sad marathi kavita on life

जीवन आणि आयुष्य व्हावे यशवंत | 2 best sad marathi kavita on life

सौ. वैशाली मुन आणि सौ. शोभा देशपांडे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत sad marathi kavita on life विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

sad marathi kavita on life

🌹काव्यबंध समूह आयोजित स्पर्धेसाठी
विषयः आयुष्य

जीवन | sad marathi kavita on life

जीवन आणि आयुष्य व्हावे यशवंत | 2 best sad marathi kavita on life

आयुष्य किती
बेभरवशाचे असते,
एका क्षणी असते तर
दुसरा क्षणी नसते… १

आयुष्यात सुखाचे
क्षण फार कमी येतात,
म्हणुन मनसोक्त इच्छा
घेऊन माणुस जगतात.. २

आयुष्यात सुखाची व्याख्या
थोडी कठीणच असणार,
पण सहजा सहजी
अर्थ नाही कळणार… ३

पहाटे पानावर जसे
दवबिंदू लाजते,
सुखाचे फुल जणु
इच्छा घेऊन जगताना कोमजते… ४

दुःखावर करायची मात
कसे सुख नाही शिकवतं,
काटयातून चालतांना
अनुभव नाही घडवत… ५

जगायचे असतं किती ही
वेदना झाल्या तरी,
बोचले प्रश्र तरी
वाटा हरवल्या तरी… ६

सौ. वैशाली सुनील मुन
चंद्रपूर

sad marathi kavita on life

स्पर्धेसाठी
काव्यबंध समुह आयोजित
काव्यलतिका स्पर्धा
दिनांक-०१-१०-२०२३
विषय- “आयुष्य”

आयुष्य व्हावे यशवंत | sad marathi kavita on life

आयुष्य व्हावे यशवंत | 2 best sad marathi kavita on life

मातेच्या उदरातून जन्म
पृथ्वीवर होई पदार्पण
आयुष्य तिचे सारे करी
लाडक्या लेकरासाठी समर्पण  

पिता वाढवी जीवलावूनी
बालपणीचा काळ सुखाचा
लाड, खेळणे, हुल्लडबाजी
सोबतीस थोडा अभ्यासाचा   

असते ध्येय समोर आयुष्यात
शिकून यश मिळवायाचे मोठे
वाट चालतांना नसते ठावे
कोण भेटेल केंव्हा कोठे?    

तरुणपणी कमवायाचा पैसा
संसाराची जबाबदारी घेत
दिवस भुरकन उडून जाती
ज्येष्ठत्वाकडे नकळत नेत 

निवृत्त होत कामातून
आरामात जगावे आयुष्य
सुखी समाधानी असता
उज्वल असते भविष्य  

आयुष्य कुणाला वाटे
कांदे पोहे चुलीवरचे
जसे अनुभव येती
समाजात आणि घरचे

प्रामाणिक असावे जगतांना
दुखवू नये कुणाचे मन
फुकाचा गर्व नसावा सोबती
जरी बाळगून असले धन   

कुणावर तरी ठेवावी श्रध्दा
विज्ञान असो वा भगवंत
विचाराला मिळते दिशा
आयुष्य होते यशवंत

जन्मा येतांना येतो रडत
लोक आनंदाने हसतात
गेल्यावर नाव ज्याचे टिकते
तेच खरे आयुष्य जगतात.

सौ.शोभा देशपांडे
छत्रपती संभाजीनगर

best sad marathi kavita on life

sad marathi kavita on life

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *