Samarth Ramdas Information In Marathi

Samarth Ramdas Information In Marathi । समर्थ रामदास स्वामी संपूर्ण Free माहिती 2023

राम व हनुमानाची ची उपासना करून जगाला राष्ट्रप्रेमाची शिकवण देणारे समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल Samarth Ramdas Information In Marathi आपण पाहणार आहोत.

Samarth Ramdas Information In Marathi

समर्थ रामदास स्वामी यांचे पूर्ण नाव “नारायण सूर्याजी ठोसर असे आहे. त्यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी शके १५३० म्हणजेच 24 मार्च 1608 रोजी महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्यातील जांब या ठिकाणी झाला. समर्थ रामदास स्वामी यांच्या वडिलांचे नाव “सूर्याजी ठोसर” होते. ते देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण असून त्यांचे गोत्र “जमदग्नी” होते आणि त्यांच्या आईचे नाव “राणूबाई” होते. ठोसरांचे घराणे हे “सुर्योपासक” या घराण्याचे होते. समर्थ रामदास स्वामी हे अवघ्या 7 वर्षाचे असतांना त्यांचे वडील “सूर्याजी ठोसर” यांचे निधन झाले.

त्यांच्या घरची सांपत्तिक स्थिती ही चांगली होती परंतु रामदास स्वामी ये लहानपणापासून च विरक्त होते. ते अतिशय बुद्धिमान, निश्चयी, खोडकर तसेच साहसी सुद्धा होते.

झाडावर उद्या मारणे, पाण्यात पोहणे, घोड्यावर रपेट मारणे अशा कामात ते तरबेज होते. सुतार, लोहार, गवंडी, तर गवळी असे त्यांचे 8 मित्र होते. त्यामुळे त्यांनी त्या सर्व मित्रांच्या सहवासात राहून त्यांनी निरिक्षणातून तर काही अनुभवातून सर्व व्यवसायाचा उत्तम ज्ञान मिळविला होता.

Samarth Ramdas Information In Marathi । समर्थ रामदास स्वामी संपूर्ण Free माहिती 2023

एके दिवशी रामदास स्वामी हे एके ठिकाणी लपलेले होतें आणि काही केल्या कुणालाही सापडत न्हवते तेव्हा त्यांच्या आईला ते एका फडताळात सापडले तेव्हा त्यांना त्यांच्या आईने विचारले की, “तू काय करत होतास?” तेव्हा त्यांनी सांगितलं की, “आई, चिंता करितो विश्वाची” त्यामुळे त्यांच्या आईला त्यांची चिंता वाटू लागली आणि विचार करू लागली की, याला संसारात अडकवलं तर तो ताळ्यावर येईल. त्यामुळे त्यांचं त्यांच्या वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी लग्न ठरवलं.

लग्न समारंभात पुरोहितांनी जेव्हा “सावधान” असा शब्द उच्चारला त्याच वेळी समर्थ रामदास स्वामी यांनी नसलेले एक व अंगावर पांघरलेले एक अशा दोन कपड्यानिशी त्यांना तिथून तळ ठोकला व पसार झाले. सर्व लोकांनी त्यांचा पाठलाग केला परंतु त्यांना ते घावले नाही कारण त्यांनी गावाबाहेरची नदी गाठून डोहात उडी मारली.

Samarth Ramdas Information In Marathi । समर्थ रामदास स्वामी संपूर्ण Free माहिती 2023

रामदास स्वामी यांनी केलेली तपश्चर्या आणि साधना

Samarth Ramdas Information In Marathi । समर्थ रामदास स्वामी संपूर्ण Free माहिती 2023

लग्न समारंभातून पळून येऊन ते टाकळीस आले आणि तिथे त्यांनी रामाचे दर्शन घेऊन 12 वर्षे म्हणजे इ. स. 1621 ते इ. स. 1633 असे 12 वर्षे त्यांनी टाकळी मध्ये तपश्चर्या केली आणि ते थेट नाशिक ला आले. तिथे त्यांनी आपल्याला कुणी ओळखू नये म्हणून “नारायण” या त्यांच्या मूळ नावाचा त्याग करून “रामदास” हे नवे नाव धारण केले. रामदास हे नाव यासाठी धारण केले कारण त्यांचा जन्म रामनवमी च्या दिवशी झाला होता आणि त्यामुळे त्यांनी स्वतःला रामाचा दास म्हणवून घेतला होता त्यामुळे त्यांनी स्वतःचं नाव “रामदास” करून घेतले.

Samarth Ramdas Information In Marathi । समर्थ रामदास स्वामी संपूर्ण Free माहिती 2023

तपश्चर्या च्या कालावधीत ते रोज पहाटे ब्राम्हमुहूर्तावर उठून 1200 सूर्यनमस्कार घालत असत. नंतर सूर्योदय पासून ते मध्यांह पर्यन्त ते नदीच्या डोहात छाती इतक्या पाण्यामध्ये उभे राहून 2 तास गायत्री मंत्राचा जप करून नंतर श्री राम जय राम जय जय रामया त्रयोदशी मंत्राचा जप करून 13 कोटी वेळी रामाचा नामस्मरण करीत असत. हे सर्व झाल्यावरच ते त्यांच्या पुढच्या कार्याला आरंभ करीत असत. साक्षात प्रभू श्री राम हेच त्यांचे सद्गुरू झाले असे मानले जात होते.

Samarth Ramdas Information In Marathi । समर्थ रामदास स्वामी संपूर्ण Free माहिती 2023

समर्थ रामदास स्वामी हे दुपारी फक्त 5 घरी जाऊन भिक्षा मागत असत आणि मिळालेल्या भिक्षा मधून आधी रामाला नैवैद्य घालून थोडेसे पशू पक्षांना देऊन उरलेले अन्न स्वतः खायचे. समर्थ रामदास स्वामी हे दुपारी 2 तास श्रवण करून नंतर दोन तास ग्रंथाचा अभ्यास करीत असत. याच काळात त्यांनी वेद, उपनिषद, सर्व प्राचीन ग्रंथ व विविध शास्त्रांचा अभ्यास केला.

रामायणाची रचना सुद्धा केली. त्यांच्या या साधकावस्थेमध्ये त्यांनी आर्ततेने श्रीरामाची प्रार्थना केली तीच ‘करुणाष्टके’ होत. त्यांच्या आयुष्यात अध्ययन, व्यायाम आणि उपासना या तिन्ही गोष्टींचा महत्वाचा स्थान होता. त्यांच्या आयुष्यातील 12 वर्षे हे अत्यंत कळकळीची गेली. त्यांनी 12 वर्षे तपश्चर्या करून त्यांना आत्मसाक्षात्कार झाला असे म्हणतात. त्यावेळी समर्थ रामदास स्वामी यांची वय 24 वर्षे होती. त्यांनी नाशिक येथील टाकळी ला हनुमाची मूर्ती स्थापन केली. कारण त्यांचा असा विचार होता की हनुमान ही शक्तीची आणि बुध्दीची देवता आहे त्यामुळे त्यांची उपासना केली पाहिजे.

Samarth Ramdas Information In Marathi । समर्थ रामदास स्वामी संपूर्ण Free माहिती 2023

समर्थ रामदास स्वामी आणि गुरू हरगोविंद सिंह यांची भेट

समर्थ रामदास स्वामी यांनी आपली तपश्चर्या पूर्ण करून भारत भ्रमण करण्यास निघाले आणि त्यांनी अनेक ठिकाणी तीर्थयात्रा काढली. नंतर ते फिरत फिरत हिमालयात आले तेव्हा त्यांच्या मनातील वैराग्य भाव नष्ट झाला आणि त्यांच्या देहाबद्दल ची आशक्ती पूर्णपणे नाहीशी झाली. त्यांना प्रभू रामचंद्रांचे दर्शन झाले आणि त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. नंतर ते भारत भ्रमण करीत असतांना ते श्रीनगर मध्ये जाऊन पोहोचले तेव्हा त्यांना शिखांचे सहावे धर्मगुरू हरगोविंद सिंह यांच्याशी योगायोगाने भेट झाली.

Samarth Ramdas Information In Marathi । समर्थ रामदास स्वामी संपूर्ण Free माहिती 2023

समाजामधील असलेल्या दुर्धर परिस्थितीवर दोघांची चर्चा झाली. हरगोविंद सिंह सोबत 1000 सैनिक असत आणि त्यांच्या कमरेला दोन तलवारी असत. हे बघून समर्थ रामदास स्वामी यांनी आश्चर्यचकीत होऊन त्यांना विचारलं, “आपण धर्मगुरू आहात मग या दोन दोन तलवारी आपण का बाळगता?” यावर त्यांनी उत्तर दिलं, “एक तलवार धर्माच्या रक्षणासाठी तर दुसरी तलवार स्त्रियांच्या शिलरक्षणासाठी आहे.”

Samarth Ramdas Information In Marathi । समर्थ रामदास स्वामी संपूर्ण Free माहिती 2023

समर्थ रामदास स्वामी यांनी त्यांना पुन्हा आश्चर्यचकीत होऊन विचारलं, “मग हा सगळा फौजफाटा कशासाठी?” यावर त्यांनी उत्तर दिलं, “धर्माचे रक्षण करणारे हे सैन्य आहे. सध्या शत्रू एवढे अन्याय करीत आहे, केवळ शांती आणि सलोखा यांनी प्रश्न सुटणार नाही. आपल्याला शस्त्रसज्ज झाले पाहिजे. या जगात दुर्बल माणसाला काही किंमत नसते. आपण बलशाली झाले पाहिजे.” ‘समान-शीले-व्यसनेषु सख्यम्’ या न्यायाने दोघांत सख्य झाले. समर्थ रामदास स्वामी हे गुरू हरगोविंद यांच्या बरोबर सुवर्ण मंदिरात आले. तिथे ते दोन महिने राहिले. तेव्हापासून समर्थ रामदास स्वामी हे शस्त्र बाळगू लागले.

Samarth Ramdas Information In Marathi । समर्थ रामदास स्वामी संपूर्ण Free माहिती 2023

समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेले मारोती मंदिर

(१) दास मारुती, चाफळ (राम मंदिरासमोर)
(२) वीर मारुती, चाफळ (राम मंदिरामागे)
(३) खडीचा मारुती, शिंगणवाडी, चाफळ (डोंगरावर)
(४) प्रताप मारुती, माजगांव, चाफळ
(५) उंब्रज मारुती (ता. कराड)

(६) शहापूर मारुती (उंब्रज जवळ)
(७) मसूर मारुती (ता. कराड)
(८)बहे-बोरगांव (कृष्णामाई) मारुती (जि. सांगली)
(९) शिराळा मारुती (बत्तीस शिराळा, जि. सांगली)
(१०) मनपाडळे मारुती (जि. कोल्हापूर)
(११) पारगांव मारुती (जि.कोल्हापूर)

Samarth Ramdas Information In Marathi । समर्थ रामदास स्वामी संपूर्ण Free माहिती 2023


Maza Avadta Sant Essay In Marathi | माझा आवडता संत निबंध लेखन

SANT DNYANESHWAR INFORMATION IN MARATHI वाचा

Guru Purnima Speech in Marathi


समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापित केलेले मठ

समर्थ रामदास स्वामी यांनी समर्थ संप्रदायाची स्थापना केलेली होती त्यांची मठ पुढील प्रमाणे

१. जांब
२. चाफळ
३. सज्जनगड
४. डोमगाव
५. शिरगाव
६. कन्हेरी

Samarth Ramdas Information In Marathi । समर्थ रामदास स्वामी संपूर्ण Free माहिती 2023

समर्थ रामदास स्वामी यांचे साहित्य

 1. अस्मानी सुलतानी
 2. आत्माराम
 3. आनंदवनभुवनी
 4. एकवीरा समाधी अर्थात्‌ जुना दासबोध
 5. करुणाष्टके
 6. छत्रपती शिवाजी महाराजांना लिहिलेले पत्र
 7. दासबोध
 8. समर्थकृत देवी स्तोत्रे
 9. नृसिंहपंचक : हे काव्य लाटानुप्रासाचे उत्तम उदाहरण आहे.
 10. ’भीमरूपी महारुद्रा’ सारखे स्तोत्र

Samarth Ramdas Information In Marathi । समर्थ रामदास स्वामी संपूर्ण Free माहिती 2023

 • मनाचे श्लोक- मनाचे श्लोक एकूण २०५ आहेत.
 • मारुति स्तोत्र
 • रामदास स्वामींचे अभंग
 • मुसलमानी अष्टक
 • राममंत्राचे श्लोक
 • समर्थांच्या उर्दू पदावल्यांचे पुस्तक
 • सवाई
 • ’सुखकर्ता दुखहर्ता’, ’लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा’, ’सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं’, यांसारख्या सुमारे ६१ आरत्या
 • सोलीव सुख

समर्थ रामदास स्वामी यांच्यावरील चित्रपट व नाटके

 1. जय जय रघुवीर समर्थ (मराठी लघुपट, दिग्दर्शक जितेंद्र वाईकर)
 2. समर्थ रामदास स्वामी (मराठी चित्रपट, दिग्दर्शक राजू सावंत)
 3. श्रीशिवसमर्थ (नाटक, लेखक : जयवंत पंदिरकर)
 4. श्री राम समर्थ (चित्रपट, दिग्दर्शक संतोष तोडणकर)
 5. रघुवीर

समर्थ रामदास स्वामी यांचा मृत्यू

समर्थ रामदास स्वामी यांनी 13 जानेवारी 1681 रोजी सज्जनगड या ठिकाणी “जय जय रघुवीर समर्थ” असा जाप करत आपले प्राण सोडले. त्यावेळी त्यांच्या सोबत उद्धव स्वामी, आक्का बाई आणि कल्याण स्वामी हे होते. त्यांनी शेवटचे 5 दिवस अन्न पाणी वर्जित केलं होतं.

Samarth Ramdas Information In Marathi । समर्थ रामदास स्वामी संपूर्ण Free माहिती 2023

Author:- आशु छाया प्रमोद (रावण)

कवी आशिष

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *