Sane Guruji Information In Marathi

साने गुरुजी माहिती 1000 शब्दांमध्ये | Best Sane Guruji Information In Marathi

“शामची आई” चे लेखक साने गुरुजी यांचे Sane Guruji Information In Marathi या Article मधून एक सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी असे विविध पैलू आपण अभ्यासणार आहोत.

Sane Guruji Information In Marathi

साने गुरुजी माहिती 1000 शब्दांमध्ये | Best Sane Guruji Information In Marathi

साने गुरुजी यांचे पूर्ण नाव “पांडुरंग सदाशिव साने” असे आहे. त्यांच्या वडिलांचे नाव “सदाशिव साने” होते. ते कोर्टामध्ये काम करीत होते. साने गुरुजी यांच्या वडिलांच्या काळी त्यांचे घर फार श्रीमंत होते मात्र हळू हळू त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळत चालली होती आणि त्यांच्या वडिलांच्या काळात तर परिस्थिती एवढी बिकट झाली की, त्यांचं घर सुद्धा जप्तीस गेले.

अशा गरिबीत 24 December 1899 रोजी “पांडुरंग सदाशिव साने” उर्फ साने गुरुजी यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहराजवळील पालगड येथे त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचं नाव यशोदाबाई सदाशिव साने होते. त्यांच्या आईने त्यांना लहानपणापासूनच सुसंस्कृत केले आणि त्यांचेच संस्कार त्यांच्या बालमनावर घडले. परंतु त्यांची आई यशोदाबाई यांचा सन 1917 मध्ये निधन झाले. त्यांना त्यांची आई खूप प्रिय होती. त्यांनीच त्यांच्यावर घडवलेले सर्व संस्कार आणि त्यांच्या आई सोबत घालवलेले काही क्षण हे सर्व एकत्रित करून त्यांनी “शामची आई” ही पुस्तक नाशिक मधील तुरुंगात असतांना लिहिली.

आपल्या मुलांवर चांगले संस्कार करायचे असतील तर “शामची आई” ही पुस्तक एकदा नक्की वाचावी असं मला वाटते. त्यांना कविता लिहिण्यात देखील रस होता. साने गुरुजी महात्मा गांधी यांच्या विचारांशी फार प्रभावित होते.

खालील चित्रावर क्लिक करून तुम्ही श्यामची आई हे पुस्तक विकत घेऊ शकता. चित्रावर Amazon Store ची affiliate लिंक दिलेली आहे.

साने गुरुजी यांचे शिक्षण

साने गुरुजी यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या जन्मगावी म्हणजेच दापोली शहरातील पालगड या ठिकाणी झाले. त्या नंतर त्यांना पुढील शिक्षणासाठी पुणे येथील त्यांच्या मामाकडे पाठविण्यात आले. परंतु त्यांचे मन पुण्यामध्ये रमले नाही त्यामुळे ते परत पालगड ला आले आणि जवळच्याच दापोली शहरात ते पुढील शिक्षण घेऊ लागले. येथे त्यांची मराठी आणि संस्कृत या भाषेवर प्रभुत्व मिळवणारे हुशार विद्यार्थी म्हणून ओळख झाली. दापोली येथे शिक्षण घेत असतांना त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणखी जास्त खालावली त्यामुळे त्यांच्या वडिलांना साने गुरुजींचे पुढील शिक्षण न परवडण्यासारखे झाले. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी पुणे येथील औंध संस्थेमध्ये दाखल केले. त्या संस्थेत गरीब मुलांना विनामूल्य शिक्षण आणि मोफत जेवण दिले जाते होते. त्यानंतर औंध संस्थेमध्ये प्लेग नावाची महाभयंकर साथ आली त्यामुळे तेथील सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठविण्यात आले.

साने गुरुजी यांच्या वडिलांची फार ईच्छा होती की आपल्या मुलाने म्हणजेच साने गुरुजी यांनी खूप शिकावे. त्यांची ईच्छा पुर्ण करण्यासाठी साने गुरुजी परत पुणे ला गेले आणि तेथील नूतन मराठी विद्यालय मध्ये विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला. तिथे त्यांना फार त्रास सहन करावा लागत होता. वेळेवर जेवण मिळत नव्हते की मिळाले तरी देखील पोट भर जेवण मिळत नव्हते. एव्हढे त्रास सहन करून देखील त्यांनी तिथे आपले शिक्षण पूर्ण केले आणि सन 1918 साली त्यांनी हायस्कूल मधून मॅट्रिक चे प्रमाणपत्र मिळविले.

मॅट्रिक चे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण सर परशुरामभाऊ कॉलेज मधून केले त्यात त्यांनी BA ची Degree मिळविली नंतर पुढे त्यांनी मराठी आणि संस्कृत विषयात मास्टर केले.

साने गुरुजींचे शिक्षक कारकीर्द

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. तिथे त्यांनी 6 वर्षे शिक्षक म्हणून काम केले. तेथील वसतिगृहात वॉर्डन म्हणून देखील काम केले. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना त्यांनी स्वतःचे उदाहरण देऊन स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्र येथे त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला.
शाळेमध्येच शिक्षक असतांना त्यांनी “विद्यार्थी” या नावाचे मासिक चालू केले. जे विद्यार्थ्यांना फार आवडले आणि ते प्रचलित सुद्धा झाले. सहा वर्षे त्या शाळेत नोकरी केल्यानंतर त्यांनी स्वतःचे पुढील आयुष्य स्वातंत्र्य लढ्यासाठी समर्पित केण्याचा निर्णय घेतला.

साने गुरुजी यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान

साने गुरुजी माहिती

स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्यासाठी त्यांनी सन 1930 साली शालेय नोकरी चा राजीनामा दिला. त्यावेळी महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा चालू केली होती. साने गुरुजी यांनी सन 1930 ते सन 1947 या कालावधीत त्यांनी अनेक वेगवेगळ्या आंदोलनात सहभागी घेतला आणि त्यासाठी त्यांना 8 वेळा तुरुंगात टाकण्यात आले होते. त्रिचिनापल्ली, नाशिक, येरवडा आणि जळगाव येथील तुरूंगात एकूण सहा वर्षे सात महिने वेगवेगळ्या ठिकाणी तुरुंगात टाकले होते.

साने गुरुजीयांनी तमिळ आणि बंगाली भाषा त्रिचिनापल्ली या तुरुंगात असतांना शिकले आणि “शामची आई” ही त्यांची सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिक येथील तुरुंगवासात असतांना लिहिलेली होती.
सन 1936 साली जळगाव जिल्ह्यातील फैजापूर येथे काँग्रेस चे अधिवेशन यशस्वी होण्यासाठी काम केले. त्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन महत्वाची भूमिका निभावली होती. फैजापूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी ‘मैला वाहणे’ व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली. त्यानी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली.
सन 1942 रोजी त्यांनी “भारत चोडो” सहभाग घेतला होता आणि त्यासाठी त्यांना 15 महिन्यासाठी तुरुंगात टाकले गेले होते.

साने गुरुजी यांचे सामाजिक कार्य

त्यावेळी समाजात जिकडे तिकडे जातीभेद, दलीत लोकांना मिळणारी वागणूक, अस्पृश्यता या सारख्या अनेक चाली रूढी होत्या. साने गुरुजी यांनी अशा रूढी परंपरा चा कडाडून विरोध केला.
सन 1946 साली त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला कारण पंढरपूर येथील विठ्ठलाच्या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळत न्हवता. काही केल्या हा प्रश्न सुटेना त्यासाठी त्यांनी शेवटी उपोषणाचा मार्ग निवडला आणि 11 दिवस उपोषण केल्यानंतर अखेर अस्पृश्यांना पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळाला. ‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले होते.

साने गुरुजी यांचा मृत्यू

सन 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची हत्या केली गेली. याचा त्यांच्या मनावर फार परिणाम झाला. त्यामुळे ते फार अस्वस्थ झाले होते. अखेर त्यांनी 11 जून 1950 रोजी झोपेच्या गोळ्यांचा अती वापर करून आत्महत्या केली.

गुरुजी यांचे साहित्य

 1. विश्राम
 2. शबरी
 3. श्री शिवराय (चरित्र, ८ भाग)
 4. शिशिरकुमार घोष (चरित्र)
 5. धडपडणारा श्याम
 6. श्याम खंड १, २ (हे पुस्तकही बोलके पुस्तक म्हणून मिळते.)
 7. श्यामची आई
 8. श्यामची पत्रे
 9. भगवान श्रीकृष्ण (चरित्र, ८ भाग)
 10. संस्कृतीचे भवितव्य
 11. सती
 12. संध्या
 13. समाजधर्म. (लेखक : भगिनी निवेदिता व साने गुरुजी)
 14. साधना
 15. साक्षरतेच्या कथा
 16. सुंदर कथा
 17. सुंदर पत्रे
 18. सोनसाखळी व इतर कथा
 19. सोन्या मारुती
 20. स्त्री जीवन
 21. स्वदेशी समाज
 22. स्वप्न आणि सत्य
 23. स्वर्गातील माळ
 24. राष्ट्रीय हिंदुधर्म. (भगिनी निवेदिता यांच्या मूळ पुस्तकाचा अनुवाद)
 25. हिमालयाची शिखरे व इतर चरित्रे
 26. जयंता
 27. जीवनप्रकाश
 28. जीवनाचे शिल्पकार (राजवाडे, टागोर, ईश्वरचंद्र, शिशिरकुमार आणि काही इतर चरित्रे)
 29. तीन मुले
 30. ते आपले घर
 31. त्यागातील वैभव
 32. त्रिवेणी
 33. दारुबंदीच्या कथा
 34. दिगंबर राय
 35. दिल्ली डायरी
 36. दुर्दैवी
 37. देशबंधु दास (चरित्र)
 38. धडपडणारी मुले
 39. नवजीवन
 40. नवा प्रयोग
 41. आपले नेहरू (चरित्र)
 42. पत्री
 43. बेंजामिन फ्रॅंकलिन (चरित्र)
 44. भारताचा शोध
 45. भारतीय नारी
 46. भारतीय संस्कृती (मराठीसह इंग्रजी आणि अन्य भारतीय भाषांत)
 47. माझी दैवते
 48. मानवजातीची कथा
 49. मिरी
 50. मुलांसाठी फुले
 51. मेंग चियांग आणि इतर गोष्टी
 52. मोरी गाय
 53. मृगाजिन
 54. यश
 55. इतिहासाचार्य राजवाडे (चरित्र)
 56. रामाचा शेला
 57. विनोबाजी भावे
 58. अमोल गोष्टी (हे पुस्तक बोलके पुस्तक-Audio book म्हणून पण मिळते)
 59. अस्पृश्योद्धार
 60. आपण सारे भाऊ
 61. आस्तिक
 62. इस्लामी संस्कृति
 63. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर (चरित्र)
 64. उमाळा
 65. कलिंगडाच्या साली
 66. करुणादेवी
 67. कर्तव्याची हाक
 68. कला आणि इतर निबंध
 69. कला म्हणजे काय?
 70. कल्की अर्थात संस्कृतीचे भविष्य
 71. कावळे
 72. ‘कुरल’ नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठी भाषांतर
 73. क्रांति
 74. बापूजींच्या गोड गोष्टी (गांधींचे चरित्र)
 75. महात्मा गांधींचे दर्शन (चरित्र)
 76. गीताहृदय
 77. गुरुजींच्या गोष्टी
 78. गोड गोष्टी (कथामाला), भाग १ ते १०
  भाग १ – खरा मित्र
  भाग २ – घामाची फुले
  भाग ३ – मनूबाबा
  भाग ४ – फुलाचा प्रयोग
  भाग ५ – दुःखी
  भाग ६ – सोराब आणि रुस्तुम
  भाग ७ – बेबी सरोजा
  भाग ८ – करुणादेवी
  भाग ९ – यती की पती
  भाग १० – चित्रानी चारू
 79. नामदार गोखले (चरित्र)
 80. गोड निबंध भाग १, २, ३
 81. गोड शेवट
 82. गोप्या
 83. गोष्टीरूप विनोबाजी
 84. महात्मा गौतम बुद्ध (चरित्र)
 85. चित्रकार रंगा

गुरुजी यांच्यावर लिहिलेले चरित्र

 1. आपले साने गुरुजी
  लेखक – डॉ. विश्वास पाटील
 2. जीवनयोगी सानेगुरुजी
  लेखक – डॉ. रामचंद्र देखणे
 3. निवडक सानेगुरुजी
  लेखक – रा.ग. जाधव
 4. मराठीतील संस्कारवादी साहित्याचा विशेषतः साने गुरुजींच्या वाङ्मयाचा चिकित्सक अभ्यास
  लेखक – प्रा.डाॅ. ए.बी. पाटील
 5. महाराष्ट्राची आई साने गुरुजी
  लेखक – वि.दा. पिंपळे
 6. मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी सानेगुरुजी
  लेखक – आचार्य अत्रे
 7. साने गुरुजी
  लेखक – यदुनाथ थत्ते, रामेश्वर दयाल दुबे
 8. साने गुरुजी आणि पंढरपूर मंदिरप्रवेश चळवळीचे अध्यात्म
  लेखक – आत्माराम वाळिंजकर
 9. साने गुरुजी : एक विचार
  लेखक – संजय साबळे
 10. सानेगुरुजी गौरव ग्रंथ
  संपादक – रा.तु. भगत
 11. साने गुरुजी जीवन परिचय
  लेखक – यदुनाथ थत्ते
 12. साने गुरुजी – जीवन, साहित्य आणि विचार
  लेखक – अज्ञात
 13. सानेगुरुजी पुनर्मूल्यांकन
  लेखक – भालचंद्र नेमाडे
 14. सानेगुरुजी यांची सुविचार संपदा
  लेखक – वि.गो. दुर्गे
 15. सानेगुरुजी साहित्य संकलन
  लेखक – प्रेम सिंह
 16. सेनानी साने गुरुजी
  लेखक – राजा मंगळवेढेकर

Author:- आशु छाया प्रमोद (रावण)

कवी आशिष

समाप्त


Kalpana Chawala Information in Marathi

Shiv Jayanti Information in Marathi 2023

3 thoughts on “साने गुरुजी माहिती 1000 शब्दांमध्ये | Best Sane Guruji Information In Marathi”

 1. Pingback: निसर्ग माझा मित्र मराठी निबंध 500+ शब्द | Nisarg Maza Mitra Nibandh Marathi

 2. Pingback: मी लावलेले झाड मराठी निबंध 500+ शब्द | Mi Lavlele Jhad Nibandh Marathi

 3. Pingback: माझे गाव मराठी निबंध 500+ शब्द | Maze Gav Marathi Nibandh

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
21 + 9 =