ज्ञानदेव लक्ष्मणराव डिघुळे आणि गजानन दशरथ पोटे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत shetkari jagacha poshinda kavita in marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
नाळ | shetkari jagacha poshinda kavita in marathi
काव्यलतिका
विषय~शेतकरी
शीर्षक~नाळं

करी शिवार तयार बीज मातीत पेरतो ।
खता बियाणं पोट काळ्या आईचं भरतो ॥
देतो झोकुन मातीत होतं नव्हतं ते सारं ।
नाही शिवत मनाला नफ्या तोट्याचा विचार ॥
रोज शेतात राबतो उभा घामानं नहातो ।
नित हिरव सपान शेतीमातीत पाहतो ॥
येत आभाळ भरून अशी धरणीची माया ।
पुरवाया तिची आस घन लागे बरसाया ॥
बीज रुजता रुजता कोंब येई टरारून ।
रान ओसाड ओसाड जाई पिकानं भरून ॥
मग श्रावण मासात पाठशिवणीचा खेळ ।
कधी सरीवर सरी कधी नुसतं आभाळ ॥
त्याच्या पाठशिवणीनं जीव होई कासावीस ।
नाही उतरत गळी मुखी भरलेला घास ॥
रान सुकलं सुकलं रोज पाही निरखुन ।
घाव दैवानं घातला कधी येईना भरून ॥
जरी झाला बरबाद दुःख आतच दाबतो ।
नव्या उभारीन पुन्हा शेती कामाला लागतो ॥
पुन्हा फुला याशिवाय करी नवीन जुगाड ।
जुन्या मुद्दल व्याजाला नव्या कर्जाची जोड ॥
असं अतूट बंधन त्याची शेतीशी रं नाळ ।
नाही तुटता तुटत जरी पडला दुष्काळ
॥
………………………………………..
ज्ञानदेव लक्ष्मणराव डिघुळे.
भालगांव . छत्रपती संभाजीनगर .
पोशिंदा | shetkari kavita in marathi
काव्यलतिका
विषय -शेतकरी
||पोशिंदा ||

या सृष्टीचा पोशिंदा हा बळीराजा
या धरणीचा लेक तो साजरा
या धरतीचा असे तो खरा राजा
तोच पोसतो आहे हा संसार सारा
घामाचे मोती पडतात शेतात
काळ्या मातीतून मोती उगतात
हिरव्या रानात पक्षी गातात
शेतकरी वाढवीतो पीक आनंदात
सखा नंदी त्याचा राबतो संगे त्याच्या
जीव शेतकऱ्याचा यांच्यात फार
संगतीला असे सर्जा संगे राजा
माया करतो तो त्यांच्यावर अपार
उगवतो तो प्राण्यांसाठी गवत
किडे जगतात खाऊन पान
पाखरे दाणे खाऊन जगतात
हा पोशांदा आहे जगात महान
दुष्काळाचा मार कित्येकदा करतो सहन
धान्याला त्याच्या भाव मिळतो दमडीमोल
पोशिंदा हा कधी कधी उपाशी असतो
त्याच्या जगण्याची असते कमाल
बळीराजाचा बळी का जातो
हा सृष्टीचा पोशिंदा का मरतो
सर्वांना हव ते तो देतो
हा पोशिंदा नशिबापुढे हार मानतो
अस्मानी आणि सुलतानी संकट
शेतकऱ्यांवर करतात वार
दुष्काळात लागते त्याची वाट
शेतकऱ्यांसाठी असायला हवं हक्काच सरकार
गजानन दशरथ पोटे
अकोला

shetkari jagacha poshinda kavita in marathi
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह