Rava Ladoo Recipe In Marathi | रवा लाडू रेसिपी

Rava Ladoo Ravyache Ladu Recipe In Marathi | रवा लाडू रेसिपी
दिवाळीमध्ये फराळातील लहान मोठे सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे रवा लाडू. त्यामुळे तो बनवताना जरा काळजी घ्यावी लागते. जुन्या पद्धतीने म्हणजेच साखरेचा पाक करून जर रवा लाडू बनवायचे असतील तर कधी कधी फार डोके दुखी होते. कारण जर पाकचा अंदाज फसला तर लाडूचा बट्याबोळ होवून जातो. त्यामुळे ह्यावेळी पाकातले लाडू बनवण्याचा विचार थोडा बाजूला ठेवा.

आज मी बिना दूध आणि बिना पाक रवा लाडूची रेसिपी देणार आहे. शिवाय हि रेसिपी झटपट होते. ह्यातले बहुतेक पदार्थ आपल्या घरात उपलब्ध असल्याने किराण्याचही जास्त टेन्शन नाही. ही रेसिपी काळजीपूर्वक पाळावी म्हणजे तुमचे लाडू झक्कासच बनतील यात अजिबात शंका नाही.

Rava Ladoo साहित्य –

एक चमचा तूप,
एक कप रवा ,
एक कप तेल,
एक कप नारळ,
अर्धी वाटी पिठीसाखर , Rava Ladoo
एक चमचा ड्रायफ्रूट ,
अर्धा चमचा वेलची पूड,
तीन चमचे काजू किंवा मनुके.

Rava Ladoo Recipe In Marathi | रवा लाडू रेसिपी

Rava Ladoo Ravyache Ladu Recipe In Marathi | रवा लाडू रेसिपी

कृती –

एक चमचा तूप कढई गरम करून घेणे त्यात एक कप रवा चार ते पाच मिनिट मंद आचेवर भाजून घेणे .तुम्ही ओव्हन मध्ये ही भाजून घेऊ शकता, रवा थोडा थंड होऊ द्यावा एक कप रव्यासाठी एक कप ओलं खोबरं घ्यायचे आणि यात हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कुकरचा एक डब्बा घेऊन त्यात हे मिश्रण घालून घ्यावे. कुकरमध्ये थोडे पाणी घालून हे मिश्रण त्यात 20 मिनिट मंद आचेवर ठेवावे. Rava Ladoo

त्यानंतर मिश्रण एका डिशमध्ये काढून घ्यावे. त्यात पाऊण वाटी पिठीसाखर,एक मोठा चमचा ड्रायफ्रूट घालून घ्यावी. त्यानंतर वेलची पूड आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. त्यानंतर तीन चमचे दूध घालून घ्यावे किंवा तुम्ही तूपही वापरू शकता , त्यानंतर हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घेणे. त्यानंतर व्यवस्थित लाडू वळून घेणे.

आशा करते कि तुम्हाला हि सोपी रेसिपी आवडली असेल. जास्त फापट पसारा न देता मुद्याचे देण्याचा प्रयत्न केला आहे. आवडल्यास नक्की शेअर करा.

Rava Ladoo Ravyache Ladu Recipe In Marathi | रवा लाडू रेसिपी

रागावलेल्या आपल्या माणसाला मानवाण्यासाठी कविता राग रुसवा

झाशीची राणी लक्ष्मी बाई कश्या होत्या ?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *