shetkari jagacha poshinda kavita

शेतकरी माझा बाप आणि शेतकरी व्यथा | 2 Best shetkari jagacha poshinda kavita

सौ. रोहिणी अमोल पराडकर आणि सौ. शुभांगी सुभाष धुमाळ यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत shetkari jagacha poshinda kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

शेतकरी माझा बाप | shetkari jagacha poshinda kavita

काव्यबंध समूह
काव्यलतिका
प्रत्येक गुरुवारी होणारी स्पर्धा
स्पर्धेसाठी ……
दिनांक:- ३१/०८/२०२३
विषय :- शेतकरी
शिर्षक शेतकरी माझा बाप

शेतकरी माझा बाप | shetkari jagacha poshinda kavita

बाप माझा आहे शेतकरी
शिवारात कष्टकरी दिनरात
लाखोंचा पोशिंदा बळीराजा
राबतो शेतात अहोरात

फुलवून शेतमळा पिकांचा
आयुष्याच्या वळणावरी
स्वतः उपाशीपोटी झोपतो
दुःखाच्या चळणावरी

अनवाणी तुडवतो वाट
पायात नाही वहाण
बी बियाणांसाठी ठेवतो
तुकडा जमीन गहाण

नसे जरी खायला अन्न
तरी जमनीत बी पेरतो
नांगरणी बाप शेतात
सर्जा राजा संग करतो

करी लहरी निसर्ग राजा
आणून कधी वादळ
कधी सुखी बंजर जमीन
कधी ओला दुष्काळ

पहा कशी संकटे आली
पिके आलीत बहरून शेतात
कसा मिळेल बाजारभाव
चिंतातूर झाला विचारात

शेतकरी राजा राबला
शेतात भविष्यासाठी दिनरात
लाखांचा पोशिंदा बसला
घेऊनी दुःख पदरात

राबराब राबतो बळीराजा
खाई चटणी भाकरीचा घास
कंटाळून दारिद्र्याला लावून
झाडावर घेतो गळफास

सौ. रोहिणी अमोल पराडकर
कोल्हापूर

शेतकरी व्यथा | shetkari jagacha poshinda kavita

काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतिका स्पर्धा
स्पर्धेसाठी
दिनांक:- ३१/०८/२०२३
विषय :- शेतकरी
शीर्षक – शेतकरी व्यथा

शेतकरी व्यथा | shetkari jagacha poshinda kavita

गरीब शेतकरी बिचारा
जीवाचं रान करतो
लेकरांना मोठं करतो
दुःख त्याला विचारा…..!

रात्रंदिवस कष्ट करतो
शेतातून धान्य पीकवतो
पै – पै जमवतो
संसाराला जगवतो……!

राब- राब राबतो
थकला भागला तर विसावतो
पोटाची खळगी भरण्यासाठी
परत बैलांना जुंपतो….!

अवकाळी आला पाऊस
दुष्काळ पडला तरी
कधीही डगमगत नाही
असा थोर माझा शेतकरी….!

साऱ्या जगाचा पोशिंदा
आपण म्हणतो सारे त्याला
चिकाटी आणि जिद्द
कायम शिकवून जातो आपल्याला….!

सायंकाळी सूर्य मावळतो
जीव थकून भागून जातो
घराकडे परततो
कोरभर भाकरी खाऊन झोपी जातो….!

वर्षा मागून वर्ष सरते
संसाराचा गाडा ओढता काय शिल्लक उरते
थकला तरीही काही जाणवू देत नाही
कष्ट त्या बिचाऱ्याचे आयुष्यभर संपत नाही…..!

मनापासून नमन
अशा थोर बळीराजाला
जगाला पोसणाऱ्या
महान शेतकरी राजाला….!

प्रा. सौ. शुभांगी सुभाष धुमाळ -रानवडे
मु. पो.उरुळी कांचन,ता. हवेली, जि. पुणे.

शेतकरी | shetkari jagacha poshinda kavita

shetkari jagacha poshinda kavita

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
19 ⁄ 1 =