Romantic Poem on Love in Marathi

प्रेम काय असत | Best Romantic Poem on Love in Marathi 2023

प्रेमावर अनेकांनी कविता लिहिल्या. कुणाच्या प्रेम व्यक्त करणाऱ्या तर कुणाच्या प्रेम अनुभवणाऱ्या. वाचा माझी Romantic Poem on Love in Marathi.

Romantic Poem on Love in Marathi

Romantic Poem on Love in Marathi

प्रेम काय असत

प्रेम काय असत तुला काय सांगू सखे,
घटकाभरच्या चर्चेत विषय कसा उलगडेल ?
सर्वांना वाटत प्रेम करणारा भेटायला हवा,
पण द्यायचा विषय आला कि प्रेमाची रिक्तता

प्रेम म्हणजे काय मिळते येवढेच फक्त पहायचे नसते,
आपल्या चार आणि समोरच्याला हजार असे सूत्र असते.
प्रेम म्हणजे नाही फक्त शरीराचा संगम,
त्यात येते मनाचे स्पंदन आणि आत्म्याचे आलिंगन.

मैत्री शिवाय प्रेम मला तरी शक्य वाटत नाही,
जसे रंगल्याशिवाय लहान बाळ कधी पळत नाही.
शब्द आणि शरीरस्पर्श याकडे कानाडोळा करणे हाच मंत्र,
प्रेम आहे मन एकत्र करून घट्ट गाठ बांधणार यंत्र.

प्रेमात आपले अस्तित्व म्हणजे सख्याचे सामर्थ्य असते,
एकाचे छोटे दुःख देखील दुसऱ्याच्या सुःख हरवणारे ठरते
प्रेम नाही पाहुणा काही दिवसांचा स्वार्थ पाहणारा ,
तो आहे आयुष्यातील खाचखळग्यात सोबत राहणारा

Romantic Poem on Love in Marathi

प्रेम हा आहे समर्पण, विश्वास, आणि आपुलकीचा वृक्ष,
प्रेम दाखवेल हरणाऱ्या साथीदाराला विजयाचे दृश्य.
प्रेम असे आहे जे क्षणात तोडेल दुःखाची लाठी,
अपार कष्ट सहन करणे सहज असते प्रियकरासाठी.

प्रेम म्हणजे असंख्य भावनांचे एकजीव मिश्रण,
जोडीदारासोबत घालवलेला लक्षात राहतो एक एक क्षण.
त्याच्या सोभोवतली असण्यानेच आत्मरंग फुलून जातात,
प्रेम मध्ये जीवनाच्या दाही दिशा उजळून निघतात

Romantic Poem on Love in Marathi

घर आमचे प्रेमाचे

Marathi Kavita Prem

निर्जन एकाकी आयुष्यात एक प्रेमकथा घडली,
आमच्या दोघांच्या मनाला जोडणारी ती वाट झाली.
शांत एकांतात एक मनमोहक संगीत उभं राहिल,
आठवणींचं मधुर चांदण्यांचं चित्र रेखाटलं.

प्रेमाच्या भिंतीवर आपुलकीच्या विटा लावल्या,
ज्यांनी दोघांच्या हृदयांमध्ये भरवश्याच्या साक्षी दिल्या.
विटांमध्ये ओतले मायेचे सिमेंट,
आम्ही झालो एकमेकांचे परमनेंट.

Romantic Poem on Love in Marathi

सिमेंटच्या थरावर विश्वासाचा रंग
दोघांनी केला नव्या जीवनाचा आरंभ
प्रेरणेच्या खिडक्यांतून आयुष्यात प्रकाश आणला
भौतिकतेतून आमचा बंध केव्हाच पार गेला

पारदर्शकतेचे दार सर्वात पुढे होते,
ज्यातून नात्याचे सर्व समाधान होते.
असे आमचा घरसंसार सर्वतोपरी सजून गेला,
शरीराच्या सीमा लांघून स्वर्ग सुख देऊन गेला.

Author :- मनीष

तुम्हाला प्रेमावरच्या या दोन कविता कश्या वाटल्या हे जरूर कळवा.
आमच्या इतर कविता :-

Romantic Marathi Prem Kavita

MARATHI KAVITA ON MARRIAGE

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *