Saina Nehwal Information In Marathi 2023 Best Article

भारताची सुपुत्री साईना नेहवाल | Saina Nehwal Information In Marathi 2023 Best Article


नमस्कार वाचक मित्रांनो, आज आपण या Article मध्ये भारतातील एका प्रसिद्धी बॅडमिंटनपटू बद्दल बोलणार आहोत. जिने ऑलिम्पिक खेळात उपांत्य फेरी गाठून जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा जिंकून पहिली भारतीय महिला ठरली. तिला भारत सरकार कडून अर्जुन पुरस्कार, पद्मश्री आणि राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार तसेच पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्या महिलेचं नाव “सायना नेहवाल” असे आहे.

तर मित्रांनो आजच्या Saina Nehwal Information In Marathi या Article मध्ये आपण त्यांच्याबद्दल संपुर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे आमची अशी विनंती आहे की, हा Article तुम्ही अगदी सुरवातीपासून ते शेवटपर्यंत नक्की वाचा.

Saina Nehwal Information In Marathi

भारताची सुपुत्री साईना नेहवाल | Saina Nehwal Information In Marathi 2023 Best Article

Saina Nehwal यांचं पूर्ण नाव “सायना हरविर सिंह नेहवाल” असे आहे. त्यांचा जन्म 17 मार्च 1990 ला हरियाणा मधील हिसार या ठिकाणी झाला. Saina Nehwal यांच्या आईचे नाव “उषा राणी नेहवाल” आहे. उषा राणी नेहवाल हे देखील हरियाणातील राज्यस्तरीय बॅडमिंटन खेळाडू आहेत. त्यांना राष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटन खेळायचे स्वप्न होते मात्र ते काही कारणास्तव पूर्ण होऊ शकले नाही म्हणुन सायनाने त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बॅडमिंटन हातात घेतले. त्यांच्या वडिलांचे नाव “डॉ. हरविर सिंह नेहवाल” आहे. कृषी क्षेत्रात PHD असलेले त्यांचे वडील डॉ. हरविर सिंह नेहवाल हे चौधरी चरण सिंह हरियाणा कृषी विद्यापीठात कार्यरत आहेत.

त्यांना एक चंद्रसेह नावाची बहिण सुद्धा आहे आणि ती व्हॉलीबॉल पटू आहे. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण “कॅम्पस स्कूल सीसीएस एचएयू, हिसार” येथून केले. नंतर त्यांनी त्यांची 12th हैदराबाद च्या मेहदीपत्तनम येथील “सेंट ॲन कॉलेज फॉर विमेन” इथून पूर्ण केले.

Saina Nehwal Information In Marathi

Saina Nehwal Struggle For Badminton बॅडमिंटन मधील त्यांची मेहनत

Saina Nehwal यांच्या आई सारखे त्यांचे वडील देखील बॅडमिंटन खेळात राज्यस्तरीय चॅम्पियन राहिलेले आहेत. Saina Nehwal यांना बडमिंटन साठी त्यांच्या आई आणि वडील यांच्याकडून च मिळाली आणि त्यांना बॅडमिंटन वरचं प्रेम ते 8 वर्षाचे असतांनी झालं होतं. त्यांच्या वडिलांची हरियाणा पासून हैद्राबाद पर्यंत पदोन्नती झाल्यानंतर ते हैद्राबाद येथे राहायला आले. Saina Nehwal यांनी त्यांच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे हैद्राबाद येथील “लाल बहादूर स्टेडियम” मधील “नानी प्रसाद” यांच्याकडून त्यांनी बॅडमिंटन चे प्रशिक्षण घेण्यास सुरवात केली.

Saina Nehwal Information In Marathi


Saina Nehwal हे पहाटे 4 वाजे उठून प्रशिक्षण घेण्यासाठी स्टेडियम मध्ये आपल्या वडिलांसोबत जायची. कारण स्टेडियम त्यांच्या घरापासून 25 km दूर होतं. तिथे लवकर जाऊन बॅडमिंटन चे प्रशिक्षण घ्यायची आणि नंतर शाळेत जायची. एवढी तिने बॅडमिंटन साठी मेहनत घेतली होती.
तिच्या वडिलांनी त्यांच्या भविष्य निधीचा वापर तिच्या चांगल्या बॅडमिंटन प्रशिक्षणासाठी केला.

सायनाची बॅडमिंटनमधील कारकीर्द

साईना नेहवाल | Saina Nehwal Information

सायनाने 2006 मध्ये अंडर-19 च्या गटामधील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. त्यावेळी तिने प्रतिष्ठित आशियाई उपग्रह बॅडमिंटन टूर्नामेंट जिंकून तिने नवा विक्रम केला व असे करणारी ती पहिली खेळाडू बनली. नंतर तिने वयाच्या 16 व्या वर्षी फिलिपिन्स ओपन मधील 4-Star स्पर्धेत भाग घेऊन जिंकली व हे करणारी देखील ती पहिली भारतीय महिला ठरली. यासोबतच 2008 मध्ये ती “जागतिक ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप” जिंकणारी पहिली महिला भारतीय बनली. त्यावेळी त्यांना “द प्रॉस्टीझिंग प्लेअर” हे नाव देण्यात आले. जून 2009 मध्ये “बीडब्ल्यूएफ सुपर सिरीज शीर्षक” जिंकणारी ती पहिली भारतीय होती. तसेच “डोनेशिया ओपन” जिंकून जगातील सर्वात प्रमुख बॅडमिंटन मालिका जिंकली.

Saina Nehwal Information In Marathi

27 जानेवारी 2011 ला दुसऱ्या फेरीत “कोरिया ओपन सुपर सिरीज” मध्ये आणि 11 मार्च 2011 ला “ऑल इंडिया सुपर सिरीज मध्ये ती पराभूत झाल्यामुळे ती फार निराश झाली होती. Saina Nehwal ला “दिल्ली ओपन सुपर सीरिज मधून तिला लवकरच बाहेर पडावे लागले होते कारण जापान मधील ऐ गोटो याने तिला सरळ गेम मध्ये मात दिली होती. त्यांनतर 8 मे 2011 रोजी “मलेशियाई ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड स्पर्धे मध्ये विजेतेपद जिंकायच्या प्रयत्नात फायनल मध्ये चीन च्या वांग झिन हिने तिला पराभूत केले ती जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी होती.

Saina Nehwal हिने नंतर 2011 मधील “बीडब्ल्यूएफ डबल स्टार सुदिरमन” मध्ये भाग घेतला आणि एकत्र संघ पद्धती मध्ये Saina Nehwal ने चायनीज तैपेईच्या त्सु यिंग ताई विरुद्ध तिचा पहिला सामना जिंकला जो 21-10, 12-21, 21-17 असा तीन सेट जिंकत होता परंतु भारताने 3-2 अशी बरोबरी साधली.

Saina Nehwal Information In Marathi

Saina Nehwal ने 18 मार्च 2012 मध्ये चीनच्या वांग शिक्सियनचा पराभव करून “स्विस ओपन टायटल” यशस्विरीत्या जिंकला. 10 जून 2012 ला “थायलंड ओपन ग्रांप्रि गोल्ड सुवर्ण पदक” जिंकण्यासाठी त्यांनी थायलंडच्या “रत्चानोक इथनॅन”ने Saina Nehwal चा पराभव केला. त्यांनतर Saina Nehwal ने 17 जून 2012 मध्ये चीनच्या “झुरुई” यांना 13-21, 22-20, 21-19 ने हरवून “इंडोनेशिया ओपन सुपर सीरीज” जिंकले. 21 ऑक्टोंबर 2012 ला उपांत्य फेरीत “वांग यिहान” ला पराभूत झाल्यानंतर तिने “डेन्मार्क ओपन सुपर सिरीज प्रीमियर” जिंकली. अंतिम फेरीत Saina Nehwal ने जर्मनीच्या ज्युलियन शेंकला दोन सरळ सेटमध्ये पराभूत केले.

Marriage Of Saina Nehwal । Saina Nehwal चे लग्न

Saina Nehwal यांचे लग्न 16 डिसेंबर 2018 मध्ये त्यांचा बॅडमिंटन मधील जोडीदार पारुपल्ली कश्यप यांच्याशी ठरलेला होता परंतु त्यांनी 2 दिवस आधी च 14 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 11.30 ला कोर्ट मॅरेज केलं.

Saina Nehwal Information In Marathi

_________________________

वाचा शरद पवार यांच्यावर निबंध :- Sharad Pawar Essay in Marathiवाचा आपल्या भारतीय सणाबद्दल निबंध :- Essay on Our Festivals 2023

_________________________

Saina Nehwal Awards Information

Saina Nehwal चे सुवर्ण पदक

 1. भारताची राष्ट्रीय क्रिडास्पर्धा (2007)
 2. 2008 राष्ट्रकुल युवा क्रिडास्पर्धा (2008)

Saina Nehwal चे रजक पदक

2004 राष्ट्रकुल युवा क्रिडास्पर्धा (2004)

Saina Nehwal चे कांस्य पदक

लंडन ऑलिंपिक (2012)

राष्ट्रकुल स्पर्धा (2006)

Saina Nehwal Information In Marathi

Saina Nehwal यांना मिळालेला पुरस्कार

 1. अर्जुन पुरस्कार (2009)
 2. पद्मश्री (2010)
 3. राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार (2010)
 4. पद्मभूषण (2016)

Saina Nehwal Information In Marathi

FAQ’s

 1. सायना नेहवाल कोण आहे?
  सायना नेहवाल ही “जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा” जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे.
 2. सायना नेहवाल चा जन्म कधी झाला?
  सायना नेहवाल यांचा जन्म 17 मार्च 1990 ला हरियाणा मधील हिसार या ठिकाणी झाला.
 3. सायना नेहवाल ने वयाच्या कोणत्या वर्षी बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली?
  सायना नेहवाल यांनी वयाच्या 8 व्या वर्षी पासून बॅडमिंटन खेळायला सुरवात केली.
 4. सायना नेहवाल चे प्रशिक्षक कोण आहेत?
  “नानी प्रसाद” हे सायना नेहवाल चे प्रशिक्षक होते.

Saina Nehwal Information In Marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *