विनायक कृष्णराव पाटील आणि रमेश अनंत चव्हाण यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत shetkari kavita in marathi lyrics विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
शेतकरी | shetkari kavita in marathi lyrics
काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतिका स्पर्धा
स्पर्धेसाठी
दिनांक:- ३१/०८/२०२३
विषय :- शेतकरी
शीर्षक :- शेतकरी

माझा बाप शेतकरी
कष्ट अमाप करतो
घाम गाळून शेतात
पिक मोठे पिकवतो||१||
करी पिकाचा विचार
नाही कधीच बोलत
शेतामध्ये पहा आली
त्याची पावले चालत||२||
असा जपतो पिकांना
त्यांची काळजी ही घेई
असे सुंदर शिवार
तया पिक छान देई||३||
असा राबता उन्हात
वाही कष्टरूपी घाम
तेव्हा कुठे मिळतसे
त्याच्या पिकासाठी दाम||४||
माझा बाप शेतकरी
पहा कष्ट खूप करी
हिरवळ फुलताना
आल्या आनंदाच्या सरी||५||
सारे काही विसरूनी
उन्हा तान्हात राबतो
हिरवळ शिवाराचे
असे सपान पाहतो||६||
छान फुलता शिवार
तया होईल आनंद
पिक डौलात डुलता
मनी हा परमानंद||७||
अवकाळी पावसाचे
कसे आगमन झाले
पिक वाहूनिया जाता
अश्रू नयनात आले||८||
कष्ट घेतले अमाप
असे झाले सारे वाया
शेतामध्ये राबताना
झिजे बापाची ही काया||९||
कशी मांडावी शब्दात
व्यथा तयाच्या मनाची
सारे संपले जीवन
साथ सुटली क्षणाची||१०||
विनायक कृष्णराव पाटील
ता. जि. बेळगाव कर्नाटक
जगाचा पोशिंदा | shetkari kavita in marathi lyrics
काव्यबंध समूह
काव्यलतिका
प्रत्येक गुरुवारी होणारी स्पर्धा
दिनांक:- ३१/०८/२०२३
विषय :- शेतकरी
शीर्षक:- जगाचा पोशिंदा

तळपत्या उन्हात झिजवतो काया
म्हणून मिळते दोन वेळचे खाया
राबता उन्हात पुसतो माथ्याचे घाम
वृक्षवल्ली धरते तुजवरी मायेची साया!!१!!
सरज्या राज्याच्या जोडीने फिरता
दिन भर कष्ट करूनी झुकतो खांदा
ऊन पावसाळा अंगावर झेलून राबतो
तरीही उपाशी राहतो जगाचा पोशिंदा!!२!!
नसते क्षणाची उसंत नसतो सणवार
काढी अंगी दुखणं नसतो आराम कधीच
झिजते काया मेहनतीने अंगी बळ हत्तीचं
तुमच्यामुळे आम्ही खातो दोन घास सुखाचं!!३!!
तुटता आभाळाची अशी माया
जाते वाया उगवलेले मातीतील सोने
नाही रडला नाही झुकला ना थांबला
कोसळून सुद्धा उभा राही पुन्हा जोमाने!!४!!
गेली मेहनत वाया नको डगमगू
नको कंटाळून घेऊ तू उगाच फाशी
तूच आहेस श्रेष्ठात सर्वश्रेष्ठ बळीराजा
तुझ्या नसण्याने जग राहील रे उपाशी!!५!!

रमेश अनंत चव्हाण
तोंडली मंडणगड
shetkari kavita in marathi lyrics
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह