Sharad Pawar Essay in Marathi

शरद पवार साहेबांचा जीवन परिचय | Sharad Pawar Essay in Marathi 2023 Great Personality


वयाच्या 38 व्या वर्षी मुख्यमंत्री पदाची शप्पथ घेणारे सर्वात तरुण मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे Sharad Pawar Essay in Marathi वाचताना नक्कीच आश्चर्य होईल.

आजच्या Article मध्ये तुम्हाला शरद पवारांचं जीवन परिचय, त्यांचं शिक्षण तसेच त्यांची राजकीय कारकीर्द बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत. त्यांना राजकारणातील चाणक्य का म्हणतात या बद्दल जाणून घ्या.

Sharad Pawar Essay in Marathi 2023

राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यांचं पूर्ण नाव शरद गोविंदराव पवार असे आहे. त्यांचा जन्म 12 December 1940 ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला. त्याचे वडील श्री गोविंदराव पवार हे बारामती येथील शेतकरी संघांमध्ये नोकरीला होते. तसेच त्यांची आई शारदाबाई पवार ह्या बारामती पासून 10 km अंतरावर असलेल्या काटेवाडी येथील कुटुंबाची शेती पाहत होते. तसेच शारदाबाई या पुणे जिल्ह्या लोकल बोर्डाच्या शिक्षण समिती प्रमुख होत्या. शरद पवारांना 9 भावंडे आहेत. शरद पवार यांचा लग्न प्रतिभा शिंदे यांच्याशी झाला आणि त्यांना एक मुलगी झाली. त्यांचं नाव सुप्रिया शुळे आहे आणि ते खासदार आहेत. यासोबतच अजित पवार हे त्यांचे पुतणे आहेत.

याशिवाय त्यांचे धाकटे बंधू प्रतापराव पवार सकाळ हे मराठी दैनिक चालवतात. त्यांनी आपलं प्रारंभिक शिक्षण बारामती येथील सरकारी शाळेमध्येच घेतले. त्यांनतर त्यांनी पुणे विद्यापीठातील बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांचे छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तीन आदर्श आहेत.

शरद पवार माहिती यांची राजकीय कारकीर्द

शरद पवार साहेबांचा जीवन परिचय | Sharad Pawar Essay in Marathi 2023 Great Personality

सन 1956 साली ते शाळेत असतांना गोवा मुक्ती सत्याग्रहाला पाठींबा देण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला. त्यांनतर त्यांनी कॉमर्स कॉलेज मध्ये विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवून ते सरचिटणीस बनले आणि नंतर त्यांनी युवा काँग्रेस मध्ये प्रवेश घेतला. तिथे त्यांची भेट यशवंतराव चव्हाण यांच्याशी झाली. यशवंतराव चव्हाण यांनी त्यांची क्षमता बघून त्यांना प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य बनविले. त्यांच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यक्रमातील यशवंत राव यांच्या भाषणातून शरद पवार फार प्रभावित झाले आणि त्यामुळेच त्यांनी यशवंतराव यांना आपले राजकारणातील गुरू मानले.

सन 1966 साली त्यांना युनेस्को शिष्यवृत्ती मिळाली आणि त्यांना पश्चिम जर्मनी, इटली, फ्रांस आणि इंग्लंड या देशांना भेट दिली त्याअंतर्गत त्यांनी तेथील राजकारण आणि पक्षांचा संपूर्ण अभ्यास केला. तिथून परत आल्यानंतर प्रथमच पवारांनी सन 1967 साली बारामती मतदारसंघातून विधानसभा निवडणुक लढवली आणि त्यात ते विजयी झाले.

_________________________

वाचा Saina Nehwal Information In Marathi

वाचा आपल्या भारतीय सणाबद्दल निबंध :- Essay on Our Festivals 2023

_________________________

श्री वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी वयाच्या 28 व्या वर्षी राज्यमंत्री म्हणून शप्पथ घेतली. यशवंतराव चव्हाण यांच्यासोबतच वसंतराव नाईक हे देखील पवारांचे मार्गदर्शक होते. परंतु 1978 च्या निवडणुकीत वसंतराव नाईक मुख्यमंत्री असतांना त्यांनी काँग्रेस चे 12 आमदार फोडले आणि 18 जुलै 1978 साली त्यांनी प्रथमच मुख्यमंत्री पदी शपथ घेतली. पवारांनी फोडलेले 12 आमदार हे काँग्रेस (स) पक्ष म्हणून ओळखले जाऊ लागले आणि त्यांच्या सोबत असलेले जनता पक्ष आणि काँग्रेस (स) पक्ष हे “पुरोगामी लोकशाही” म्हणून ओळखले जाऊ लागले.

Sharad Pawar Essay in Marathi 2023

सन 1987 साली शरद पवारांनी परत काँग्रेस(इंदिरा) यांच्या पक्षात प्रवेश केला. त्यानंतर 1988 साली भारताचे पंतप्रधान आणि काँग्रेस(इंदिरा) पक्षाचे अध्यक्ष राजीव गांधी यांनी तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना केंद्रीय अर्थमंत्री करून त्यांच्या जागी शरद पवारांची निवड केली. आणि 26 जून 1988 साली शरद पवारांनी दुसऱ्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

त्यावेळी काँग्रेस पक्षापुढे मोठे आव्हान न्हवते मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष चालू करून भाजप शी युती केली. आणि राज्यभर प्रचार करून काँग्रेस ला प्रथमच आपले बहुमत गमवावे लागले. तरी देखील शरद पवारांनी 12 अपक्ष उमेदवारांचा पाठिंबा घेऊन 4 मार्च 1990 साली तिसऱ्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. काही मंत्र्यांनी शरद पवारांना मुख्यमंत्री पदावरून हटविण्याची मागणी राजीव गांधी यांच्याकडे केली मात्र राजीव गांधींनी नकार दिला.

Sharad Pawar Essay in Marathi 2023

त्यानंतर राजीव गांधी यांची हत्या झाली त्यावेळी पंतप्रधान म्हणू शरद पवारांचं देखील नाव समोर होतं मात्र काँग्रेस संसदीय पक्षाने नरसिंह राव यांना पंतप्रधान म्हणून निवडून दिले. 26 जून 1991 रोजी पवारांना त्यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून शपथ घेतली. आणि त्यांच्या जागी मुख्यमंत्री पदासाठी सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री बनविले मात्र अंतर्गत मतभेद मुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला तेव्हा त्यांच्या जागी परत शरद पवारांना मुख्यमंत्री बनविले गेले. आणि 6 मार्च इ.स. 1993 साली राज्याचे मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा शपथ घेतली.

12 वी लोकसभा निवडणुकी बरखास्त झाल्यानंतर 13 व्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान पदी इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींना पंतप्रधानपद देण्यापेक्षा भारतात जन्मलेल्या व्यक्तीला पंतप्रधान करावे अशी मागणी पी.ए.संगमा आणि तारिक अन्वर यांच्या साथीने शरद पवारांनी केली. त्यामुळे त्या तिघांना काँग्रेस पक्षातून 6 वर्षासाठी काढून घेतले. त्यानंतर त्यांनी 10 जून 1999 साली आपला नवा पक्ष तयार केला आणि त्यांचे नाव “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष” असे ठेवले.

सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी पक्षाला ५२ जागा मिळाल्या. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे मिळून महाआघाडीचे सरकार महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यात शरद पवार यांचा मोलाचा सहभाग होता.

Sharad Pawar Essay in Marathi 2023

Sharad Pawar Mahiti शिक्षण क्षेत्रातील योगदान

शरद पवारांनी शिक्षण क्षेत्रात देखील मोलाची कामगिरी निभावलेली आहे. त्यांनी अनेक शिक्षण संस्थांसाठी काम केले आहे ते खालील प्रमाणे:-
1. विद्या प्रतिष्ठान, बारामती
2. कृषी विकास प्रतिष्ठान, बारामती
3. रयत शिक्षण संस्था, सातारा
4. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, मांजरी, पुणे
5.शिवनगर विद्या प्रसारक मंडळ, माळेगाव, बारामती

Sharad Pawar Essay in Marathi 2023

Sharad Pawar यांना मिळालेला पुरस्कार In Hindi

शरद पवार यांना सन 2007 मध्ये ”पद्मविभूषण” हे पुरस्कार प्राप्त झालेले आहे.

चरित्रे आणि आत्मचरित्र On Sharad Pawar In Hindi

1. साहेब (शरद पवार चरित्रग्रंथ), लेखक व संपादक – सोपान गाडे
2. लोकनेते शरदराव पवार (लेखक – राम कांडगे)
3. Sharad Pawar – A Mass Leader (लेखक – दीपक बोरगावे)
4. शरद पवार यांचे ’लोक माझे सांगाती’ नावाचे मराठी आत्मचरित्र आहे.

Sharad Pawar Essay in Marathi 2023

2 thoughts on “शरद पवार साहेबांचा जीवन परिचय | Sharad Pawar Essay in Marathi 2023 Great Personality”

  1. Pingback: भारताची सुपुत्री साईना नेहवाल | Saina Nehwal Information In Marathi 2023 Best Article

  2. Pingback: लाल बहादूर शास्त्री यांवर संपूर्ण माहिती 2023 | Best Lal Bahadur Shastri Information In Marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
21 + 26 =