rice medu vada recipe in marathi

Recipe for Medu vada in Marathi

नमस्कार मित्रांनो आपल्याला अनेक प्रकारचे वडे माहिती आहेत. परंतु तांदळाचे पिठाचे मेदूवडे कसे बनवायचे ते आपण पाहूया…………….Recipe for Medu vada in Marathi

साहित्य

१) एक वाटी तांदळाचे पीठ
२) 5 चिरलेल्या बारीक मिरच्या
३) एक चमचा जीरी
४) चवीनुसार मीठ
५) बारीक केलेले आलं एक चमचा……………………..Recipe for Medu vada in Marathi
५) एक वाटी ताज दही
६)पाणी
७) गोडतेल
८) कोथिंबीर
अशाप्रकारे आपल्याला तांदळाच्या पिठाचा मेदूवडा तयार करण्यासाठी साहित्य लागेल……………..

Recipe for Medu vada in Marathi

पाककृती-Recipe for Medu vada in Marathi


सर्वप्रथम आपण मेदूवडा साठी लागणारे साहित्य सोबत घेऊया. रेसिपी तयार करण्यासाठी आपण तयार आहोत. चला तर मग सुरुवात करुया. प्रथम आपण बारीक केलेले किंवा तयार असलेले तांदळाचे पीठ घेऊ. एक चमचा जिरे घ्या. वड्यांना एक वेगळीच चव देण्यासाठी त्यांचा उपयोग होतो.. बारीक किसलेले आल त्यामध्ये एक चमचा टाकूया. आपल्या सर्वांच्या घरांमध्ये दही असेलच तर एक वाटी घट्ट दही घ्या, कारण दही घेतल्या कारणाने मेंदूवाड्याला विशिष्ट प्रकारची चव आणि मऊ असे वडे तयार होतात. गरजेनुसार मीठ टाकूया. जसे पाहिजे तसे पाणी टाकून मिश्रण करा. थोडे कमी-जास्त पाणी आपल्याला लागेल. आता सर्व एकत्र करून एकजीव करून घेऊ. …………………….Recipe for Medu vada in Marathi

गॅस वर कढई ठेवा. तुम्ही केलेले मिश्रण त्या कढई मध्ये टाका. ओतल्यानंतर मिश्रण सतत हलवत रहा. कारण कधी कधी ते भांड्याला चिकटून राहते आणि करपते. एकदम घट्ट असे शिजवून घ्या. शिजवून झाल्यानंतर थोड्यावेळ थंड करायला ठेवा. थंड झाले का ते पहा. हातावर छोटासा गोळा तयार करा. गोळ्याला एकसारखे चपटे करून घेऊया. बरोबर मधल्या भागामध्ये छोटेसे गोल करा. सर्व पीठाचे अशाप्रकारे गोळे तयार करून ठेवा.

कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया. गरम तेलामध्ये 5 ते 6 वडे सोडा. थोडेसे लाल प्रमाणात मेदू वडे तळून घेऊया. तळून झाल्यावर त्यातील तेल निघून जाईल अश्या प्रकारे त्यांना झारीने हलवा. आणि डिश मध्ये काढून घ्या. याप्रकारे तांदळाचे मेंदूवडे तयार झाले. खाण्यासाठी कुरकुरीत आणि कमी वेळेत तुम्हाला घरच्या घरी करून तयार करता येतील. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती आम्हाला नक्की कळवा.

तुम्ही देखील ब्लॉग लिहू शकता. जर तुमच्या कडे तुमच्या स्वतःचे काही लेखन असेल व तुम्ही ते इंटरनेट वर टाकू इच्छित तर आम्हाला मेल करा. आम्ही कोणतेही मूल्य न घेता तुमचे लेखन आमच्या वेबसाईट वर प्रकाशित करू. – माझा ब्लॉग…………………Recipe for Medu vada in Marathi

Our Verified Blogs

Review of Made in India Smartphone POCO

केक बनवण्याची मराठी रेसिपी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *