Raksha Bandhan Marathi

“बंधुप्रेमात बंदिवान” आणि “रक्षाबंधन” | 2 Best Raksha Bandhan Marathi Kavita

रवी आटे आणि विनायक कृष्णराव पाटील यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Raksha Bandhan Marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

“बंधुप्रेमात बंदिवान” आणि “रक्षाबंधन” | 2 Raksha Bandhan Marathi Kavita

रक्षाबंधन | Raksha Bandhan Marathi Kavita

"बंधुप्रेमात बंदिवान" आणि "रक्षाबंधन" | 2 Best Raksha Bandhan Marathi Kavita

तुझी आठवण येता
मन भरूनीया येते
तुला पाहण्याची आस
जगण्याचे बळ देते ||१||

नाते तुझे आणि माझे
असे बहिण भावाचे
गंध पसरे फुलांचा
सदा सोबती क्षणाचे ||२||

बांधे मनगटावरी
धागा आपल्या प्रेमाचा
माझी बहिण लाडकी
देई आधार मनाचा ||३||

तूला लाभो यश किर्ती
हेच मागणे मागते
आज शुभदिनी दादा
तुला राखी मी बांधते ||४||

येता श्रावण महिना
रक्षाबंधनाचा सण
ताई तुझ्याच येण्याची
वाट पाही माझे मन‌ ||५||

बांधुनीया प्रेमधागा
नाते जपते सुंदर
असो प्रसंग कसाही
कधी न येवो अंतर ||६||

नाते आपल्या दोघांचे
आहे‌ खूप अनमोल
माझ्या विजयात असे
वाटा तुझा बहुमोल ||७||

सण असे हा वर्षाचा
आहे रक्षाबंधनाचा
भाऊ माझा पाठीराखा
असे तुझ्या विश्वासाचा ||८||

द्रौपदीस कृष्ण जसा
भाऊ लाभला मजला
दृष्ट काढते मायेने
सौख्य लाभूदे तुजला ||९||

रक्षाबंधनाच्या सणा
माझा बंधुराया येतो
बहिणीला आशीर्वाद
असा आवर्जून देतो ||१०||

सर्व भावांची लाडकी
लावे जीवनास गोडी
राहो अशीच आपली
सदा अबाधीत जोडी ||११||

विनायक कृष्णराव पाटील
ता. जि.‌‌ बेळगाव कर्नाटक


“बंधुप्रेमात बंदिवान” आणि “रक्षाबंधन” | 2 Raksha Bandhan Marathi Kavita

🌻 बंधुप्रेमात बंदिवान 🌻 Raksha Bandhan Marathi Kavita

"रक्षाबंधन" | 2 Best Raksha Bandhan Marathi Kavita

काही बंधनं हवीहवीशी असतात
मात्र नजरेची नजर बंदी नसतात

मायेत माझ्या असतो बंदिवान
दारात भाऊ अवतरतो श्रावणात

असते सदैव त्याच्या आठवणीत
बघताच त्याला हसले मी गालात

दूरदेशी असतो नेहमीच तो व्यस्त
येणे झाले नाही त्याचे चार सालात

गावाच्या वेशीवर येताच अलगद
सर्व दूर पक्ष्यांचे सूर निनादतात

रक्षाबंधनाचा सुगंध दाटतो चोहीकडे
फुलपाखरे ही अंगणी गाणी गातात

कधी कधी मीही जातच असते माहेरी
सर्वांच्याच आठवणी हृदयात राहतात

परतताना त्याची होतात जड पाऊले
माझ्याही मनात लाख कळा दुखतात

स्मरते तिकडले शेत नदी अन् वाटा
व्याकुळ चित्ती मग फुले पसरतात

भाग्याचे सुख असे प्रत्येकीला मिळो
बहिणीही देवाकडे असा हट्ट धरतात

बंधुराया जरी असला डोंगरा पलीकडे
हाक तरी पोहोचते बहिणीच्या कानात

मूक अन् अदृश्य संवाद प्रत्येक क्षणी
बहिण भाऊ एकमेकांशी साधतात

रवी आटे
सानपाडा ;नवी मुंबई
9324745970


“बंधुप्रेमात बंदिवान” आणि “रक्षाबंधन” | 2 Raksha Bandhan Marathi Kavita

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

“बंधुप्रेमात बंदिवान” आणि “रक्षाबंधन” | 2 Raksha Bandhan Marathi Kavita

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *