करूया स्मरण त्या वीरांचे | Best Sainikasathi Kavita Marathi in 2024

प्रणाली सावंत यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Sainikasathi Kavita Marathi in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Sainikasathi Kavita Marathi in 2024

काव्यबंध समूह आयोजित,
काव्यलतिका रविवारीय काव्यस्पर्धा.
दिनांक- 25- 2- 2024.
विषय- सैनिकांसाठी कविता.


करुया स्मरण त्या वीरांचे | Sainikasathi Kavita Marathi in 2024

आकाशी ढग युद्धाचे दाटले,
भारतमाता भयंकित झाली.
शत्रू झाला शिरजोर, मित्र म्हणवूनी,
देवभूमी ही रक्तरंजीत झाली.
पाहूनी शत्रूची नजर वाकडी,
ललकारत उठले वीर हजार.
मुठी लाख वळल्या त्वेषाने,
करुनी भारतमातेचा जयजयकार.
एकेक वीर छावा जाहला,
कंठस्नान त्याने शत्रूस घातले.
मिटवूनी पावले अशुभ,
ऋण भूमीचे त्याने फेडले.
भूमी ही रक्ताने न्हाली,
लाल मातेचे धरणीवर विसावले.
देऊनी सर्वस्व जीवनाचे,
रक्षणी तिरंग्याच्या अमर झाले.

हे सैनिका,
काव्य कसे रचू मी,
शब्दांची मज उणीव भासते.
गाण्यास तुझी पराक्रमगाथा,
मन माझे दाटून येते.
बंदूक घेऊनी हाती,
उभा तू मायभूमीच्या द्वारी.
करूनी रक्षण भूमीचे,
जागूनी निरंतर अष्टोप्रहरी.
गोठवणारे थंड वारे,
सियाचीनही थिजवूनी गेले.
अभेद्य तुझ्या निश्चयास,
थिजवू परि न शकले.
रणरणते निष्ठूर वाळवंट,
तुलाच गारवा देऊन गेले.
उंच शिखरे हिमालयाची,
पाहूनी शौर्य तुझे नत झाले.
निष्प्राण तुझ्या देहावर,
तिरंगाही गौराविंत झाला.
ओलेत्या अनेक डोळ्यांत,
तुझा पराक्रम दिसू लागला.
विसरु नको रे बांधवा,
बलिदान सीमेवरल्या त्या वीरांचे.
जे लढता लढता उरले,
रक्षण करुनी आपल्या जीवनाचे.
त्या पावन सीमेवर,
सांडू दे माझाही एक थेंब रक्ताचा,
गंध वीररक्ताचा जिथल्या मातीला,
हवेत दरवळतो वीररस पराक्रमाचा.

प्रणाली सावंत, अंधेरी , मुंबई.

Sainikasathi Kavita Marathi in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *