Raksha Bandhan Marathi Shubhechha

माझी बहिण आणि हे बंध मायेचे | 2 Best Raksha Bandhan Marathi Shubhechha

रचना-राजेश साबळे आणि सौ. पल्लवी हर्षद गरुडे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Jivan Gane Marathi Poem विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Raksha Bandhan Marathi Shubhechha

।।माझी बहिण।। Raksha Bandhan Marathi Shubhechha

काव्य बंध समूह काव्यलतिका
दिनांक १७ ऑगस्ट २०२३
विषय:- रक्षाबंधन

।।माझी बहिण।। Raksha Bandhan Marathi Shubhechha

बहीण म्हणजे आईसारखी, उबदार मखमली साया असते।
अवखळ अल्लड गोड, अन जराशी हसरी माया असते।।धृ।।

भावा बहिणींच्या नात्यात, बहीण नाजूक वीण असते।
दादा म्हणून हाक मारायला, हक्काची ती मैत्रीण असते।।
आई-बापाच्या संसारात, तीच एक मायेची सावली असते।
बहीण-भावाचं नातं प्रेमानं अन, आपुलकीनं जपत असते।।

भाऊ गरीब असो, नाही तर श्रीमंत, वाट त्याची पहात असते।
नवरा प्रेमळ असली तरी, भावालाच आयुष्य मागते असते।।
भाऊबीज असो नाहीतर रक्षाबंधनासाठी, माहेरची वाट पहाते।
रक्षण करता भाऊ येईल म्हणून, गोबऱ्या गालात हसत असते।।

लई असते सोशिक अन, संस्कारची ती फुलबाग असते।
किती वाईट दिवस आले तरी, आनंदाने पचवीत असते।।
भावाचं लुगडं आवडलं नाही तरी, आनंदानं नेसत असते।
आई-बापाची अब्रू झाकायची, तिला जणू सवयच असते।।

लहान होती छकुली जशी, आताही तशीच वागते।
खोड्या मीच करतो, पण बोलणं मात्र तीच खाते।।
आई सारखं मायेचं अन ममतेच, हे दुसरं व्यासपीठ असते।
कोणी काही म्हणो पण, बहीण-भावाचं नातं अतूट असते।।
………………………………….
रचना-राजेश साबळे,ओतूरकर
उल्हासनगर (ठाणे)-मोबा-९००४६७४२६३

——————————-

शीर्षक :- हे बंध मायेचे… Raksha Bandhan Marathi Shubhechha

शीर्षक :- हे बंध मायेचे… Raksha Bandhan Marathi Shubhechha

हे बंध मायेचे
कोवळ्या धाग्यांनी बांधलेले
हे नाते बहीण भावाचे
युगांनुयुगे रक्षीलेले

आला आला तो
मंगल सण आज
चढवूनी सोनेरी
सुखाचा साज

सांग्रसंगीत थाट असे
रोषणाई ही दिमाखदार
अंगणी सजे
रांगोळी ही बहारदार

चांदीच्या ताम्हणात
करंडा बसला ठेक्यात
निरांजनही विराजमान झाले
तांदूळ आले तो-यात

लगबगीने आली चांदीची वाटी
तिच्यात झाली मिठाईची दाटी
सुंदर रत्नजडीत ती राखी
अपार माया तिच्या पोटी

अशी तयारी जय्यत झाली
नटूनथटून बहिणाबाई सजली
बंधूरायाच्या आगमनाने
आज मनोमन सुखावली

क्षण हे दोघांचे
सुंदर गोजिरे
रक्षाबंधनाने झाले
नाते गहिरे

सण आनंदाचा हा
सौख्य लेवूनी आला
घरीदारी चैतन्याच्या
सुंगधात न्हायला

सुखाचा नवा मंत्र
कानी सांगितला
माहेराची आस
मनी रुजवूनी गेला.

सौ. पल्लवी हर्षद गरुडे , ठाणे.

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
18 ⁄ 6 =