Sad Kavita Marathi

Sad Kavita Marathi | दुःख शायरी | प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी हा अनुभव येतो

Sad Kavita Marathi | दुःख शायरी | प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी हा अनुभव येतो

किती जीवघेणे हे जगणे , सतत अंतरीची घालमेल

ह्या दुःखाला नसे तोड , जरी मिळे सुखाची वेल

शक्तिहीन असून तिला , नसे कुठल्याही आधाराची जोड

येईल का कुणीतरी सोबती जीवनात , ज्याने जगण्याची आशा होईल गोड , ज्याने जगण्याची आशा होईल गोड ……

Sad Kavita Marathi | दुःख शायरी | प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी हा अनुभव येतो

आज नाही कुणी सोबती जगी , ज्याला सांगू शकेल माझ्या दुःखाचा घोट

अन् या जीवघेण्या जगात धरू शकेल ज्याचे आधाराला बोट

दुःख पचवून उरी जीवनाचे राहील मन सचोट

जगतो घनदाट जंगलामध्ये जसा झरा अखोट

निरंतर पडलेल्या मज नयनामधूनी , अनुभवतो अश्रू रुपी अनंत अगोट

म्हणुनिया हवे आधाराला बोट , ज्याला सांगू शकेल माझ्या दुःखाचा घोट

हवे जीवघेण्या जगात आधाराला बोट , हवे आधाराला बोट……

Sad Kavita Marathi | दुःख शायरी | प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी हा अनुभव येतो

Sad Kavita Marathi Emotional | दुःख शायरी | प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी हा अनुभव येतो

कवटाळून दुःख उरात , मी जगतो सदा हसत

नको वाटते मजला , करुनी दुखांना अतीत

राहतो मित्रांसमवेत , मी बोलत असतो सतत

अन् दुखावलेल्या मित्रांना , निरंतर करतो प्रेरित

नाही होणार कमी वेदना मनात

ओठांवर राहील सदा हास्य ठेवत

परी ठावूक नसेल कदाचित तुम्हा , वेदना नाहीशा होणार नाही रडल्याने सतत

म्हणूनिया जगतो सदा मी हसत हसत , जगतो सदा मी हसत हसत…..

Sad Kavita Marathi Emotional | दुःख शायरी | प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी हा अनुभव येतो

हसून मनातील दुःखांचे , करतो मी निराकरण

जणू बिघडलेल्या भाषेचे , सुधारतो मी व्याकरण

दुःख करण्या नाहीसे , ठेवतो चांगले आचरण

बुद्धांच्या विचारांचे मी , करतो अंगिकरण

करुनी अखंड ध्यान , शुद्ध ठेवतो अंतकरण

आता नको मजला मजवर कुणाचे अधिकरण

करण्या स्वतःच्या दुःखाचे निराकरण , जातो मी बुद्धास शरण , जातो मी बुद्धास शरण…..

Sad Kavita Marathi Emotional | दुःख शायरी | प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी हा अनुभव येतो

दुःख नाही ज्यास असा , नाहीच जगी या कुणी

समजोनी सत्य हे , बसत नाही मी आता कोपरी

अजून दुखवत नाही स्वतःस , जगास जाहीर करुनी

सोडून विचार दुःखांचा , हसत राहतो सतत जनी

वळूनी माझ्या भविष्याकडे , लक्ष ठेवील अजीहूनी

मग हरतील सारे दुःख , सप्तरंगी तुषार अंतरी

सुखालाही लाजवेल अशी शांत निद्रा येईल समाधानी

___________________________________________________________

Sad Kavita Marathi अवघड शब्दांचे अर्थ :-

अखोट = निर्मळ, अगोट = पावसाळा, अजीहुनी = आजपासून

कवी आशु छाया प्रमोद (रावण)

कवी आशिष

तुम्हाला आमची आठवण हि कविता नक्कीच आवडेल. वाचण्यासाठी क्लिक करा>>>>.

रागावलेल्या आपल्या माणसाला मानवाण्यासाठी कविता राग रुसवा>>>>.

झाशीची राणी लक्ष्मी बाई कश्या होत्या ?

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

As you found this post useful...

Follow us on social media!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
26 × 11 =