shetkari kavita

ऋणी भू मातेचा आणि माझा शेतकरी राजा | 2 Best shetkari kavita

गोविंद कुलकर्णी आणि संचित कांबळे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत shetkari kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

ऋणी भू मातेचा | shetkari kavita

काव्य बंध समुह आयोजित
काव्य लतिका
दिनांक : ३१/८/२०२३
विषय : शेतकरी
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
शीर्षक: ऋणी भू मातेचा – अष्टाक्षरी – स्वरचित
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

ऋणी भू मातेचा आणि माझा शेतकरी राजा | 2 Best shetkari kavita

शेतकरी भूमातेचा
करी कष्ट वावरात
रात्रंदिन पिक घेत
माळरान राबतात …१

पहिल्याच पावसात
केली पेरणी बिजांची
बीज सुध्दा अंकुरले
वेळ झाली रोवणीची…२

पावसाने संप केला
काळी माय तप्त झाली
ऐनवेळी दगा दिला
दुष्काळाची छाया आली…३

ऋण घेऊनी बँकेचे ,
शेतकरी वावरतो
पावसाळा मात्र त्याला
अश्रू ढाळाया लावतो….४

अचानक वृष्टी झाली
काळीमाय फोफावली,
शेतकरी आनंदले
रोपे सुद्धा अंकुरली….५

(C)(R)
गोविंद कुलकर्णी
नौपाडा ठाणे

माझा शेतकरी राजा | shetkari kavita

काव्यबंध समूह आयोजित गुरूवारीय
काव्यलतिका स्पर्धेसाठी
दिनांक : ३१/०८/२०२३
विषय : शेतकरी
शीर्षक : माझा शेतकरी राजा…

माझा शेतकरी राजा | 2 Best shetkari kavita

बळीराजा अवघ्या जगाचा पोशिंदा
शोभूनी दिसतो डवरल्या हिरव्या रानी
कष्टानं करतो तो पिकांची राखणी
गातो तो दिवसभर कष्टाची गाणी..

शेतकरी राजा तो दिलदार दिलाचा
लाखमोलाचे कष्ट त्याचे असे धरतीच्या कुशीत
रणरणत्या उन्हात तो चिंब होई घामाने
तरीही राही तो कर्तव्याच्या खुशीत…

हाताला नक्षी चिखलांची
पायाच्या भेगांनाही चिखलाचे लिंपण
उघडे अंग त्याचे दिवसभर कामात
रात्रीच्या अंधारातही चिखलाचेच कुंपण…

उभा काळ त्याचा, राबतो कष्टतो
पावसाच्या थेंबासाठी नुसती वाट बघतो
सरीतून धावत जातो, पेरून पेरून थांबतो
आपले दु:ख-दैन्य तो, न बोलताही सांगतो…

त्याच्या घराच्या प्रत्येक कोनाड्याला
सुगंध असे मातीचा
त्याच्या हृदयाच्या प्रत्येक स्पंदनाला
विचार असे जगत् कल्याणाचा…

मातीसारखं आयुष्य त्याचं
मातीसारखं सुगंधी
मातीतल्याच कणा-कणानं
रूप शेतक-याचं आबादानी…

संचित कांबळे , कोल्हापूर

शेतकरी राजा | 2 Best shetkari kavita

shetkari kavita

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
22 × 25 =