शहीद जवान, सैनिक आणि भुमीपुत्र सैनिक तो | 3 Best Sainik Kavita in Marathi

नेत्रा शेट्टी, अनिता भोसले बर्गे आणि सौ. सुवर्णा बाबर यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Sainik Kavita in Marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Sainik Kavita in Marathi

काव्यबंध समूह आयोजित, काव्यलतिका रविवारीय काव्यस्पर्धा.
दिनांक :- 25/2/2024
विषय :- शहीद जवान

शहीद जवान | Sainik Kavita in Marathi


ना आतंकीचे डर
नाम मृत्यूचे भय
राखण्या तिरंग्याची शान
असे ठाई ठाई तू उभा
तूच खरा लढवय्या

ना कोणती हाव
ना कोणता स्वार्थ मनी
निस्वार्थी तू देश रक्षक
देईन देशासाठी कुर्बानी
हीच तुमची वाणी

मन तुझे तिरंगा
तन तुझी मातृभूमी
करण्या दोहोंचे रक्षण
सदा सज्ज तू फौजी

पण आठवणीत तुझ्या
काळजाला माऊलीच्या छिद्र पडी
बाप मात्र गोठणी अश्रू
ढसढसा अंतकरणात रडी

बसली नजर लावूनी वाटेवरी
अर्धांगिनी ती वेडीपिशी
आसुसलेली तुझ्या मिठीस
लेक तुझी चिमुकली
रोज उभी त्या वेशीपाशी

वाटे तुला जाऊनी जन्मभूमी
करावी साजरी दसरा अन् दीपावली
पण करण्या देशाचे रक्षण
टाकलीस मागे सारी नातीगोती

कधी होऊनी बाजीप्रभू तर
कधी होऊनी भगतसिंग
रणांगणी तू युद्ध करी
पडला जरी सडा रक्ताचा
तरी तयास तू मातीत मिसळी

झेललीस तू गोळी तनात
तरीही न सोडलीस बंदूक
पण कर्णी पडता विजयाची हाक
तेव्हाच तू सोडलास श्वास

आई पत्नी अश्रू ढाळी
पाहुनी तुझे शव
पण लेक अभिमानाने बोले
झाला माझा बाबा शहीद

नको करू तू दुःख बाबा
लेक तुझी आहे सुवर्ण
बनून मी ही एक सैनिक
करीन तुझे अधुरे स्वप्न पूर्ण

कमीच आहेत तारीफ करण्या
तुझी हे सारे शब्द
कारण तूच आहेस खरा
देशाचा सच्चा देशभक्त

आहे तिरंगा देशाची शान
आहेस तू आमचा अभिमान
जय जवान जय जवान


कवी –
नेत्रा शेट्टी
सातारा

Sainik Kavita in Marathi

काव्यबंध आयोजित रविवारी काव्य लतिका स्पर्धा
दिनांक 25/02/2024
विषय- सैनिकासाठी कविता

सैनिक | Sainik Kavita in Marathi

सैनिक अपुल्या देशाचे,
बाहुबली ते राष्ट्राचे….
प्राणपणाने झुंज देऊनी,
देशास्तव जे लढले इथे…

कर्तव्यावर असताना,
नाही पाहिला प्रपंच त्यांनी…
भारत मातेच्या रक्षणार्थ,
रात्री जागविल्या नयनांनी…

निधड्या छातीने ऊभा ठाकला,
रक्षक माझ्या राष्ट्राचा …
वक्र दृष्टी पडताच कोणाची,
अवतार घेतला रुद्राचा…

अनेक वार झेलूनी त्यांनी,
रक्षण केले सीमांचे…
इंच इंच भूमी रक्षिली,
सर्वस्व ओवळूनी देहाचे…

एक एक वीर जवान लढला,
उडवुनी शत्रुची दाणादाण…
सैनिक आपल्या देशाची,
आन, बाण आणि आहे शान …

मरण पुढ्यात असतानाही,
सैनिक आमचा नाही हटला…
विररसता पाहून योध्याची,
मृत्यूही साक्षात पुढ्यात नामला …

भारतीय सैनिक
तिरंग्याची शान तू
समर्पणे वाहिले
देशा अभिमान तू….!!

मी सैनिक भारतमातेचा
डोईवर काट्याचा ताज
रांगडा वीर मी गडी
सैनिकी आमचा बाज

दाही दिशा रक्षिण्या
कटीबध्द जीवनी
“जयहिंद” बोलता
एल्गार…..रणांगणी

वीर जवान सीमेवर
देती सदा पहारा
शत्रू चालून येता
देती जवाब करारा

स्मरूया बलिदान त्यांचे
झाले शहिद जे अमर
गाथा वीररसाची,बलिदानाची
सदैव राहिल इतिहासात अजरामर……

अनिता नंदू बर्गे (भोसले )
कराड सातारा

Sainik Kavita in Marathi

काव्यबंध आयोजित रविवारीय काव्य लतिका स्पर्धा
दि.25/2/2024.
विषय- सैनिकासाठी कविता

भुमीपुत्र सैनिक तो | Sainik Kavita in Marathi


रुप तयाचे भासे
उभा विटेवरी पांडूरंग
सीमेवर उभा तो
घेऊन शस्त्र संग …१

येता वेळ युध्दाची
बाळगी न प्राणांची तमा
घेतला वसा त्याने
रक्षिण्या भारतमाता …२

मायभूचा लेक तो लाडका
जन्मीला उदरी त्या मातेने
पाणावले डोळे, आले जरी वीरमरण
उर फुलला मातेचा त्या अभिमानाने …३

झेलतो गारांचा धुवांदार पाऊस
तर कधी चटके उन्हाचे सोसतो
तरीही निडर उभा सीमेवर
भारत भुमीपुत्र सैनिक तो …४

असते ओढ त्यासही घराची
चिमुकल्या चिमण बाळांची
नाद होता कानी, होइ कासावीस
किणकिण जीवन संगीनीच्या कंकणांची …५

डोळ्यात तेल घालोनी उभा तो तिथं
जनसागर सारा निडर इथं निजे
तान्हूल बाळ निरागस कुशीत
आईच्या अलगद जशे विसावे …६

शुर वीर तो निधडया छातीचा
त्याला ना डर गनिमाचा
मावळा जसा शिवरायांचा
सैनिक तो भारत मातेचा …७

धन्य हो ती हरएक माऊली
दिला जिने पुत्र तिचा
देशसेवे साठी, वारसा
जपला तिने जिजाऊंचा …८

त्रिवार वंदन त्या माझ्या सैनिकाला
दिली सुरक्षा त्याने देशाला
लपेटूनी तिरंग्यात घरी आला
अमर घरा करूनी गेला …९

ऋण हे जन्माचे फिटणार नाही
तुझी पोकळी कधी भरणार नाही
करूनी मनाचा मुजरा सैनिकास
बलीदान तुझे कधी विसरणार नाही …१०


✍🏼 सौ. सुवर्णा बाबर, पुणे ) ✍🏼

Sainik Kavita in Marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *