सदैव सैनिका पुढे जायचे | Best sainik var kavita in marathi in 2024

अनिता मधुकर भोई यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत sainik var kavita in marathi in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

sainik var kavita in marathi in 2024

काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतिका ,रविवारीय स्पर्धा
दि. 25/2/2024
विषय -सैनिकासाठी कविता

सदैव सैनिका पुढेच जायचे | sainik var kavita in marathi in 2024

अरे सदैव सैनिका पुढेच जायचे
झाले गेले सारे विसरून जायचे
तुझ्या जबाबदाऱ्या
न कोणा समजती
तुझ्या तोडीला कोणीच नसायचे

तुझ्यामुळे सारे आहेत सुरक्षित
आनंदाने आहेत हसत खेळत
सारे समजतात तुलाच दैवत
आहे खरे सत्य हेच जगतात

नाही कशाची तमा तुला रणांगणात
आहे फक्त तुला या देशाचे खूप वेड
तुझ्यासाठी आहे दिवस रात्र सारखे
नसे तुझा कशामध्ये स्वार्थ येत आड

असे तिरंगा तुझ्यासाठी महान
जीव तिरंग्यासाठी टाकिला गहाण तूच
देशसेवा हीच खरी ईश्वरसेवा
सत्य वचन घुमते जगतात खरेच

भेटे अनेक अजातशत्रू तुला
ठेवी दोन हात करण्याची तू धैर्यता
असा जवान वीर शोभे भारता
आहे नशीब आमुचे आम्हा शोभे वीरता

असे धाडस अनेक शस्त्र घेण्याचे
पाही हत्यारबंद तुला जेंव्हा
येत असे उफाळून वर
देशभक्ती साऱ्या नसानसात तेंव्हा

तुला नसे कशाचे भान या जगात
फक्त तुझ्या उरात मांडी शत्रू ठाण
डोक्यामध्ये तुझ्या नाद एकच
भारतमाता आमुची माता असे भाण

अनिता मधुकर भोई कुरूंदवाड (कोल्हापूर)

sainik var kavita in marathi in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *