ऋणानुबंध मातीशी आणि माझा बळीराजा | 2 Best shetkari marathi quotes

सौ. अनिता डोंगरावर आणि कु कोमल वसंतराव साखळे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत shetkari marathi quotes विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

ऋणानुबंध मातीशी | shetkari marathi quotes

काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतिका स्पर्धा ,गुरूवार
दि.31 / 8/ 2023
विषय – शेतकरी
शिर्षक – ऋणानुबंध मातीशी

ऋणानुबंध मातीशी आणि माझा बळीराजा | 2 Best shetkari marathi quotes

जगाचा पोशिंदा मी
ऋणानुबंध काळ्या मातीशी
उनातानात पाणी पावसात
बायको पोरं समदं शेतातच …1


राबतो सारे पोटासाठी
अन समद्या जगाला देण्यासाठी
सारे जीव माया कष्टावर निर्भर
मी मात्र निसर्गावर निर्भर….2


वलासुखा दुष्काळ बळावतो
शेतातलं उभं पीक मान खाली टेकवत
माया मनाच दुःख मला सतावत……3


सरकारी होते तेवढी मदत
या खेपेची पुढच्या खेपेत मिळत
गरज लागते नाही मिळत मदत
भूक नमल्यावर वाटत मिळाल्यागत ..,.4


बळीराजा मनतात मला
शरीरयष्टी कसली आहे बळकट
रोमा रोमा धावते रगत
मातीत राबायला हार नाही मानत…..5


वरूण राजा असं नको करू
आईच्या माझ्या हिरावुस हिरवा शालु
सावकारी कर्ज डोक्यावर घेतो
जन्मभर चुकारच भरतो …..6


आजीवन नाही संपेल व्यथा
विश्वास नाही माझा नशिबावर
मेहनतीवर आहे माझा कारभार
निसर्गाची साथ मिळते म्हणून
सांभाळतो काळ्या मातीचा परिवार ….7

सौ. अनिता डोंगरवार
मु. पो. जि. गोंदिया

माझा बळीराजा | shetkari marathi quotes

“काव्यबंध समूह आयोजित
साप्ताहिक काव्यतलिका स्पर्धा “
दि. ३१ /८/२०२३
शीर्षक = माझा बळीराजा
माझा बळीराजा

माझा बळीराजा | 2 Best shetkari marathi quotes

चुकलं तरी काय आमचं निसर्गा सांगतं जरा ,
का? रूसून बसलाय आमच्यावरी .

सोन्यासारखं पिक आल होतं ते पावसानं उधळून लावलं.
ओठाशी आलेला घास जणू हिरावूनच घेतला .

कर्ज बाजारी होऊन माझ्या बळीराजान शेतीची मशागत केली .
पेरणीची वेळ आली मात्र पावसाने अजून हजेरी नाही लावली .

मृग नक्षत्र ही निघून चाललं मात्र अजूनही जणू ढगांना घाम नाही फुटला .
मात्र माझा बळीराजा आता वाट पाहून थकला .

निसर्गा जरा तरी दया दाखव माझ्या बळीराजावरी
होऊ दे रे वर्षा आता या तापलेल्या जमिनीवरी .

बीज बियांना आत निजू दे जमिनीमधी
हिरव्या गार नववारीने सजू दे माझ्या शेत माउलीला ..

शृंगार चढेल तिला मोत्या सारख्या पिकांचा ,
पीक डोलेल वाऱ्या संग गाईल गान.

माझ्या बळी राज्याच्या कष्टाला येईल यश ,
त्याच्या घामाचं होईल सोन.

मात्र साथ तुझी हवी रे निसर्गा
तुझ्या साथी शिवाय नाही होत काही.

तुझ्या साथीने न माझ्या बळी राजांच्या कष्टाने पलटेल त्याच नशीब ,आयुष्य जगेल तो सुखात .

माझा बळीराजा आहे या जगाचा पोशिंदा त्याच्या वर निर्भर आहे सार जग, त्याच्या कष्टाला नाही या जगात जोड.

कु. कोमल वसंतराव साखळे
तळेगाव (शा. प.) ता. आष्टी जि. वर्धा.

बळीराजा | shetkari marathi quotes

shetkari marathi quotes

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *