मातृभूमी | Best Sainikachi marathi kavita in 2024

विद्या प्रधान यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Sainikachi marathi kavita in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Sainikachi marathi kavita in 2024

काव्यबंध समुह आयोजित

काव्यलतिका रविवारीय काव्यस्पर्धा

२५/२/२०२४

स्पर्धेसाठी स्वरचित कविता

विषय:- सैनिकासाठी कविता.

मातृभूमी | Sainikachi marathi kavita in 2024

होई भरती सैन्यात
भारताचा अभिमान
स्वप्न पाहतो सैनिक
विसरून सारे भान.

जबाबदारीची जाण
जिद्द अंगात अपार
ध्येय!शत्रूशी सामना
देशासाठी लढणार.

मागे सोडून कुटुंब
मन बेचैन उदास
देशसेवा महत्वाची
सैनिकास लागे आस. ३

बालपणापासूनचे
स्वप्न पूर्णत्वास नेई
मातृभूमी रक्षणार्थ
बळ झोकुनिया देई.

वीर सैनिक लढती
देशासाठी सीमेवर
प्राणप्रिय मायभूमी
सडे रक्ताचे भूवर. ५

घरदार नाते गोते
सारे जाती विसरून
सेवा देशाची महान
म्हणे! हुंदका गिळून. ६

कर्तव्याच्या कसोटीत
नसे पर्वा कशाचीही
ध्येय पूर्ण करण्यास
झेली संकटे कितीही. ७

असो शितल गारवा
पावसाची तमा नसे
हाती बंदूक धरून
रणी उभे राहातसे.

चिंता कुटुंबाची जरी
प्रामाणिक देशासाठी
लढा शत्रूशी देऊन
वीर! रक्षणास पाठी. ९

भारताचे संरक्षण
हाचि असे मनी ध्यास
लढा अखेरपर्यंत धरी रोखुनिया श्वास १०

बलिदान देशासाठी
वीर जिद्दीने लढती
रणी शत्रूशी जिंकून
श्वास आनंदें सोडती
११

तिरंग्यात अमरत्व
सन्मानाने पत्करती
नित्य जवान स्मरणी
कर आमुचे जुळती.
१२

निद्रा शांत सुखावते
लढे सैनिक रणात
अभिमान हिंमतीचा
क्षणी दाटून मनात.
१३

ध्वज फडकला नभी
मुल्य प्राण तिलांजली
नेत्री आसवांच्या सरी
वाहुनिया श्रद्धांजली. १४

विद्या प्रधान
ठाणे

Sainikachi marathi kavita in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *