Shaletil Maitri Kavita

तुझी माझी मैत्री By कुमार. Pandharinath Varpe| Best Shaletil Maitri Kavita 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी कुमार.Pandharinath Varpe यांची -तुझी माझी मैत्री – हि कविता -Shaletil Maitri Kavita- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे

तुझी माझी मैत्री By कुमार.Pandharinath Varpe| Best Shaletil Maitri Kavita 2023

तुझी माझी मैत्री | Shaletil Maitri Kavita

Best Shaletil Maitri Kavita 2023

आज पुन्हा एकदा नव्याने
मनातं विचारांची गर्दी झाली,
काव्यबंधाच्या मैत्री या विषयांतून
तूझ्या माझ्या मैत्रीच्या आठवणींना वर्दी मिळाली.

तुझी माझी मैत्री जणू
पवासोबत वाहणारा मंद मंद वारा,
आठवणींच्या निखळ दरीतून कोसळणारा
जणू गोड आठवणींचा कडू अश्रूधारा.
आज तुझी सोबत नसली तरी
अंगणी तुझ्या आठवणींची तुळस आहे,
तुझ्या फोटोतील हारासोबत दळवळणारी अगरबत्ती
आज ही तितकाच सुगंध देत आहे….

खिशात नसतील कधी पैसे माझ्या
तू तुझी पर्स रिकामी करायची,
मुलगी असली तरी मोठ्या भावाप्रमाणे
खांद्यावर हात ठेऊन कायम साथ द्यायची.
आज खूप आठवण येते गं तूझी
जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुलाच शोधत राहतो,
हजारो आपुलकीची मित्र मैत्रिणी इथं
पण डोळ्यासमोर सतत तुझाच चेहरा असतो…

आज तुझ्या माझ्या मैत्रीविषयी लिहताना
शब्द देखील अपुरे पडतात.
डोळ्यात आठवणींच्या शब्दांचे थेंब साचून
मनामध्ये एकटेपणाच्या कवितेचे तळे साचवतात.
काय लिहू अन कुठून लिहू
सतत तुझाच चेहरा डोळ्यासमोर दिसतो.
मनातं रंगवलेले आठवणींचे चित्र फक्त
उघड्या् डोळ्याने मग मात्र पाहत राहतो..

का? गेलीस अशी अर्ध्यावरचं
तुझ्या माझ्या मैत्रीची गाठ सोडून,
शरीराने धडधाकट दिसणाऱ्या माझ्या मनाचे
अगदी सहजच हातपाय तोडून.
तुझ्याशिवाय मन रमत नाही गं इथं
दरवेळी तुझीच आठवण सतावते,
तुझ्या माझ्या मैत्रीच्या आठवनींच्या विश्वात
मला मात्र घेऊन जाते….

येशील का गं परत माझ्या् मोडक्या हातावर
तुझ्या माझ्या मैत्रीचा friendship band बांधायला,
तुझ्या आठवणीत रोज अर्धमेल्या या जीवाला
आपल्या मैत्रीची संजीवनी द्यायला.
या ओठांना या मनाला
छळतो तुझ्या आठवणीचा विरह,
ये ना पुन्हा परत माझ्यासाठी
आपण पुन्हा फुलवू तुझ्या माझ्या मैत्रीचा बहर..
तुझ्या माझ्या मैत्रीचा न तुटणारा बहर…….

तू निघून गेलीस पण मी अजूनही
मैत्री कि प्रेम या जाळ्यात अडकून पडलोय.
विचारायचं धाडस कधी केलंच नाही
मला वाटतं त्याचंच भोग मी आजवर भोगतोय.
प्रेम असो वा मैत्री तुझ्यासोबत असताना
तुझ्या न माझ्या वेगळयाच दुनियेत असायचो,
कधी देवाच्या ही पाया पडलो नाही
मी सतत तुलाच माझा देव मानायचो…..

तू परत येशील कि नाही माहित नाही
पण प्रत्येक वेळी देवाकडे फक्त तुलाच मागतो,
तुझ्या माझ्या् मैत्रीची शप्पत अजूनही
मी फक्त फक्त आणि तुझ्यावरच प्रेम करतो.
तुझ्या माझ्या मैत्रीच्या आठवणीवर जगत राहतो.
तुझ्या माझ्या मैत्रीच्या आठवणीवर जगत राहतो.

तुझी माझी मैत्री By कुमार.Pandharinath Varpe| Best Shaletil Maitri Kavita 2023

तुझी माझी मैत्री By कुमार.Pandharinath Varpe| Best Shaletil Maitri Kavita 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

तुझी माझी मैत्री By कुमार.Pandharinath Varpe| Best Shaletil Maitri Kavita 2023

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
24 ⁄ 4 =