Recipe For Kothimbir Vadi

Recipe For Kothimbir Vadi :कोथिंबीर वडी

Kothimbir Vadi kashi banvaychi खुसखुशीत आणि खमंग कोथिंबीर वडी म्हणलं, कि लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा पदार्थ . खायला पण अगदी खुसखुशीत आणि चवदार असल्यामुळे सगळ्यांना अगदी मनापासून आवडतो. कोणत्याही सीजन मध्ये कोथिंबीर वडी बनवून खाल्ली जाते. कोथिंबीर वडी कुरकुरीत होण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या पध्दती वापरतात.कोथिंबीर ला स्वतःची एक अशी वेगळी चव आहे . जी सगळ्या पदार्थाला एक स्वाद आणते . तसेच कोथिंबीर मध्ये अनेक औषधी गुण असतात .आपल्याला फक्त जेवणापुरतीच कोथिंबीर माहित आहे . कोथिंबीर मधील पोषक तत्त्वांमुळे त्वचेबरोबरच आपलं आरोग्य ही चांगलं राहते.कोथिंबीर वडी खाल्याने शरीरही निरोगी राहते.कोथिंबीर वाडी कशी बनवायची How to make kothimbir vadi in marathi हेच आपण शिकणारआहोत .लागूया करायला कोथिंबीरची वडी .तुम्ही पण नक्की करून बघा .Recipe For Kothimbir Vadi

कोथिंबीर वडी : उकडलेली

साहित्य : १ कोथिंबीरची जुडी, २०० ग्रॅम चण्याच्या डाळीचं पीठ, १०० ग्रॅम तांदळाचं पीठ, २५ ग्रॅम पांढरे तीळ, लाल तिखट दोन छोटे चमचे , एक छोटा चमचा हळद,एक छोटा चमचा जिरे , १० ते १५ लसनाच्या पाकळ्या, एक चमचा तेल, चवीला ओवा ,स्वादानुसार मीठ.Recipe For Kothimbir Vadi

कृती : Kothimbir Vadi kashi banvaychi सर्वात प्रथम कोथिंबीर निवडून चाळणीमध्ये स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी. स्वच्छ धुतलेली कोथिंबीर एका परातीत बारीक चिरून घ्यावी . मग त्यात चण्याच्या डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ, पांढरे तीळ,हळद,लाल तिखट, ठेचलेल्या लसूण पाकळ्या,ओवा , स्वादानुसार मीठ आणि एक चमचा तेल टाकावे . सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घट्ट मळून घ्यावे .मिश्रण तयार झाल्यानंतर त्याचे गोल – गोल रोल तयार करावेत . नंतर कोथिंबीरवडीचे रोल कुकरच्या भांड्यात ठेवावे .कुकरच्या साधारण ८ ते १० शिट्या झाल्यानंतर गॅस बंद करावा .How to make kothimbir vadi in marathi जरा वेळाने कुकर थंड झाल्यानंतर झाकण उघडून कोथिंबीर वडीचे रोल बाहेर काढून ठेवावेत .सुमारे ५ ते १० मिनिटांनी वडीचा रोल पोळपाटावर घेऊन सुरीने पातळ वड्या पाडून घ्याव्यात . नंतर गॅसवर तवा किंवा कढई गरम होण्यास ठेवून, त्यामध्ये तेल गरम करायला ठेवावे .गरम तेलात कोथिंबीर वड्या टाकून अंदाजे २ ते ५ मिनिटं मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्यावे .किंवा डिप फ्राय करावेत. Recipe For Kothimbir Vadi

Recipe For Kothimbir Vadi

कोथिंबीर वडी : वाफवलेली

साहित्य : २ वाट्या बारीक चिरलेली कोथिंबीर , हिरव्या मिरच्या ७ ते ८, किंवा १ मोठा चमचा लाल तिखट. १ चमचा (चवीनुसार) मीठ, साखर अर्धा चमचा ,प्रत्येकी १ चमचा जिरे आणि ओवा .१ चमचा तीळ, हिंगपूड पाव चमचा ,पाव चमचा हळद, चण्याच्या डाळीचे पीठ १ वाटी, थोडी तांदूळ पिठी .Recipe For Kothimbir Vadi

कृती : बारीक चिरलेली कोथिंबीर, वाटलेल्या हिरव्या मिरच्या , मीठ, ओवा,साखर, जिरे, तीळ, हळद ,दोन चमचे तेल हे सर्व साहित्य एकत्र करावे.त्यामध्ये चण्याच्या डाळीचे पीठ कालवावे. कोथिंबीर वडीच्या पिठाचा गोळा एकजीव होण्यासाठी थोडे थोडे पाणी घालावे. हाताला तेल लावून पिठाचा गोळा करता येण्याइतपत झाला की, लांबट गोल करून तो कुकर मध्ये किंवा चाळणीवर ठेवून वाफवून घ्यावा. गार झाल्यानंतर सुरीने पात्तळ वड्या कापून त्या खरपूस तळाव्यात.Recipe For Kothimbir Vadi

टीप : कोथिंबीर वडीसाठी पीठ मळताना त्यात एक चमचाभर तेल टाकावे. वडीसाठी रोल तयार करताना मळलेले पीठ हाताला चिकटत नाही.कोथिंबीर पिठाचा गोळा उकडून फ्रीजमध्ये ठेवल्यास, दुसऱ्या दिवशी वड्या कापून तळल्या तरी चालतात.चपाती किंवा भाकरी बरोबर खायला घ्यावी. टोमॅटो सॉस बरोबरही कोथिंबीर वडी चविष्ट लागते.Recipe For Kothimbir Vadi

Author : Mrs. Swati Dhas Kshirsagar

शेती नावावर करून घेताना – आजची वास्तवता

उन्हाळ्यात स्वतःची काळजी कशी घ्यावी ? तुम्ही आमच्या या ब्लॉगवर जाऊन अजून नवीन माहिती घेऊ शकता .

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *