Shetkari kavita in marathi text

आम्ही शेतकरी आणि शेतकरी व्यथा | 2 Best Shetkari kavita in marathi text

कोमल मेश्राम आणि सौ. वंदना रमेश ढोले यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Shetkari kavita in marathi text विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

आम्ही शेतकरी | Shetkari kavita in marathi text

काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतिका स्पर्धा
स्पर्धेसाठी
दिनांक:- ३१/०८/२०२३
विषय :- शेतकरी
शीर्षक – आम्ही शेतकरी

आम्ही शेतकरी | Shetkari kavita in marathi text

हिरव्या हिरव्या रानात
पीक नाचते डोलात,
माझा भाऊ आणि आई
काम करते जोरात ||१||

ती फिरते उन्हात
घाम गाळते अंगात
जेव्हा विचार करते ती
तेव्हा राहते स्वप्नात
माझा भाऊ आणि आई
काम करते जोमात ||२||

बापू फिरवतो नंदी
भाऊ उगवतो फांदी
दोघे भिजतात पाण्यात
काम करतात जोमात ||३||

मुलगी शिकते शिक्षण
करते सर्वांचे रक्षण
माझा भाऊ आणि आई
खातात गोडभात सुखान ||4||

हिरव्या हिरव्या रानात
पीक नाचते डोलात
डोक्याला हात लावून बसतो आम्ही
वरून राजाची वाट पाहत
अपेक्षांच् भंग होऊन
डोळ्यात फक्त पाणी राहतं ||5||

हे देवा या शेतकऱ्याला
सुखाचे दिवस येऊ दे
माझ्या कृषीप्रधान देशाला
भरभरून उत्पादन घेऊ दे ||6||

~कोमल मेश्राम

शेतकरी व्यथा | Shetkari kavita in marathi text

काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतिका स्पर्धा
स्पर्धेसाठी
दिनांक:- ३१/०८/२०२३
विषय :- शेतकरी
शीर्षक – शेतकरी व्यथा

शेतकरी व्यथा | Shetkari kavita in marathi text

शेतकरी निसर्गाचा खरा मित्र
जमिनीशी घट्ट नातं जोडतो…
जमिनीला देई आईचा दर्जा
मेहनत करून धान्य पिकवतो||१||

जगाचा पोशिंदा बळीराजा
संघर्षाचे जीवन त्याचे…
दिवस रात्र कष्ट करुनी
भोग नशीबी मात्र गरिबीचे.||२||

करुनी आपल्या रक्ताचे पाणी
मुखी दोन घास सुखाने भरवतो…
मुलांच्या शिक्षणासाठी पैसे जमवतो
त्यांच्या भवितव्याची स्वप्न पाहतो..||३||

शेतकरी आपला शेतात
राब राब राबतो…
नाही मिळाला पिकाला भाव
तर आत्महत्या करतो…||४||

कधी सुकाळ तर कधी दुष्काळ
निसर्गाच्या आपत्तींना तोंड देई…
साऱ्या जगाचा तू पोशिंदा
सारा भार तुझ्या डोई…||५||

एकच सांगणे शेतकरी दादाला
खचून तू जाऊ नकोस..
आत्महत्या हा पर्याय नाही
होईल तुझी ही पूर्ण हौस..||६||

तुझेही दिवस नक्की येईल
निराशेचे मळभ दूर होईल..
सुखसमृद्धीने होईल भरभराट
संसार तुझाही सुखी होईल..||७||

बळीराज्याच्या राज्यात
सुख समृद्धी नांदावी…
त्याच्या अतोनात कष्टाची
किंमत साऱ्या जगास कळावी |८|

सौ. वंदना रमेश ढोले
मु. पो.उरुळी कांचन,ता. हवेली, जि. पुणे.

शेतकरी | Shetkari kavita in marathi

Shetkari kavita in marathi text

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *