सैनिक देशाचा | Best Sainikasathi Kavita in 2024

सौ. अनिता डोंगरवार यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Sainikasathi Kavita in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Sainikasathi Kavita in 2024

काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतिका ,रविवारीय स्पर्धा
दि. 25/2/2024
विषय -सैनिकासाठी कविता

सैनिक देशाचा | Sainikasathi Kavita in 2024

देशाच्या रक्षणासाठी सज्ज
भारतमातेचा लाडका सुपुत्र
कुटुंबापासून कोसो दूर
रक्षण करतो दिवस रात्र …..

उन पाऊस वारा
तमा नसते काही
वचनबध्द तत्पर होवून
शत्रुला शोधत राही ……

केशरी पांढरा हिरवा
तिरंगा झेंडा देशाचा
सदैव लहरत असावा
ध्यास आम्हा सर्वांचा …

खाकी वर्दी बंदुक हाती
सीना तानून करिती
दऱ्याखोऱ्यात पहाडावर
रणागंणी शत्रुंशी लढती …..

सैनिकांना अभिमान देशाचा
रक्तबंबाळ होवुनी ध्वजाला
हवेतच वरचे वर झेलूनी
वाचवतो आन बान शानला …..

कुटुंबांचा रथाला हाकती
अर्धांगीनी होवुनी सारथी
आई वडिल पोरंबाळ सर्व
सन्मानाने आनंदी राहती …..

कर्तव्यातून मिळते कधी सुट्टी
वाट बघतात घरची
वर्ष निघूनी जातो
खबर येत नाही परतीची ….

मिळताच इशारा शत्रुंचा
धाव घेतो ठिकाणाचा
सडो कि पडो करूनी
लौकिक मिळवितो विजयाचा …..

दश दिशांना घेरूनी
सैनिक करितो रखवाली
सुखाची झोप घेते
निश्चींत दुनिया सारी ….

दुश्मनांशी लढता लढता
गमावतो तो प्राणज्योत
सलामी त्या शूरवीरास
देतात लपेटून तिरंग्यात …..

देशासाठी लढतो देशभक्त
स्मरण करावे सर्वांनी
सैनिकाची ती कारकिर्द
होवूनी नतमस्तक शहिद दिनी ….

नौसैना, वायुसेना ,भूदल
सदा सज्ज ताफा सैनिकांचा
शत्रुंचा आक्रमणावर धावती
विलंब न लावता क्षणाचा ….

जगी विरहात सैनिक कुटुंब
गौरव व्हावा तयाचा
सैनिक साह्य नीधीत
हातभार असावा सर्वांचा ….

सौ. अनिता डोंगरवार
मु.त.जि. गोंदिया

Sainikasathi Kavita in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *