पद्माकर दत्तात्रेय वाघरुळकर आणि सौ. राधा खानझोडे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Raksha Bandhan Marathi Quotes For Sister विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
Raksha Bandhan Marathi Quotes For Sister
नारी अवघ्या बहिणी | Raksha Bandhan Marathi Quotes For Sister
काव्यबंध समूह आयोजित काव्यलतिका स्पर्धेसाठी
दि.१७ अॉगस्ट २०२३ गुरूवार
विषय- रक्षाबंधन
रचनाप्रकार- अष्टाक्षरी

नारी अवघ्या बहिणी
हाच विचार तो मना
खरा अर्थ होईलच
सण त्या रक्षाबंधना १
नसे सर्वांना भेटत
देव सर्वकाळी सदा
त्याच्या प्रतिनिधी मात्र
आई, बहिणी सर्वदा २
सण रक्षाबंधनी जी
हाती बांधे राखी धागा
करू रक्षणाचा वादा
दिल्या वचनास जागा ३
आहे ताई स्वावलंबी
सर्व क्षेत्री प्रगतीला
फक्त द्यावा तो आधार
साथ असावी कृतीला ४
नको सहानुभूती ती
कोरड्याच शब्दांतून
खरी साथ ती दिसावी
आपापल्या कार्यातून ५
जरी नसेल रक्ताची
प्रेम बहीण व्यक्तण्या
द्यावा हात प्रत्येकीला
राखी प्रेमाची बांधण्या ६
नातं अमर प्रेमाचं
भावाबहिणीचं जगी
आई नंतर बहीण
नाही सांगितलं उगी ७
प्रत्येकीला वाटावंच
माझ्या मागे भाऊ आहे
साथ देणारा खंबीर
क्षणोक्षणी दिसताहे ८
घ्यावा बोध त्या सणांचा
समजून उमजून
सभ्यतेची संस्कृती ती
दाखवावी मनातून ९
✍️पद्माकर दत्तात्रेय वाघरूळकर (दत्तिंदुसुत) छत्रपती संभाजीनगर
———————————–
Raksha Bandhan Marathi Quotes For Sister
बंध रेशमाचे…| Raksha Bandhan Marathi Quotes For Sister
काव्य बंध समूह काव्यलतिका….
दिनांक:-१७/८/२०२३
विषय :-रक्षाबंधन…

सन नारळी पौर्णिमा
राखी बांधूया भावाला
गाठी रेशीम धाग्याच्या
हर्ष बहिणीला झाला…!!१!!
आज आनंद हो किती
आला माझा भाऊराया
मन अधीर झालेया
वेड्या बहिणीची माया…!!२!!
नाते बहीण -भावाचे
घट्ट धाग्यांनी गुंफले
पाठीराखा भाऊ माझा
त्याने मायेने जपले…!!३!!
नको मज ओवाळणी
सदा सुखात राहावे
धागा घट्ट बंधनाचा
माझे आयुष्य लाभावे..!!४!!
आम्ही आहोत बहिणी
भाग्यवान खरोखरी
वडिलांच्या मागे तुच
माया केली आम्हावरी…!!५!!
भाऊ माझा पाठीराखा
किती सोसलेस कष्ट
सदा सुखात राहावे
कुणा लागू नये दृष्ट…!!६!!
बंध नात्याचे जपावे
कुटुंबात सगळ्यांचे
आई बाबा ताई भाऊ
इतरही बाकीच्यांचे…!!७!!
बंध रेशीम गाठीच्या
आहे सर्व गुंतलेल्या
माया वात्सल्य प्रेमाने
नाती ठेवू जपलेल्या…!!८!!
आज आनंद हो किती
सारे एकत्र जमले
चाले सोहळा राखीचा
छान त्यातच रमले…!!९!!
नको मज ओवाळणी
सदा सुखात राहावे
धागा घट्ट बंधनाचा
माझे आयुष्य लाभावे…!!१०!!
नाते बहीण भावाचे
करी संकटी रक्षण
एका धाग्यात गुंफले
आहे अतूट बंधन…!!११!!
औक्षवंत दादा तुम्ही
सण आज आनंदाचा
आई सारखी बहीण
पाठीराखा तू माईचा…!!१२!!
रक्षा बंधनाचा सण
आहे बहिण भावाचा
मन अधीर भेटाया
गोड क्षण आयुष्यांचा…!!१३!!
सौ. राधा खानझोडे ,नागपूर…

Raksha Bandhan Marathi Quotes For Sister
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह