Raksha Bandhan Marathi Msg

अतूट बंधन आणि रेशमाचे बंध | 2 Best Raksha Bandhan Marathi Msg

सौ. सुनिता कावसनकर आणि सौ.स्वरूपा कुलकर्णी यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Raksha Bandhan Marathi Msg विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Raksha Bandhan Marathi Msg

अतूट बंधन.. Raksha Bandhan Marathi Msg

📙📘काव्यबंध समूह📗📕
काव्यलतिका
गुरुवार स्पर्धा

दिनांक:- १७/०८/२०२३

विषय :- रक्षाबंधन

अतूट बंधन.. Raksha Bandhan Marathi Msg

रेशीमधागा राखीतला नाजूक,
तरीही मजबूत किती  ….
अतूट बंधन प्रेमाचे हे ,
राखी असते हळवी अती …

तुझ्या नि माझ्या नात्यामधली
गुंफण घट्ट अति करते …
दादा तुला पाहता,हसू उमलते,
छबी तुझी समोरी अवतरते ….

आठवती मज कितीक कहाण्या ,
हळव्या हसऱ्या सुंदरशा
धमाल मस्ती आणिक भांडण ,
दिल्या घेतल्या सर्व ठुश्या …

अबोल नाजूक गोंडस छकुली,
बाबांची मी राजस बाळी …
द्वाड,बेरका, मस्तीखोर तु,
या फुलराणीला सदा छळी …

सदाच पखरण प्रेमाची अन
नित्य जिव्हाळा तुज ठायी …
पाठीराखा तु भाऊ माझा,
आठवतोस तु मज ठायी ठायी..

सुंदरशी राखी बांधता तुला
सुशोभित करी मनगटाला…
दादा तु सांगे मज,निश्चिन्त हो,
कटिबद्ध असे मी रक्षणाला…

राखी सण पावित्र्याचा,
बंधू भगिनींच्या प्रेमाचा…
गर्भरेशमी या नात्याचा,
ऋणानुबंध हा जीवनाचा…

प्रेमभावाने जगुनी सारे,
आनंदी जीवन जगण्याचा…
पावित्र्य जपू नात्यांचे,
हाच संदेश राखी पौर्णिमेचा…

सौ. सुनिता कावसनकर
   छञपती संभाजीनगर


रेशमाचे बंध… Raksha Bandhan Marathi Msg

काव्य बंध समूह ,
काव्यलतिका….
दिनांक:-१७/८/२०२३
विषय :-रक्षाबंधन…

रेशमाचे बंध… Raksha Bandhan Marathi Msg

रेशीम धाग्यांनी गुंफले
नाते तुझे नी माझे
रक्षण्या मजला देवाने
तुजला जगी पाठवले…

सण रेशमी सुखाचा
बंध हे मायेचे प्रेमाचे
धाग्या-धाग्यातून ओसंडते
बहिण-भावाचे विश्व सारे…

श्रावण आला जवळी
लागे माहेराची ओढ
रक्षाबंधनाचा सण
मनी स्मृतींची रूणझूण…

तू केंव्हा रे येशिल
दारी चारदा पहाते
गाडी पाहून लांबून
मनोमनी सुखावते…

तूझे रूपडे प्रेमळ
माझ्या डोळा पाणी येते
तूला आनंदी पाहून
मनापासून सुखावते…

पिल्ला भाचरांचा दंगा
आत्या आली हे बघून
जणू वाटते गोकूळ
झाले माहेर हे सारे…

निरांजन तेजाची
मांगल्याचे कुंकू घेते
सुपारी सौख्याची
घेते अक्षता प्रेमाची…

औक्षवंत होण्या तुजला
मी औक्षण हे करीते
किती प्रेम बहिणीसाठी
हे तुझ्या डोळ्यात वाचते….

तू तृप्त मी तृप्त क्षणभरी
रेशमी बंध मी बांधिते
जणू सूख हे स्वर्गिचे
त्या धाग्याने अनुभवते…

नाते हे भावविभोर
आई- बाबा दुरून पहाती
पाहून बंधूभगिनी प्रेम
आशिर्वाद लाख देती….

तू मायेनं आणली
साडी मजसाठी भाऊराया
नाही सर तिची कशाला
आवडीने जपेन तिजला…

सोहळा हा सौख्याचा
अनुभवते सानंदाने
मी मागते देवाकडे
सूख राहो शाश्वत तूझे…

सौ.स्वरूपा कुलकर्णी,
राहाता,अहमदनगर

Raksha Bandhan Marathi Msg

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह



Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
17 × 23 =