सौ . सुवर्णा पवार आणि कोमल मेश्राम यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Raksha Bandhan Marathi Quotes विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
पवित्र बंधन आणि ही नाती बंधनाची | या 2 Raksha Bandhan Marathi Quotes कविता
पवित्र बंधन

एका वेलीची दोन कळ्या
हसत खेळत उमलली,
दिवसें दिवस गणिक
भाऊ बहिण बहरली ……१
लुटूपुटूचे असे भांडण
बहिण भावाचे लहानपणी,
जन्मभर जाता जात नाही
छोट्या छोट्या आठवणी….२
आईच्या मायेच्या सावलीत
वाढली दोघे खुशी खुशीत,
भांडण करीती दोघे सारखी
आईच्या शिरण्या कुशीत ….३
सोनियाचा दिन आला
आज हा रक्षाबंधनाचा ,
जगावेगळे प्रेम त्यांचे
नाते पवित्र प्रेमाचा ………४
भावाच्या संकट रक्षणार्थ
लावूनिया तिलक भाळी,
दिर्घायुष्य लाभावे भावास
बहिण भावाला ओवाळी …५
रक्षाबंधनाचा दिन भावास
पंचाआरतीने ओवाळीते,
भावाच्या मनगटी पवित्र
धागा रेशमाचा बांधीते…….६
नातं बहिण भावाचं
गुंफी पवित्र धाग्यात,
ओवाळणी घालतो
भाऊ मायेची ताटात ……..७
भावाच्या सुखात बहिण
देवाला मागणे मागते,
भावाला बरे वाटावे म्हणून
रात्रंदिन उशाशी जागते ….. ८
रेशमाच्या एका धाग्यात
पवित्र प्रेम गुंफले ,
बहिण भावाच्या नात्याला
पवित्र राखीने जोडले ……९
ज्यात धाग्याने लक्ष्मीने
बध्द केला तो बलीराज,
राखी बांधी तिच प्रेमळ
बहिण भावाला आज …..१०
भाऊ बहिणीचे हे नाते
अतूटच ऋणानुबंध,
नाते पावित्र्याने गुंफले
धागे बांधी रेशमी बंध …११
भाऊ जरी किती असे
तिच्या पासूनच दूर ,
बहिणीचा पाठीराखा
बहिणीचा भरतो ऊर …..१२
नातं बहिण भावाचे
अस पाक गंगाजल ,
बहिणीची रक्षा करी
भाऊराया हर पल……..१३
सौ . सुवर्णा पवार , इचलकरंजी
पवित्र बंधन आणि ही नाती बंधनाची | या 2 Raksha Bandhan Marathi Quotes कविता
ही नाती बंधनाची | Raksha Bandhan Marathi Quotes

छकुलीला नेहमी एक
प्रेमळ दादा हवा होता
दादा म्हणजे तिचा जणू
जीव की प्राण होता ||१||
तिचे हट्ट पुरविणारा
मायेने जवळ करणारा
त्याचा हात पकडून म्हणायची
दादा म्हणजे जग फिरविणारा|2
मनोमनी त्याला तिनं
भाऊ मानला त्याच्या मनगटावरती
राखीचा धागा तिनं आनंदाने
घट्ट बांधला ||3|
नकळतपणे आता तिचे
तो रक्षण करतो परिस्थिती
नव्हती तिची म्हणून दादा तिला
आता चांगले शिक्षण शिकवितो ||४||
तुझी माझी न करता
ती सर्वांची ताई असावी
दूषित झालेल्या वातावरणात
ती स्वच्छंद कधीतरी हसावी ||५|
घातक हल्ले होताना
तिचे रक्षण करणारा सदैव
एक दादा असावा
प्रत्येकाला तीन मानाने
भाऊ म्हणावा ||६||
दिव्याची वात फक्त
ओवाळताना नसावी
प्रकाशमय ज्योत नेहमी
तिच्या आयुष्यात असावी ||७|
धन्य होवो तो ज्याला
आयुष्यात ताई लाभली
सुखी असो तो भाऊ
ज्याने जिवापाड ही
नाती निभवली ||८||
~ कोमल मेश्राम
पवित्र बंधन आणि ही नाती बंधनाची | या 2 Raksha Bandhan Marathi Quotes कविता
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
पवित्र बंधन आणि ही नाती बंधनाची | या 2 Raksha Bandhan Marathi Quotes कविता