर नको देशील कधी बहिणीला ,
ओवाळणी स्विकारते तुझी
वाट पाहीन पुढच्या राखीला …
नको येवु देवु रे
एकमेकांच्या मनात धाक,
सदैव कानी पडो
एकमेकांची हाक ….
कृष्ण जसा द्रोपदिस
लाभला भाऊराया ,
माझ्या वाणी इतरही
बहिणीस मिळो तुझी माया…
पोर्णिमेच्या चंद्राला करते विनवणी ,
माय बहिणींची रक्षा होवू दे
जगातील सर्व भावांकडुनी ..
सौ. अनिता डोंगरवार
मु.पो. जि. गोंदिया
Raksha Bandhan Marathi Messages For Brother
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
Raksha Bandhan Marathi Messages For Brother