सौ. सुवर्णा पवार आणि सौ. स्वाती सुरेश कोरगांवकर यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत shetkari marathi status विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
बळीराजा | shetkari marathi status
स्पर्धा करीता
काव्यबंध समूह / आम्ही मराठी साहित्याचे शिल्पकार
काव्यलतिका
प्रत्येक गुरुवारी होणारी स्पर्धा
दि .३१ / ०८ / २०२३
विषय = शेतकरी
काव्यप्रकार = दशाक्षरी
शीर्षक = बळीराजा

साऱ्या आहे जगाचा पोशिंदा
कष्टकरी शेतकरी माझा,
जगवतो सारी जीवसृष्टी
धरणी आईचा बळीराजा…..१
राबराबतो थोड्या शेतात
राही शेणामाती झोपड्यात,
रात्रंदिन कष्ट करूनीया
राहतो फाटक्या कपड्यात…..२
कर्ज कुटुंबाच्या सुखासाठी
बँका , पतसंस्था, सावकार,
शेती सारी गहाण टाकतो
देतो सारे शेती अधिकार…..३
सावकाराचे कर्ज काढुनी
खतबियाणे, लग्नशिक्षण,
शेतीवर चढे कर्ज बोजा
कोण करतील का रक्षण ?…..४
असे साऱ्या जगाचा पोशिंदा
सारी म्हणतात शेतकरी,
किती कर्जात साऱ्या बुडाला
बळीराजा तुझा कष्टकरी…..५
वाट पाही रिमझिम पावसाची
करी सर्जाराजा नांगरणी,
शेतीमालाच्या कामाला जुंपी
बैलजोडी करी कोळपणी ….६
जीव लावती मुक्या प्राण्यांना
देती अन्नधान्य पिकवून ,
पोशिंदा सदा बैलांचा ऋणी
त्यांच्यावर राही विसंबून……७
झाला पाऊस शेती पिकते
नाहीतर दुष्काळ पडतो ,
शेती पिकत नाही म्हणून
गळफास लावून मरतो……८
मिळत नाही पीकाला दर
धान्य विकी भर व्यापाऱ्यांची,
भाव मिळे कवडी मोलाने
व्यथा बिचाऱ्या शेतकऱ्यांची….९
कधी येई मोठा महापुर
शेतीप्रपंच जाई वाहून,
गुरांना नाही चारावैरण
पाण्याचा अवतार पाहून……१०
साऱ्या कष्टाच्या वेदनातून
देवा कोण रे वाचवणार,
कधी येतील सुखाचे दिन
बळीराजा कसा जगणार?….११
सौ. सुवर्णा पवार,
इचलकरंजी
व्यथा | shetkari marathi status
काव्यबंध समूह आम्ही मराठी साहित्याची शिल्पकार
आयोजित
काव्यलतिका स्पर्धा
दिनांक 31/ 8 /23
विषय शेतकरी
शीर्षक -व्यथा

अन्नदाता बळीराजा
खरोखरी अनमोल
दुर्दैव की आज आम्हा
ना कळे त्याचे मोल…१
दैनिक पत्रक उघडताच
वाचा होते अबोल
अस्तित्व तयाचे केले
आम्ही मात्र काडीमोल…२
मूलभूत सोयींचीही
सदोदित तया भ्रांत
नियतीच्या संघर्षात
नसे कधी निवांत….३
कष्ट आणि कष्टच
असे त्याच्या सांगाती
हात मात्र गहाण
सावकाराच्या हाती….४
ओसाड माळावरही
फुलवतो हिरवं रान
झिजवी व्यर्थ काया
ना मिळे तया सन्मान….५
सणावारा येई त्यास
उत्साहाचे उधाण
परि काळीज तुटते
पैशाच्या रे चिंतेनं ….६
तो पडला बिचारा शेतकरी
पिढीजात व्यवसायाचा मानकरी
कष्टाचा घेती फायदा
केवळ दलाल अन् व्यापारी…..७
पैका-पैका गोळा करत
शिक्षण देतो पोरांना
येऊ नये त्यांच्याही नशीबी
अशी भयाण अवहेलना….८
गुरं-ढोरं अन् घरातली
साऱ्यांच्या तो दिमतीला
त्यात सावकार राशीला
बोट दावी मग भाग्याला….९
अकाली वर्षा गारपीट
अन् वाऱ्याचे तांडवनृत्य
नुकसान पाहता घडते
मग आत्महत्येचे कृत्य…..१०
सरकार असो कोणतेही
न्याय नाही बळीराजाला
हेच एक अंतिम सत्य
समजवू अपुल्या मनाला….११
छत्रपती शिवाजी,शाहू राजे
असती आज पृथ्वीतलावरी
बळीराजाला मान असता
निश्चित जन्म-जन्मांतरी….१२
सौ. स्वाती सुरेश कोरगांवकर
जिल्हा- कोल्हापूर

shetkari marathi status
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह