देविदास गायकवाड आणि शरदचंद्र काकडे देशमुख यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत shetkari marathi kavita photos विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
पेटला वणवा शेतकरी आत्महत्येचा | shetkari marathi kavita photos
स्पर्धे करीता
काव्यबंध समुह द्वारा आयोजित ,
काव्यलतिका स्पर्धा
आजची तारीख:
31.08.2023
शेतकरी
शीर्षक : पेटला वणवा! शेतकरी आत्महत्येचा..!

पेटला ‘वणवा’ इथं,
शेतकरी आत्महत्येचा,
नियतीनं कसा केला ‘खेळ’,
जगाच्या ‘पोशिंदयाचा’,
‘लाल’ रक्ताने पिकवीते ,
पांढरा पांढरा ‘ कापूस. ‘
रात-दिन पर्हाटीले जपते,
जशी मायेची ‘कूसं’.
बिया- बियाले जगवीते ,
आटवूनं हाड- रक्त- मासं,
जशी ‘माय’ भरवीते,
पोटच्या लेकराले ‘घास’.
भरं ‘बरसादीतं’ नसते,
लेकरांना खायला ‘दाणे’,
तवा ‘पर्हाटीले’ टाकते,
महागडी खते-औषधी कर्जाने.
‘पोट्ट’ शहरी उच्च शिक्षणाले,
‘पोट्टी’ आली ‘लग्नाले’,
चिंतेन’ डोळ्याला डोळा न लागे,
त्यातं सावकाराचा ‘तगादा’ मागे.
सरकारले कमिशनची ‘भूक’,
कंपन्या करते वारेमाप ‘लूट’,
दुष्काळानं’ पिकलं नाही ‘पीक’,
बळीराजाचं बिघडलं ‘बजेट’.
कसे राज्याचे ‘कृषी’ धोरणं,
शेतकर्यांचं जिवंतपणी मरणं’,
हजारो ‘योजना’ केल्या सरकारनं,
समद्या गीळल्या ‘भ्रष्टाचारानं’.
सरकारचा ‘कुटील’ डाव ,
कापसाला देते ‘हमी भाव’,
जसा ‘वाघिणीनं’ घेतला,
मागूनं नरड्यावरं ‘घावं’.
सांगा! कसा जगेलं शेतकरी,
त्यांच्या स्वप्नांची ईथं ‘होळी’,
जगणं नव्हे, पुरती लाचारी ,
दोरीचा ‘फास’ ‘पोशिंदयाच्या’ गळी
✍️ प्रा. देवीदास गायकवाड.
Mb.8605735272.
राजीव क. महा. (स्वतंत्र) ,पाटण.
ता. झरी. जिल्हा.
भूक | shetkari marathi kavita photos
स्पर्धेसाठी
काव्यबंध समूह आयोजित
दिनांक ३१ /८ /२०२३
काव्यलतिका ( गुरुवार )
विषय……शेतकरी
शीर्षक….भूक

या भुकेनं आमचा घात की हो केला ,
गळफास लावून शेतकरी बा देवाघरी गेला
म्हणं आम्ही सरदार व्हतो पहिले,
पंजोबाला त घोड्याव बसलेलं फोटोत पाहीले.
डोंगरा एवढी रास असायची खळ्याव ,
दहा माणसं राबायची मळ्याव .
आता हातभर तुकडा उरलाय जमीनीचा ,
प्रश्न सुटता सुटना पोटाचा .
नशिबाने सगळाच रस्ता बंद केला,
गळफास लाऊन शेतकरी बा देवाघरी गेला .
चिकटून बसल्यालं दारिद्रय जाता जाईना ,
पोराबाळांचं लेंढार घरात मायना .
दाहीदिशांनी आभाळ फाटलय
डोळ्यातल पाणीबी पुरतं आटलय .
कर्जाचा डोंगूर डोळ्याम्होरं व्हता ,
पाचवीला पुजलेल्या सावकाराच्या लाथा.
भेगा पडलेली जमीन तुडवीत आला ,
गळफास लाऊन शेतकरी बा देवाघरी गेला .
देवाघरी गेलेल्या मायचं चितार आहे मनांत,
तवापासून बा नं वाढावलं मायेच्या बनात .
बा गेला आता समद्याच दिशा झाल्या परक्या,
पोरकेपणाचं वार घेतय भवतीनं गिरक्या .
आधारहीन आम्ही ,अवस्था झाली दीन ,
नशिबाच्या भवऱ्यात आयुष्य झालं चिनभीन
नरढयाला गुंडाळून लालभडक शेला ,
गळफास लावून शेतकरी बा देवाघरी गेला .
या भुकेनं आमचा घात की हो केला,
गळफास लाऊन शेतकरी बा देवाघरी गेला .

शरदचंद्र काकडेदेशमुख
पुरंदर पुणें ९४२२३०४०५५
shetkari marathi kavita photos
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह