Sant Tukaram Maharaj Gatha Mandir

Sant Tukaram Maharaj

संत तुकाराम हे भारतामधील भक्ती चळवळी चे एक प्रमुख वारकरी संत आणि आध्यात्मिक कवी होते. तसेच १७ व्या शतकातील हिंदू कवी आणि महाराष्ट्र, (भारत) मधील भक्ती चळवळीचे संत होते. संत तुकाराम महाराज हे त्यांच्या भक्तीमय अभंगांसाठी आणि मधुर अश्या कीर्तनासाठी समाजाभिमुख उपासना म्हणून परिचित आहेत. त्यांचे अभंग हे विठोबाला समर्पित होते.तसेच संत तुकोबा (sant tukaram maharaj information in marathi) हे एक महान समाजसुधारक आणि तत्त्वचिंतक कवी होते.

संत तुकाराम महाराज यांचा जन्म १५९८ किंवा १६०८ मध्ये महाराष्ट्रातील पुण्याजवळील देहू गावात झाला. तुकाराम बोल्होबा आंबिले हे त्यांचे खरे नाव आहे.परंतु त्यांना महाराष्ट्रामध्ये संत तुकाराम म्हणून ओळखले जाते. आणि दक्षिण भारतात भक्त तुकाराम म्हणून ओळखले जाते.तुकाराम यांचे मूळ कूळ मोरे घराणे. आडनाव आंबिले असे होते. ते मराठा कुणबी असून त्यांचा वाण्याचा व्यवसाय होता. त्यांच्या पित्याचे नाव बोल्होबा व आईचे नाव कनकाई असे होते .त्यांचे आई आणि वडील हे विठोबाचे भक्त होते. तुकोबांच्या अगोदर आठ पिढ्यांपासून विठ्ठलाची उपासना त्यांच्या घरात परंपरेने चालत आली होती. विश्वंभरबुवा हे मोरे घराण्याचे मूळ पुरुष महान विठ्ठलभक्त होते.पंढरीच्या पांडुरंगावर बोल्होबाची परमभक्ती होती. त्यांचे वडील संपन्न असे सावकार होते आणि त्यांच्याकडे महाजनकीही होती.Sant Tukaram essay in marathi

तुकोबा यांचे बालपण अगदी सुखात गेले. घरात नित्य भजन, हरिकथा,कीर्तन चालूच असायचे. या सगळ्यांचे संस्कार तुकोबावर होत होते. दारात तुळशीचे वृंदावन, देवघरात विठ्ठलाची मूर्ती,
पूजन ,नित्य भजन आणि नित्यनियमाने वडिलांची पंढरीची वारी चालू असायची. अशा घरात तुकोबा मोठे होऊ लागले. या सर्व गोष्टींचे संस्कार त्यांच्या बालमनावर अगदी खोलवर रुजले. लहानपणापासूनच गीता,भागवताचे श्रवण घडल्यामुळे या ग्रंथांचा तुकोबांच्या बालमनावर परिणाम झाला.Sant Tukaram essay in marathi

तुकारामांच्या आयुष्यातील कठीण काळ :-

तुकाराम किशोरवयात असतानाच त्यांच्या आई आणि वडील यांचे निधन झाले. संत तुकाराम यांची पहिली पत्नी रखमाबाई होती, त्यांना संतू नावाचा मुलगा झाला. त्यांच्या पत्नीला दम्याचा विकार असल्यामुळे त्यांच्या वडिलांनी पुण्याचे आप्पाजी गुळवे (सावकार) यांच्या आवडी नावाच्या मुलीशी तुकोबा यांच्या दुसरा विवाह लावून दिला. त्यांचा मुलगा आणि पहिली पत्नी दोघेही १६३०-१६३२ च्या दुष्काळात मरण पावले. या स्थितीमुळे त्यांचा जनातील मान गेला.यामुळे त्यांच्या मनात वैराग्य निर्माण झाले आणि संसारातून त्यांचे मन उडाले.Sant Tukaram essay in marathi

घरादारावर दुःखाची छाया पसरली. “जग हे दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचे नाही कोणी” असा तुकोबा यांना अनुभव आला. अशा अनुभवातून ते होरपळून निघाले. आणि एका निश्चित विचाराने ईश्वराकडे ओढले गेले.विठ्ठलाशिवाय आपले दुसरे कोणीही नाही, हा विश्वास त्यांच्या मनात निर्माण झाला. ते सगळा वेळ ईश्वरचिंतनात घालवू लागले. ते विठ्ठलाला शरण गेले. या सगळ्या बिकट परिस्थितीकडे ते मोठ्या निःसंग व अलिप्तपणे पाहू लागले.त्यांच्या जीवनात ज्या वाईट घटना घडल्या, त्या कशा त्यांच्या फायद्याच्या झाल्या हे त्यांच्या खाली दिलेल्या अभंगावरून समजते.sant tukaram information in marathi

बरे झाले देवा निघाले दिवाळे । बरी या दुकाळे हिड केली।।
अनुतापे तुझे राहिले चिंतन । जात हा वमन संसारा ।।
बरे झाले देवा बाईल कर्कशा । बरी हे दुर्दशा जनामध्ये ||
बरे झाले जगी पावलो अपमान | बरें गेले धन ढोरे गुरे ।।Sant Tukaram Maharaj

काही दिवसांनी दुष्काळाचे सावट संपले. जनजीवन पुन्हा स्थिरही झाले. अशा परिस्थितीत तुकोबा कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकले असते. पण परत संसारात त्यांचे मन काही रमले नाही.
त्यांच्या मनात वैराग्य असल्यामुळे तुकाराम महाराज ईश्वर भक्तीतच रमले ते शेवटपर्यंत “भेटीलागी जीवा लागलीसे आस, कन्यासासुरासी जाये, विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, आनंदाचे डोही आनंद तरंग” तुकारामांचे संपूर्ण जीवन अशा कितीतरी अभंगांतून विठ्ठलमय झाल्याचे दिसते.नंतरची बरीच वर्षे त्यांनी भक्ती उपासना, सामुदायिक कीर्तन आणि अभंग रचण्यात घालविली.Sant Tukaram Maharaj

संत तुकाराम यांचे आध्यात्मिक जीवन :

ज्ञान-भक्ती-वैराग्याने परिपक्व असलेल्या तुकाराम महाराजांकडे कुठेही अहंकाराचा लवलेश नव्हता. ते नम्रतेने म्हणतात, “वेदांचा तो अर्थ आम्हांसीच ठावा “. अध्यात्म हे आंतरिक दु:खापासून मुक्ती मिळण्याचा एकमेव मार्ग आहे हे ते जाणत होते.त्यांचे मनही एकांत वासात रमू लागले. गावापासून दूर असलेल्या देहूच्या परिसरात भंडारा डोंगरावर जाऊन मनन,वाचन, चिंतनात ते रमू लागले.संत तुकाराम हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांना कोणत्याही गोष्टींचा मोह नव्हता . एकदा शिवरायांची आणि तुकोबांची भेट झाली. त्यांनी तुकोबांसाठी घोडे, कपडे ,छत्री,
व मुलांना इतर भेटवस्तू पाठविल्या. तुकारामांनी ते सर्व आल्या पावलीच परत पाठवले. तुकारामांनी गीता, ज्ञानेश्वरी, भागवत, एकनाथी भागवत व इतर ग्रंथांचे वाचन केले.तसेच पंढरीच्या विठ्ठलाचे अखंड नामस्मरण ते करू लागले. ते एका अभंगात म्हणतात-sant tukaram mahiti

“अवघाचि संसार केला ब्रह्मरूप । विठ्ठल स्वरूप म्हणोनियां ।।”

तुकोबा आपल्या एका अभंगातून माणसाला उद्देशून म्हणतात:sant tukaram mahiti

चाल केलासी मोकळा || बोल विठ्ठल वेळोवेळा ||
तुजं पाप चि नाही ऐसे || नाम घेतां जवळी वसे ||

याचा अर्थ तुकोबा सांगतात की, तू परमेश्वराचे नमस्मरण कर. जेव्हा परमेश्वराचे नामस्मरण करशील, त्यावेळेला कोणतेही पाप तुमच्या ठिकाणी उरणार नाही. पाप कसं नाहीसं होईल याची काळजी तू करू नको.कारण हरिनामापुढे कोणतेही पाप टिकणारंच नाही. ते आपोआपच नष्ट होईल. परमेश्वर आपल्या बरोबर असेल तर आपल्या हातून कुठलेही पापकर्म तो घडू देणार नाही .sant tukaram mahiti

Sant Tukaram Maharaj

संत तुकाराम यांचे सामाजिक कार्य :-

संत तुकारामांचे सामाजिक कार्य सर्वसामान्य लोकांची वैचारिकता बदलून नैतिक अधोगती थांबविणे . जनजागृती सारखे महान कार्य तुकाराम महाराजांनी केले.संत तुकाराम यांनी मानवी मूल्य जपत शांतपणे ,नम्रतेने जनसेवा केली. त्यांनी लोकांना फक्त उपदेश दिला नाही तर, तो त्यांनी स्वतःही अंगीकारला आणि इतरांनाही तो सांगितला.समाजकंटकांनी त्यांना खूप त्रास दिला तरीही त्यांच्याविषयी कोणताही कटूपणा न ठेवता उलट ते म्हणाले,“कोणाही जीवाचा न घडो मत्सर” प्रेम,अहिंसा,करुणा याची शिकवण त्यांनी सदैव दिली.Sant Tukaram Maharaj

भंडारा डोंगरावर लाभलेल्या एकांत अश्या ठिकाणी अंतर्मुख होऊन ते विचार करू लागले, तेव्हा त्यांनी जाणलं की , माणसाच्या जीवनात निसर्गाचं स्थान किती महत्त्वाचं आहे. जर आपण झाडं लावले नाहीत तर पाऊस पडणार नाही.आणि जर पाऊस पडला नाही तर दुष्काळाचे सावट कायमच पुढील पिढ्यांनाही भोगावे लागेल. या सर्व विचारातून त्यांनी सुंदर अशी अभंगरचना केली…sant tukaram maharaj information in marathi

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ।
पक्षीही सुस्वरे आळविती ।
येणे सुखे रुचे एकांताचा वास |
नाही गुणदोष अंगा येत ।।

तुकाराम महाराजांनी अनेक अभंग रचले, त्यापैकी काही सुपरिचित असे अभंग.

1)सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवुनिया ।।
2)सदा माझे डोळां जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोययिा ।।
3)राजस सुकुमार मदनाचा पुतळा | रविशशिकळा लोपलिया ।।

१६३२ ते १८५० दरम्यान रचली गेलेली तुकाराम गाथा. हे त्यांच्या मराठी कृतींचे एक संकलन आहे. त्याला अभंग गाथा असेही म्हटले जाते. भारतीय परंपरेत असे मानले जाते की यात जवळजवळ ४५०० अभंगांचा समावेश आहे.प्रवृत्तीच्या संघर्षाविषयी – कुटुंब, व्यवसाय ,जीवन आणि निवृत्तीची आवड असणे . त्याग करण्याची इच्छा, वैयक्तिक मुक्तीसाठी सर्व काही मागे ठेवा, मोक्ष या आणि अशा अनेक विषयावरील अभंगांचा त्यात समावेश आहे.sant tukaram mahiti

तुकाराम महाराजांचे निधन :

असे अलौकिक व्यक्तिमत्त्व असलेल्या तुकाराम महाराजांविषयी बोलावे , सांगावे तेवढे थोडेच. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या प्रकारे महाराष्ट्रात भागवत धर्माच्या देवालयाचा पाया रचला, त्यावर संत तुकाराम यांनी कळस चढविला. त्यांची गाथा वाचता वाचता आपल्या देहात प्रकाश पडतो हे मात्र तितकेच खरे.मायबाप स्वतः न्यायला येणार असे त्यांना मनोमन वाटू लागले. वैकुंठच्या सनकादिकांनी श्रीहरीचा निरोप आणला. संत तुकाराम वयाच्या अवघ्या बेचाळिसाव्या(४२) वर्षी ९मार्च १६५० रोजी हे जग सोडून गेले.sant tukaram maharaj information in marathi

देहू येथील संत तुकाराम महाराज मंदिर कसे जाल ?
देहू कुठे आहे?
जिल्हा : पुणे
जवळचे मोठे शहर :पुणे
रेल्वे स्टेशन:शिवाजी नगर , पुणे
जवळचे विमानतळ:पुणे

देहू येथे कसे जाल?
पुणे ते देहू : ३० किमी
मुंबई ते देहू : मुंबई-पुणे-लोणावळा -देहू रोड -देहू -१३० किमी

शेती नावावर करून घेताना – आजची वास्तवता

उन्हाळ्यात स्वतःची काळजी कशी घ्यावी ? तुम्हाला आमच्या या ब्लॉगवर जाऊन नवीन माहिती घ्यायला नक्की आवडेल

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

As you found this post useful...

Follow us on social media!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
2 × 3 =