आभाळ फाटलं आणि शेतकरी मुलाची व्यथा | 2 Best shetkari var kavita

वर्षा प्रधान/खोब्रागडे आणि प्रा. महेश कृष्णा पगार यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत shetkari var kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

आभाळ फाटलं | shetkari var kavita

काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतीका स्पर्धा….
विषय…शेतकरी

आभाळ फाटलं

आभाळ फाटलं आणि शेतकरी मुलाची व्यथा | 2 Best shetkari var kavita

दमानं घे ना देवा जरा, काहूर पेटलं
आभाळ फाटलं देवा आभाळ फाटलं‌

कष्ट गेले वाया गेला घामाचा सळा
मेघ दाटनां, फुका गेल्या मातीच्या कळा
हाल सोसना दु:खाचं पेव फुटलं
आभाळ फाटलं देवा आभाळ फाटलं।

थकले ना राबतांना हात ना पाय
सारं गेले लया तुला लाज कशी नाय
घास पेरलायं तुला का पीक वाटलं
आभाळ फाटलं देवा आभाळ फाटलं

आई वानी धरती अन् तुच रे पिता
कुणा कळावी बोल ना माझी ही व्यथा
कोळगा तू आणि डोळ्यात डोह आटलं
आभाळ फाटलं देवा आभाळ फाटलं।

जित्राब ही गेली सारी, माणसं ही गेली
घोट ना पाण्याचा अन् नाही सावली
असं कसं तुझ्या मंदी सैतान सुटलं
आभाळ फाटलं देवा आभाळ फाटलं।

घेईल कोण कळ अन् कोण करल दुआ
लिहिलेल्या नशीबाला मार्ग दाव नवा
शिवून घेईन कष्टानं आयुष्य उसवलं
आभाळ फाटलं देवा आभाळ फाटलं।

Warsha Paddhan/ khobragade
Jagnnath nagar
Nagpur

शेतकरी मुलाची व्यथा | shetkari var kavita

काव्य बंध समूह आयोजित काव्य लतिका स्पर्धा
विषय – शेतकरी

शीर्षक- शेतकरी मुलाची व्यथा

शेतकरी मुलाची व्यथा | 2 Best shetkari var kavita

शेतकरी म्हटला की कोणालाच नसते जाग
प्रत्येकाच्याच तळपायाला येते आग
का हो शेती करणे इतके वाईट आहे?
नोकरी धंदा हाच फक्त लग्नाचा ताईत आहे?


यावर्षी वाटले पीक बरे झाले
निर्यातही मुक्त झाली हे खरे झाले.
दोन पैसे मिळतील या आशेने आनंदाला पार उरला नाही
पण मध्येच जिंकली माशी, निर्यात मुक्तीचा बार ठरला नाही


कांद्यासोबतच बाकी पिकांनीही सोडली साथ
पिकभावासोबतच वरूण राजाने देखील मारली लाथ
कर्जाच्या ओझाने अजूनही दबतो आहे
रात्र पहाट न पाहता शेतातच राबतो आहे


म्हणण्यापुरताच राहिलोय आम्ही जगाचा पोशिंदा
क्षणोक्षणी पडतोय फक्त अपमानाचा फंदा
चुकीच झाली वाटते येऊन जन्माला शेतकऱ्याचे म्हणून पोर
जग दुनिया हसते बोलून आम्हाला हरामखोर


शिक्षित व शहरी मुला मुलींनीच बदलले पाहिजे जग
नाहीतर शेतकरी नावाचा प्राणी भूतकाळच होणार मग
अपेक्षा करतो की म्हणावे सर्वांनी शेतकऱ्यालाच राजा
तरच वाढेल जगाच्या पोशिंद्याचा जगात गाजावाजा

प्रा. महेश कृष्णा पगार
कळवण तालुका कळवण जिल्हा नाशिक

शेतकरी | 2 Best shetkari var kavita

shetkari var kavita

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *