shetkari marathi kavita lyrics

शेतावरील गीत आणि शेतकरी राजा | 2 Best shetkari marathi kavita lyrics

रुपाली मठमती आणि सुवर्णा बाबर यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत shetkari marathi kavita lyrics विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

शेतावरील गीत | shetkari marathi kavita lyrics

काव्य बंध समूह आयोजित
काव्य लतिका स्पर्धा
विषय: शेतकरी
शीर्षक : शेतावरील गीत
दिनांक 31 :8 :2023

शेतावरील गीत आणि शेतकरी राजा | 2 Best shetkari marathi kavita lyrics

जगाला पोसतो….
स्वतः उपाशी राहतो
भरलेल्या पोटांकडे पाठ फिरवून
गळफास लावून घेतो…

कपभर सॉस मुकाट्याने,
शंभर रुपयाला आणतो
कष्टाने पिकवलेल्या टोमॅटोला
महाग झाली म्हणतो….

पावसाला आतुरलेल्या पिकांना
प्रवासात पाहताना, थंडा पीत असतो
तो तहानलेला असून सुद्धा
आधी पिकांना पाणी पाजवतो

घाम सावलीत येत नसतो
तरी एसीत आरामात विसावतो
तो घळा घळा घाम वाहतो
तरी उन्हात तन तनतो…

बंड्या आमचा
दाबात बसून पुलाव खातो
तर भात पिकवणारा
गुडघाभर पाण्यात उभा असतो

घरात खडे टोचत नाहीत
तरी आपण चपला घालतो
काटा टोचतो माहीत असून
रानात अनवाणीच वावरतो

सुटा बुटात फिरतो
माती नको लागायला म्हणून जपतो
तो एक पाय उचलायला
दुसरा पाय मातीत रुतलेला असतो

पावसाच्या चार थेंबानी
दादाला सर्दी गर्मी होतो
तो रात्रभर पावसात उभा असतो
मग त्याला कुठून उब मिळतो

बागेत बसून
आपण बर्गर खातो
कांदा भाकर हाती पकडून
तो भेगाळलेली जमीन खणतो

स्कूल बस पर्यंत जायला
आम्हाला उन्हात छत्री लागते
पण कारभारणी त्याची
धगधगत्या माळावर जेवण घेऊन येते

करुनी दूर लेकराला
पाळणाघर शोधती
वासराच्या लळा पायी
ती रानमाळ भटकती

वृद्धाश्रमात शेतकऱ्याची माय
कधी शोधूनी का सापडेल
हक्काने बोलते चार दिवस येते
बिघडते क्षणात आपले मोबाईल

वाह ,रे जगा तुझी रीत
ऐक कधीतरी शेतावरील गीत………

रूपाली मठपती…..

shetkari marathi kavita lyrics

शेतकरी राजा | shetkari marathi kavita lyrics

स्पर्धेसाठी स्वरचित कविता
“काव्यबंध समूह आयोजित साप्ताहिक काव्यलतिका स्पर्धा “
दि. – ३१ ऑगस्ट २०२३
विषय – ” शेतकरी “


शेतकरी राजा | 2 Best shetkari marathi kavita lyrics

शेतकरी राजा आमुचा
हाच खरा पोशिंदा जगाचा
राब राब राबून शेतात
जीव ओततो पिकांत …१

बीज पेरुन काळया मातीत
फुलवीतो हिरव स्वप्न मनात
गाळून घाम शेतात
प्राण भरतो पिकांत …२

कधी धुवां धार पाउस
तर कधी चमकणारी वीज
कधी सुसाट सुटणारा वारा
कधी जमीनीला पडणाऱ्या भेगा …३

कधी मधी कुठंतरी पिकलेला मळा
देई मनाला तिळभर उभारा
होता कधी नासाडी पिकांची
होई तळमळ किती जीवाची …४

अपार कष्टाला नसे सीमा कसली
नसे जीवाला त्याच्या ओढ दुसरी
करी सांभाळ पिकाचा लेकरासारखा
सर्जा राजा हाच खरा त्याचा सखा …५

फुटतो अंकुर पेरलेला बीज जसा
फुलतो चेहरा त्याचा अलगद कसा
फुलता फुलता फुले हिरवा मळा
येता पेरणीला पावसाळा …६

रातदिन करून कष्ट
होतं ना पूर्ण स्वप्न
व्यथा शेतकरी राजाची
सांगावी कुणाला, ऐकावी कुणी …७

अन्नदाता शेतकरी सकल विश्वाचा
असे उपाशी पोशिंदा जगताचा
पिकाला मिळे न भाव तोल मोल
“शेतकरी राजा” हिरा हा अनमोल …८


✍️सौ. सुवर्णा बाबर
पुणे

शेतकरी  shetkari marathi kavita lyrics

shetkari marathi kavita lyrics

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
21 − 8 =