भारत मातेचा वीर पुत्र आणि घरोघरी सैनिक | 2 Best Sainik Marathi Charoli in 2024

चंचल मुळे आणि सौ. क्षितिजा कुलकर्णी यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Sainik Marathi Charoli in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Sainik Marathi Charoli in 2024

काव्यबंध समूह आयोजित
काव्यतालिका
रविवारीय काव्यस्पर्धा
दिवस:२५-०२-२०२४
विषय – सैनिकासाठी कविता

भारतमातेचा वीर पुत्र | Sainik Marathi Charoli in 2024

भारत मातेचा वीर पुत्र घेऊन प्राण तळहातावर
उभा राहतो देश रक्षणासाठी सीमेवर..
उन,वारा,पाऊसधारा झेलून ही
पाय घट्ट जमिनीत रोवून ठेवतो
तो फक्त आणि फक्त भारत मातेचा वीर पुत्र सैनिक असतो..
निडर होऊन करतो सामना प्रत्येक संकटांचा
डाव उधळून लावतो शत्रूंचे तो
वीर पुत्र भारत मातेचा..
राखण्या तिरंग्याचा मान, सन्मान
हसून देतो भारत मातेचा वीर पुत्र बलिदान..
देश रक्षणासाठी घायाळ होतो
कित्येकदा छातीवर झेलतो
वार शत्रूंचे

गुणगान गातो नेहमी आम्ही साहित्यिक
आमच्या शब्दातून वीर भारत मातेच्या पुत्राचे..
भारत मातेचा वीर पुत्र देश सेवेला,कर्तव्याला देतो प्रथम प्राधान्य
परिवार, सणवार सगळ काही
देशापुढे वाटते त्याला शून्य..
आम्हा भारतीय नागरिकांना
गर्व आहे आमच्या भारत मातेच्यावीर पुत्रांवर
देशाची, तिरंग्याची शान राखण्यासाठी तहान, भूक विसरून उभे आहेत ते सीमेवर..
भारत मातेचे वीर पुत्र नेहमी देतात आहुती त्यांच्या प्राणांची
विजय तिलक लावुनी शान राखतात भारत मातेची..
ऐकून भारत मातेच्या पुत्राच्या शौर्याची गाथा
अभिमानाने नतमस्तक होतो
प्रत्येक भारतीय नागरिकाचा माथा…

चंचल मुळे ✍🏻 देऊळगाव राजा.
जिल्हा (बुलढाणा)

Sainik Marathi Charoli in 2024

काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतिका रविवारीय काव्यस्पर्धा

विषय सैनिकांसाठी कविता

घरोघरी सैनिक | Sainik Marathi Charoli in 2024

लढले सैनिक देशासाठी
करती माया धरतीवर
उभे राही बांधवांसाठी
प्राण बांधून सीमेवर

माणसे मायेची तयांची
वाट जरी बघती
किंमत नयनातल्या आसवांची
तयास बळकट बनवती

मोकळा श्वास घेणे
त्यांना माहीत नसते
जोखीम कायम उचलणे
जनास निवांत ठेवते

त्यांचा विचार करावा
हर एक नागरिकाने
घरोघरी सैनिक घडावा
पेटवून शत्रूच्या राखेने

सौ क्षितिजा कुलकर्णी
रुकडी

Sainik Marathi Charoli in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *