Sant Tukaram Maharaj Gatha Mandir

Sant Tukaram Maharaj Gatha Mandir

माहिती

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रातील दोन प्रमुख संत कवी असलेल्या ज्ञानबा आणि तुकारामाच्या जयघोषाशिवाय कोणताही मोठा उत्सव किंवा धार्मिक कार्य पूर्ण होत नाही.आपल्या महाराष्ट्राला संत कवींची मोठी परंपरा लाभलेली आहे. या संत कवींनी हिंदू धर्माचे रक्षणच केले नाही तर त्यांच्या मधून अश्या अभंगांद्वारे त्यांनी धार्मिक ज्ञान सर्वसामान्य माणसानं पर्यंत पोहोचवले.या अभंगांचे पठण करणे आणि समजून घेणे अगदी सोपे आहे . ज्यांनी लोकांना एकत्र आणले. त्यांना सद्गुण आणि मूल्ये शिकवली . संत तुकाराम महाराज हे या संत कवींमध्ये प्रमुख संत होते. पुण्याजवळील देहू येथे त्यांचे वास्तव्य होते.त्या ठिकाणी असलेले संत तुकाराम गाथा मंदिर हे संपूर्ण भारतातील भाविकांचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे.Sant Tukaram Maharaj Gatha Mandir

देहू येथे संत तुकाराम महाराज गाथा मंदिर कसे जाल ?

संत तुकाराम महाराज गाथा मंदिर देहू हे कुठे आहे?
जिल्हा – पुणे
जवळचे मोठे गाव – पुणे
रेल्वे स्टेशन – शिवाजी नगर , पुणे
विमानतळ – लोहगाव ,पुणे Sant Tukaram Maharaj Gatha Mandir

संत तुकाराम महाराज गाथा मंदिर कसे जाल ?
पुणे ते देहू – ३० किमी
मुंबई ते देहू -मुंबई-पुणे -लोहगाव -देहू रोड-देहू-१३० किमी

गाथा मंदिर येथे जाण्यासाठी सर्वोत्तम कालावधी कोणता? gatha mandir inside
सर्वोत्तम कालावधी :-वर्षभरामध्ये कधीही
वेळ:-सकाळी ६.३० ते १०. ३० आणि संध्याकाळी ५.३० ते ८.३० (शनिवारी रात्री ९ वाजेपर्यंत)

तुमच्या सोयीसाठी गुगल मॅपची लिंक

पार्किंग आणि प्रवेश शुल्क :

प्रवेश शुल्क :- नाही .
पार्किंग शुल्क :- पार्किंग च्या ठिकाणी शुल्क बदलू शकते .
महत्वाचे फोन नंबर:-
पोलीस स्टेशन:-देहू रोड कॅन्ट ,राष्ट्रीय महामार्ग ४,पिंपरी चिंचवड ,पुणे ,महाराष्ट्र ४१२३०३
सर्च ग्रुप आणि रेस्क्यू ग्रुप:-महाराष्ट्र माउंटनिअरिंग रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर . ७६२०२३०२३१

देहू येथे संत तुकाराम महाराज गाथा मंदिर कुठे राहावे आणि कुठे खावे ? Sant Tukaram Maharaj Gatha Mandir
या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचे हॉटेल आहेत . जे राहण्याची सुविधा पुरवितात आणि चांगल्या प्रकारचे जेवणही .

Sant Tukaram Maharaj Gatha Mandir

देहू येथे काय पाहावे आणि काय करावे ?

gatha mandir inside संत तुकाराम यांचे देहू हे मूळ गाव आहे. तसेच ते महाराष्ट्र मधील महत्वाचे संत आहेत . त्यांचा धाकटा मुलगा नारायणबाबा यांनी इंद्रायणी नदीच्या देऊळघाटावर १७२३ मध्ये तुकाराम महाराजांचे मंदिर उभारले.या घाटावर श्री गणेश,श्री विठोबा ,श्री राम ,श्री हनुमान,श्री गरुड यांची मंदिरे तसेच अश्वस्थ वृक्ष आहेत. मंदिराच्या भिंतीवर अनेक अभंग आणि गाथा कोरलेल्या आहेत. तिथे गेल्यावर किमान ३ तरी अभंग किंवा गाथा वाचाव्यात असे मानले जाते.मंदिराच्या आतमध्ये विविध देवतांच्या मूर्ती आहेत . संत तुकाराम यांची भव्य मूर्ती तेथील प्रमुख आकर्षण आहे. मंदिराच्या पाठीमागून इंद्रायणी नदी वाहते. संत तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या गाथा त्यांच्या विरोधकांनी या नदीमध्ये बुडवल्या .त्यानंतर संत तुकाराम तिथेच एका शिळेवर उपोषणाला बसले . त्यानंतर त्यांनी सलग १३ दिवस भगवान श्री पांडुरंगाचा धावा केला.भगवंतांनी त्यांच्या या प्रार्थनेला उत्तर दिले. आणि नदीत बुडूनही संत तुकाराम यांच्या गाथा कोरड्या स्वरूपात त्यांना सुपूर्त केल्या.Sant Tukaram Maharaj Gatha Mandir

संत तुकाराम महाराजांच्या पत्नीच्या स्मारकाच्या वृंदावनाच्या शेजारी मंदिरात ठेवलेली ही शिळा आपण पाहू शकतो . तसेच ज्या ठिकाणी त्यांच्या गाथा पाण्यात बुडवण्यात आल्या ते ठिकाणही आपण पाहू शकतो.गोपाळपुरा येथे संत तुकाराम महाराज यांचे स्मारक “समाधी” आपल्याला पाहायला मिळते. असे म्हणतात की ,भगवान श्री विष्णू यांनी पाठवलेल्या पुष्पक विमानाने संत तुकाराम महाराज ज्या दिवशी सदेह वैकुंठात (भगवान श्री विष्णू यांचे निवासस्थान )गेले ,त्या दिवशी दुपारी अश्वथ वृक्ष हलतो .हजारो भाविक या दिवशी देहू येथे जमतात . आषाढ महिन्यात संत तुकाराम महाराज यांची पालखी घेऊन हजारो वारकरी देहू हुन पंढरपूरला जातात . पंढरीची वारी हि जगातील सगळ्यात मोठ्या घट्नेपैकी एक आहे.जेव्हा लाखो भाविक पंढरपूरला आपल्या लाडक्या भगवान श्री विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी जातात.देहू या ठिकाणी एक सुंदर बाग देखील आहे , ती संत तुकाराम यांच्या पत्नी यांना समर्पित केली आहे .Sant Tukaram Maharaj Gatha Mandir

महत्वाची सूचना :-
मोठ्या प्रमाणात गर्दी टाळण्यासाठी सोमवार ते शुक्रवार या दिवशी आणि सकाळी लवकर जाणे हितकारक आहे. Sant Tukaram Maharaj Gatha Mandir

अन्य पर्यंटनस्थळे

आळंदी
भंडारा डोंगर
भामचंद्र डोंगर आणि गुहा
प्रति शिर्डी , सोमाटणे
बिर्ला गणपती मंदिर Sant Tukaram Maharaj Gatha Mandir

शेती नावावर करून घेताना – आजची वास्तवता

उन्हाळ्यात स्वतःची काळजी कशी घ्यावी ? तुम्हाला आमच्या या ब्लॉगवर जाऊन नवीन माहिती घ्यायला नक्की आवडेल

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *