shetkari marathi caption

शेतकरी आणि अन्नदाता | 2 Best shetkari marathi caption

अनिता मधुकर भोई आणि छाया नाळे भुजबळ यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत shetkari marathi caption विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

शेतकरी |shetkari marathi caption

स्पर्धेसाठी
काव्य बंध समूह आयोजित
दि ३१/८/२३
काव्य लतिका
प्रत्येक गुरुवारी होणारी स्पर्धा
विषय: शेतकरी

शेतकरी आणि अन्नदाता | 2 Best shetkari marathi caption

असे शेतकरी बळीराजा
कष्ट करायला उभा
राबराबतोच नित्य
असे पिकांमध्ये उभा

रब्बी बागायती शेती
करी आनंदाने राजा
असे त्याच्या सोबती
बैल करी गाजा वाजा

शेतकरी राहतोच
ताठ मानेने जगती
नसे त्यासम कोणीच
मिळे त्याच्या कार्या गती

आहे शेतकरी येथे
म्हणूनच आपणही
खातो चार घास मुखी
आणि सुखी जीवनही

घेई अनेक प्रकारे
पीक अलग अलग
करी समृद्ध आपली
शेती राहून सजग

देते साथ त्याला भार्या
त्याच्या प्रत्येक कार्यात
मिळे उभारी कामाला
असे पत्नीचं सोबत

नाही मिळत योग्यच
भाव त्याच्या उत्पन्नाला
तरी राहतो गप्पच
शेतकरी संकटाला

होते जेंव्हा निराशाच
पाय वाकडे वळते
करी विचार जगाचा
गळा फासच पडते

असा साऱ्यांचा पोशिंदा
नसे रे तमा कशाची
कोणी नाही ओळखले
अशी मूर्ती ही कष्टाची

कशी रे परतफेड
होई अशा पोशिंद्याची
किती मानावे आभार
कमी पडते शब्दांची

अनिता मधुकर भोई
कुरूंदवाड (कोल्हापूर)

अन्नदाता | shetkari marathi caption

काव्यबंद समूह आयोजित ,
विषय – शेतकरी
शीर्षक- अन्नदाता

अन्नदाता | 2 Best shetkari marathi caption

शेतकरी राजा माझा महान
विसरतो स्वतःची भुक तहान
कष्ट करी कणखरतेने
मातीतून तो पिकवी सोने

याच्याच ठाई का नेहमी
तू देतो दुःख यातना
झोळीमध्ये नेहमीच आसू
सुख दे थोडे माझी याचना

मुलांप्रमाणे जपतो नेहमी
जागून तो पिकाला
हुरड्यात पीक जाई
दुष्काळाच्या घशाला

जगावे की मरावे हे
पडते प्रश्नचिन्ह
दाही दिशा मग
होतात त्या सुन्न

देणे फेडता फेडता
मागील या क्षणी
पिकवतो कोण,
कोण होतो धनी

राजा तो तटस्थ
लढतो प्रजेसाठी
संसाराचा गाडा हाकतो
मातीच्या मायेसाठी

माय धरित्री
जागी हो आता
लाभू दे मनास
थोडी शांतता

नभांचा तो
गडगडाट होऊ दे
मयुरांनी ते पंख पसरून
नर्तन सुंदर ते करू दे

रिमझिम जलधारा घेऊन
सर्वांची तृष्णा ती शमवून
मायेचा पदर तो धरून
लेकरे गेली आनंदून

उठ कृषक राजा
नको रागावूस
बघ तो आला
नव्याने पाऊस

हिरवे गालिचे पसरून खाली
धरा नव्याने रूप ते ल्याली
चहुकडे पसरली रंगावली
इंद्रधनुची उधळण झाली

आत्मविश्वास जागव अंतरात
लढण्यास तयार हो भवसागरात
तू खरा आमचा पिता अन्नदाता
सुखाने घे श्वास मोकळा तो आता

छाया नाळे भुजबळ
सातारा

शेतकरी आणि अन्नदाता |shetkari marathi caption

shetkari marathi caption

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
26 × 30 =