shetkari baap kavita

शेतकऱ्याची व्यथा आणि बळीराजा | 2 Best shetkari baap kavita

सौ. सुनिता जयदीप पाटील आणि सोमदत्त कुलकर्णी यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत shetkari baap kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

शेतकऱ्याची व्यथा | shetkari baap kavita

काव्यबंध समूह आयोजित,
काव्य लतिका स्पर्धा,
विषय :- शेतकरी
दिनांक :- 31/8/2023
शीर्षक :- शेतकऱ्याची व्यथा

शेतकऱ्याची व्यथा | shetkari baap kavita

पाण्याविना पडल्यात
शेताला खाचा
काळजाच्या माझ्या झाल्या
लाख लाख काचा !!1!!

फुलासारखा फुलवित होतो
कष्टाने मळा
जसा गोठ्यातील वासराला
गाईचा लळा !!2!!

सोसाव्या लागत होत्या
किती मला कळा
तहानलेला पक्षी जसा
समुद्राच्या जळा !!3!!

पाण्यासाठी लागत नव्हता
रात्रं -दिसं डोळा
देह जाग्यावरी मन
करे सळा-सळा !!4!!

माणसांना फक्त तू
दिली आहे वाचा
काय दोष आहे बाकी
मुक्या जीवांचा !!5!!

रोज खाव्या लागतात
रात्रं -दिन ठेचा
पाण्याविना अर्थ नाही
काही जीवनाचा !!6!!

उरला नाही एकही
किनारा आशेचा
प्रश्न आहे आता माझ्या
जीवन मरणाचा !!7!!

देवा तुझी करणी
अन नारळात पाणी
कशी भरून निघणार
माझ्या शेताची हानी !!8!!

मला अधिकार
राब- राब राबण्याचा
अन काही लोकांना
फक्त बघण्याचा !!9!!

पाण्यासाठी चाललाय
खेळ हा जीवाचा
अंत नको पाहू आता
माझ्या या मनाचा !!10!!

प्रश्न आहे आता माझ्या
लाख मोलाच्या शेतीचा
पूर्वजांनी जपलेल्या
हक्काच्या मातीचा !!11!!

पाण्याविना पडल्यात
शेताला खाचा
काळजाच्या माझ्या झाल्या
लाख लाख काचा !!12!!

✍️सौ सुनीता जयदीप पाटील
कल्याण, मुंबई

बळीराजा | 2 Best shetkari baap kavita

काव्यबंध समूह
काव्य लतिका
प्रत्येक गुरुवारी होणाऱ्या स्पर्धेसाठी
विषय: शेतकरी

शीर्षक: बळीराजा

बळीराजा | 2 Best shetkari baap kavita

प्रतिक्षा पावसाची करितो
बळीराजा आज हताश आहे
बरसेल कधी वरूणराजा
व्याकुळ नजरेने वाट पाहे १

पेरणी मी कशी करू देवा
पाऊस काही पडत नाही
रान सगळे ओसाड झाले
देवराजा आता तुच पाही २

झोपडीत अन्नाचा कण नाही
अस्तुरी माझी आहे उपाशी
सावकार सारे झाले गब्बर
खाती एक एक घास तुपाशी ३

देवा बरसू दे पाऊस धारा
तवा पिकतील शेतातून मोती
घर दार माझं मग सुखी होईल
चमकतील नयनांच्या ज्योती ४

जादा काहीच नको मजला
नको कोपूस वरूण देवा
असावा बळीराजा सुखात
देई त्यास आनंदाचा ठेवा ५

बघ आयुष्य संपलं माझं राबताना
आता डोळे वर लावून बसलो
आस मजला देवा आहे कृपेची
पडता पाऊस मनात हरखलो ६

जादा काही देवा मागण नाही
मेघराजाची किरपा व्हावी
पिकं डोलावी वावरामंदी
एवढीच दया देवा करावी ७

©®सोमदत्त कुलकर्णी
कोल्हापूर

बळीराजा | shetkari baap kavita

shetkari baap kavita

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *