सौ. समीक्षा बाळासाहेब जामखेडकर आणि भारती कुलकर्णी यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत shetkari marathi shayari विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
शेतकरी | shetkari marathi shayari
काव्यवर्धन समूह आयोजित काव्य लतिका स्पर्धा गुरुवार
दिनांक 31 2018
विषय:- शेतकरी

जगाचा पोशिंदा शेतकरी
मेहनतीचे करतो काम
दिवसभर शेतात तो
गाळत असतो घाम
कष्टाला त्याच्या फळ मिळते
पीक येतात जोरदार
शेतात ते डोलत असते
भरत असते धान्याने घरदार
काळ्या मातीशी त्याचे
नाते असतेच वेगळे
समाधानात जीवन
सुखाचे घास सगळे
मेहनत करून जगतो
असतो तो स्वाभिमानी
सही असली रहाणी जरी
उच्च असते त्याची विचारसरणी
सौ. समिक्षा बाळासाहेब जामखेडकर
संभाजीनगर
अन्नदाता | shetkari marathi shayari
स्पर्धेसाठी स्पर्धेसाठी
“काव्यबंध ” समूह
काव्य लतिका
आम्ही मराठी
साहित्याचे शिल्पकार.
स्पर्धा :
दिनांक : ३१.८.२०२३
वार : गुरुवार
विषय : शेतकरी
++++++++++++++++++
शीर्षक : अन्नदाता
काव्यप्रकार : अष्टाक्षरी

शेतकरी हा सर्वांचा
अन्नदाता जगताचा
सर्व भार सांभाळतो
घाम गाळीतो कष्टाचा. [१]
माय बाप शेतकरी
तुला म्हणते राजा रे
मृग पाऊस येताच
शेत नांगरून सारे. [२]
करी पूजा शेतामध्ये
यावे पावसाच्या सरी
शेतमळा भरणार
बिया बियाणे ते पेरी. [३]
दिन रात सर्जा संगे
राब राबतो मातीत
काळ्या आईच्या पोटाची
भूक भागवी क्षणात. [४]
कुटुंबाचा शेतामध्ये
खूप उपयोग होतो
कारभारीणीच्या हाती
चुन भाकर आणतो. [५]
स्वरचित
[C][R]
भारती कुलकर्णी
नौपाडा, ठाणे.(प)
पिन. ४००६०२

shetkari marathi shayari
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह