शेअर मार्केट मध्ये खात्रीशीर पैसा कमावणे हे आपल्याच हातात आहे. Share market in Marathi मधून आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत अनेक सिक्रेट टिप्स.
Shares खरेदी करण्याची प्रक्रिया काय आहे?
मार्च २०२० पासून चालू असलेल्या कोरोना लॉकडाऊन आणि नंतर च्या अनलॉक कालावधीत माझे अनेक मित्र मला हेच विचारत आहेत. “shares मध्ये इन्वेस्टमेण्ट करायचीय पण कशी करू ते माहित नाही”. सगळ्यांची एकच अडचण.

मी त्यांना विचारले की त्यांना स्टॉक मार्केटमध्ये प्रवेश का करायचा.
प्रत्येकाचे सारखे होते उत्तर …
“पैसे कमविणे.”
मी त्यांना विचारले की त्यांना शेअर बाजाराबद्दल तुम्ही काही शिकले आहे की नाही?
90% लोकांनी मला सांगितले की काय शिकण्यासारखे आहे … फक्त एक ट्रेडिंग खाते उघडा, एक विशिष्ट हिस्सा (Share) खरेदी करा आणि त्याचे Valuation वाढल्यानंतर विका आणि नफा मिळवा.
Share Market in Marathi : शेअर मार्केट मार्गदर्शन
साधारणत: 95% लोक ज्यांच्याकडे ट्रेडिंग किंवा डिमॅट खाते आहे ते केवळ असा विचार करतात. कोणताही अभ्यास न करता शेअर्स च्या किमतींचा अंदाज लावला जातो. आणि अशी अंदाज चुकलेली माणसं अपेक्षेप्रमाणे नफा न झाल्याने स्वतः लांब तर राहतातच पण दुसऱ्यांना सुद्धा दाखले देत फिरतात. मग प्रश्न उद्भवतो की हेच लोक शेअर्स मार्केटला जुगार म्हणतात ते बरोबर आहे का ?

तो खरोखर एक जुगार आहे की एक कला किंवा संपत्ती निर्मितीचे शास्त्र? डॉक्टर, अभियंता, वकील किंवा व्यावसायिक होण्यासाठी, त्यावर आपल्याला प्रभुत्व मिळविण्यासाठी बरीच वर्षे घालवावी लागतात. परंतु पैशातून पैसे कमावणाऱ्या Share मार्केट मध्ये उडी घेण्यापूर्वी आपण वेळ देऊन अभ्यास करण्यासाठी आणि अनुभव घेण्यासाठी प्रयत्न करण्यास तयार नसतो . जसे आपल्या जेव्हा नोकरी हवी असते तेव्हा आधी आपण कंपनी बद्दल जाणून घेतो, अभ्यास करतो मग Interview ला जातो.
जसे कोणाशीही लग्नकरण्याआधी दोन्ही बाजूचे लोक समोरच्या पक्ष विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. त्याचप्रमाणे, शेअर बाजारातून पैसे कामविण्या आधी, शेअर बाजाराची मुलभूत माहिती समजली पाहिजे.
चला शेअर बाजाराच्या मूलभूत गोष्टी समजून घेऊया. शेअर्स म्हणजे काय, गुंतवणूकीमागील तर्क, व्यापार गुंतवणूकी विरूद्ध शेअर मार्केट, शेअर मार्केटमध्ये वापरलेले वेगवेगळे Jargon आणि शेअर बाजारासह कसे प्रारंभ करावे हे सर्व बघूया पुढील भागात……. शेअर मार्केट विषयी माहिती.
Our Verified Blogs
Small Business Idea in Marathi
LIFE INSURANCE चे १० फायदे जाणून घ्या
Very nice explanation by Amey
Yes.
I m interested to learn about share market.
खूप छान माहिती आहे।
मराठी लोकांनी वरील माहिती वाचली की त्यांचा दृष्टिकोन SHARE मार्केट कडे बघण्याचा बदलेल।
Good one
Pingback: 2000 Note BAN Marathi | नोटा झाल्या बंद ? सरकारने दिली या तारखेपर्यंत नोटा बदलण्यासाठी मुदत
Pingback: शेअर म्हणजे काय? Share Market Marathi Part 2 - Maza Blog
Pingback: घरी बसून पैसे कमवा | Best Share Market Information In Marathi 2023